बुधवार, १७ जुलै, २०१९

21 जुलैला रेशीम उद्योग शेतकरी मेळावा



21 जुलैला रेशीम उद्योग शेतकरी मेळावा

अमरावती, दि. 17 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशीम उद्योग संदर्भात माहिती देण्यासाठी 21 जुलै रोजी विभागीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
             रेशीम उद्योग मेळावा अकोला-बडनेरा रोडवर पाळाफाटा जवळील प्रादेशिक रेशीम कार्यालय, राज्य रेशीम पार्क येथे होणार आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रेशीम संचालनालयाच्या संचालक भाग्यश्री बानायत व उपसंचालक अर्जून गोरे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात विभागातील अमरावती, अकोला,यवतमाळ,बुलडाणा, वाशिम येथील शेतकरी उपस्थित राहणार आहे.
            अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे  आवाहन रेशीम अधिकारी, अमरावती यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा