मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करावी
अमरावती, दि.26: पिक संरक्षण व सर्वेक्षण केंद्र, किटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि,
अकोला यांनी बुलडाणा जिल्ह्यात नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात मक्यावर नविन लष्करी
अळीची मोताळा तालुक्यात पारडी गावात प्रादुर्भाव आढळून आलेला असून बुलढाणा तालुक्यात
जनुना, पारडा, मड, पाडळी चौठा अद्याप सुरुवात झालेली नाही. परंतू सर्वेक्षणात तुरळक
ठिकाणी नगन्य स्वरुपात खोड किडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
सद्यास्थितीत मका हे पिक सुरुवातीच्या
पोंगे अवस्थेत असून या अवस्थेत प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. ज्या भागात हंगामात
नविन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला असेल त्यांनी त्वरीत एकरी 05 फेरोमन सापळे लाऊन
या किडीच्या पतंगावर नियमित पाळत ठेवावी व दर आठवड्याने फेरेामन सापळ्यामध्ये अडकणारे
पंतग नष्ट करावे जसे जसे या पतंगाची संख्या वाढेल तसे तसे फेरोमन सापळ्यांची संख्या
एकरी 15 सापळे पर्यंत करावी म्हणजे हे पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करणे शक्य होईल व
या किडीच्या पुढील पिढ्याची रोकथाम करता येईल. एक मादी 4 ते 5 दिवसात सर्वसाधारण
1500 ते 2000 पर्यंत अंडी देऊ शकते. जर प्रत्येक नर फेरोमन सापळ्यात अडकला तर त्याचे
मादी सोबत मिलन होणार नाही. त्यामुळे ती अंडे देऊ शकणार नाही परिणामी किडीचे पुढील
प्रजोत्पादन थांबून मोठ्या प्रमाणावर पिठ्यांची रोकथाम होऊन पिकांवर प्रादुर्भाव होणार
नाही.
फेरोमोन सापळे पिकामध्ये समसमान
अंतरावर लावावे त्याची खालील मेनकापडाचे खालील टोक किमान पिकाच्या 6 इंच वर राहिल या
प्रमाणे लावावे. जशी जशी पिकांची उंची वाढेल तसे फेरोमोन सापळ्याची उंची वाढवावी. प्रत्येक
सापळ्यामध्ये वडी (ल्यूर) लावावी व वडी वरील वेष्टनावर दिलेल्या अंतीम मुदतीत ती बदलून
परत नविन वडी प्रत्येक फेरोमोन सापळ्यामध्ये लावावी. शेतकरी बंधुनी फवारणी सायंकाळी
किंवा सकाळी करावी. तसेच जाडसर द्रावण थेंबारुपाने पोंग्यामध्ये पडेल अशा प्रकारे फवारणी
करावी म्हणजे पोंग्यात लपलेल्या अळ्यांचे प्रभावी नियंत्रण करता येईल.
सर्वेक्षणामध्ये मका पिकावर
खोड किडीचा सुध्दा प्रादुर्भाव दिसून आला असून अळी पिवळस तपकिरी व डोके तपकिरी रंगाचे
असते. तर दुसऱ्या प्रकारच्या खोड किडयाही अळी गुलाबी रंगाची असते. त्यामुळे त्याली
गुलाबी खोड किडा सुध्दा म्हणतात. मक्यावरील खोड किडीच्या प्रादुर्भाव 5 टक्के नुकसानग्रस्त
झाडे या प्रमाणात आढळान आल्यास कार्बोफ्युरॉन 3 टक्के दाणेदार 33.33 किलो प्रती हेक्टर
या प्रमाणात जमिनीत ओलाव असतांना मुळाचे बाजुला मिसळून द्यावे किंवा डायमेथोएट 30 टक्के
प्रवाही 13 मिली/10 ली पाणी किंवा थायोमेथोक्झाम 12.6+लॅब्डा सायहॅलोथ्रीन 1.5 टक्के
2.50 मिली/ 10ली पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
नविन लष्करी अळीची ओळख पूढील
प्रमाणे करावे :
खाद्य वनस्पती ही किड बहुभक्षीय
असून 80 पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली उपजिवकिा करते. परंतू गवतवर्गीय पिके हे या किडीचे
सर्वात आवडते खाद्य आहे. ही कीडी सर्वात जास्त मका, मधू मका, ज्वारी यावर उपजिविका
करतांना आढळून येते. हराळी, सिंगाडा, कापूस, रान मेथी, मका, ओट, बाजरी, वटाणा, धान
ज्वारी, शुगरबीट, सुदान ग्रास, सोयाबीन, ऊस ,तंबाखु व गहू यांवर वारंवार प्रादुर्भाव
होतो भाजीपाल्यामध्ये फक्त मधूमक्यावर नियमित प्रादुर्भाव असतो. परंतू इतर भाजीपाला,
फळ पिकामध्ये सेप, अंगूर, संत्रा, पपई पीच, स्ट्रॉबेरी व इतर फलपिकाचे कधीकधी नुकसान
करते.
जिवनचक्र व ओळख : या अळीची उन्हाळयात 30
दिवसात एक पिढी पूर्ण होते असून अखंड खाद्य मिळालयास 3 ते 4 पिढ्या विविध वनस्पतीवर
पूर्ण होऊ शकतात. अंडी अर्ध गोलाकार असून पानावर एका समुहात 100 ते 200 अंडी देते.
एक मादी सरासरी 1500 तर महत्तम 2000 अंडी देऊ शकते. अंडी समुह केसाळ व राखडी/ भुऱ्या
रंगाच्या लव किंवा मऊ केसाने झाकलेले असतात. अंडी देण्याचा कालावधी उन्हाळ्यात फक्त
2 ते 3 दिवासचा असतो. अळी पूर्ण वाढझालेल्या अळीचे तोंडावर पांढुरक्या रंगाचे उलट्या
वाय आकारचे चिन्ह असते. तर पोटाच्या आठव्या सेगमेंटवर चौकोनात फुगीर गोल गडद किंवा
हलक्या रंगाचे चार ठिपके असतात. दिवसा अळी लपून राहते. उन्हाळ्यात अळी अवस्था 14 दिवसाची
तर हिवाळ्यात किंवा थंड वातावरणात ती 30 दिवसापर्यंत असु शकते. कोष: चकाकणाऱ्या तपकिरी
रंगाचे कोष सामान्यत 2 ते 8 सेमी खोल जमिनीत असतात. अळी स्वत: भोवती अंडाकृती, मातीचे
कण व रेशीत धागा एकत्र करुन सैल कोष तयार करते. उन्हाळ्यात कोषा अवस्था 8 ते 9 दिवसाची
असून अती थंड वातावरणात ती 20 ते 30 दिवसाची सुध्दा राहू शकते. पौढ नरामध्ये समोरचे
पंखावर राखडी तपकिरी रंगाचे छटा असून टोकाला व मध्य भागाजवळ त्रिकोणी पांढरे ठिपके
असतात. मादीमध्ये समोरचे पंख नरापेक्षा कमी चिन्हांकीत असतात. ते एकसमान राखडी तपकिरी
रंगाचे असून त्यावर राखडी व तपकिरी रंगाचे ठिपके असताता. मागील दोन्ही मोहक चंदेरी
पांढरे असून त्यावर आखुड गडद रंगाची किनार असते. पतंग अवस्था सरासरी 10 दिवसाची असुन
ती 7 ते 21 दिवसांपर्यंत असु शकते. पौढ निशाचर असून मादी सामान्यत बहुतांश अंडी पहिल्या
चार ते पाच दिवसाच्या कालावधीत देते.
नुकसान : अळ्या पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. नुकत्याच अंड्यातुन बाहेर
आलेल्या अळ्या पानाचा हिरवा पापूद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडताता.
दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळया पानाला छिद्र करतात. पानाच्या कडा खातात. अळया मक्याच्या
पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्र करतात. त्यामुळे पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर
एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळया राहतात,
कारण त्या जवळ आल्यास एकमेकांना खातात. जूनी पाने मोठ्या प्रमाणात पर्णहीन होऊन पानाच्या
फक्त शिरा व झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते पोंगा धरण्याची
सुरुवातीची अवस्था कमी बळी पडते, मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त तर उशीरा पोंगे
अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजुने आवरणाला छिद्र
करुन दाणे खाते.
व्यवस्थापन :
मशागतीय पध्दती : पिकाची काढणी वेळेवर करुन पिकाची नंतरच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर
प्रादुर्भावतुन सुटका होऊ शकते. पिक काढणीला आल्यावर कणसे किापल्यानंतर धाडयाची गंजी
शेतात न ठेवता योग्य विल्हेवाट लावावी. पिकाचे कायीक वाढीत अतोनात नुकसान झाले असल्यास
धांडे कापून पोंग्यातील अळी सहित नष्ट करावे. स्वच्छता मोहीम राबवावी व नत्र खताचा
अवास्तव वापर टाळावा, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी 20 या प्रमाणे पक्षी थांबे
उभारावे (30 दिवसापर्यंत).
यांत्रीक पदध्ती : पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पानावरील समुहात
दिलेली अंडी किंवा अळ्यांचा समुह असलेली प्रादुर्भाव ग्रस्तपाने (पाढरे चटृटे असलेली
) अंडी/ अळयांसहीत वाळू टाकावी. पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्यासाठी कामगंध सापळयांचा
एकरी पंधरा या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने
सुरुवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे.
जैविक नियंत्रण : जैवविवीधता वाढवने जसे आंतरपिके/इतर सजावटीच्या फुल वनस्पती
घेऊन नैसर्गिक शत्रूंचे संवर्धन होण्यास मदत हाईल. पतंगाची संख्या 3 पंतग/ कामगंध सापळा
या प्रमाणात आढळतात ट्रायकोग्रामा प्रेटीओसम, टेलेमोनस रेमंस या परोपजीवी किटकांचे
दर आठवड्याने एकरी 50 हजार अंडी याप्रमाणे शेतात सोडोव. त्यांनतर 3 ते 4 दिवसापर्यंत
रासायनिक किटकनारशकाची फवारणी करु नये. रोपे ते सुरुवातीची पोंगे अवस्थेत 5 टक्के पोंग्यामध्ये
तसेच 10 टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळलयास जैविक किटकनाशकांची फवारणी करावी. मेटारायझीयम
ॲनिसोप्ली पावडर (10X10 सिएफयू/ग्रॉम)/50 ग्रॅम किंवा नोमुरीया रीलै पावडर (10X10 सिएफयू/ग्रॅम)/
30 ग्रॅम/10 ली या प्रमाणे उगवणी नंतर 15 ते 25 दिवसांनीपोंग्यात फवारावे त्यानंतर
प्रादुर्भावानुसार 10 दिवसाच्या अंतराने 1 ते 2 फवारण्या कराव्या. बॅसीलस थूरीजींअसीस
व कुर्सटाकी/20 ग्रॅम/10 किंवा 400 ग्रॅम/एकर या प्रमाणे फवारणी करावी.
रासायनिक किटकनाशकांचा वापर:
(शिफारस 2018-19 वर्षासाठी)
अळी पोग्यामध्ये उपजिवीका
करीत असल्यामुळे रासायनिक किटकनाशकाची जास्त घनफळाच्या फवारणी (नॅपसॅक) पंपाद्वारे
फवारणी केल्यास फवारणीचे द्रावण पोंग्यात जाऊन नियंत्रण मिळते.
रोपे ते सुरुवातीची पोंगे
अवस्था:
अंड्याची उबवण क्षमता कमी
व सुक्ष्म अळ्यांचा नियंत्रणासाठी 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास, 5 टक्के निबोंळी अर्क
किंवा ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम, 50 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणे फवारणे.
मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था:
दुसऱ्या ते तिस-या अवस्थेतील
अळ्याच्या नियंत्रणासाठी, 10 ते 20 टक्के प्रादुर्भाव असल्यास स्पिनेटोराम 11.7 टक्के
प्रवाही, 9 मिली किंवा थायोमेथोक्झाम 12.6 टक्के+ल्यॅब्डा सायहेलोथ्रिन 9.5 टक्के,
5 मिली किंवा क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही, 3 मिली 10 लिटर पाण्यात याप्रमाणे
फवारणे.
गोंडा ते रेशीम अवस्था (उगवणी
नंतर 8 आठवडे):
या अवस्थेत रासायनिक किटकनाशकांचा
वापर किफायतशीर नाही. म्हणून मोठ्या अळ्या वेचाव्या. वरिल प्रमाणे उपाय योजना करुन
मका पिकांवरील नवीन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी बंधु-भगीनीनी एकात्मीक व्यवस्थापन
पध्दीताचा अवलंब करण्याचे आवाहन सुभाष नागरे, विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग
अमरावती यांनी कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा