शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सादर करण्यास दि. 16 डिसेंबर, पर्यंत मुदतवाढ

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज सादर करण्यास दि. 16 डिसेंबर, पर्यंत मुदतवाढ

       अमरावती, दि.29: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या शासकीय वसतिगृहात प्रवेश आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शासनाच्या https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेली आहेत.

            शैक्षणिक संस्थामध्ये काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीया अद्यापही सुरु आहेत. ही बाब लक्षात घेवून विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक सत्र 2024-25 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास दि. 16 डिसेंबर 2024 पर्यंत यापुर्वी मुदतवाढ देण्यात आली आहे.

            अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे दिलेल्या मुदतीत अर्ज सादर केलेले आहेत आणि या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचे पुन्हा नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी स्वाधार योजनेचा लाभ घेतला असुन अभ्यासक्रमांच्या पुढच्या वर्षासाठी अशा विद्यार्थ्यांना सुध्दा संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी.

            विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, सद्यस्थितीत स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी तसेच नव्याने स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करतांना तांत्रिक अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी संघटना आणि क्षेत्रिय स्तरावरील अधिकारी यांनी या योजनेचे अर्ज भरण्यात मुदतवाढ देण्याबाबत आयुक्तालयास मागणी केलेली आहे. या बाबी विचारात घेता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 16 डिसेंबर, 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. दिलेल्या वाढीव मुदतीत पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचे अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन भरणे आवश्यक आहे.

            तेव्हा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांनी दि.16 डिसेंबर, 2024 पर्यंत या योजनेचे अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन भरण्यात यावे. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे, यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

                                                                                                       ०००००

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पिक स्पर्धा सहभागी होण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

 

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पिक स्पर्धा

सहभागी होण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

        अमरावती,दि. 28: पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या हंगामात रब्बी हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकरी विविध प्रयोग करतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते. ते अधिक उमेदीने नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पुढे येतात. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक होवून जिल्ह्याच्या उत्पादनात भर पडेल, यासाठी कृषि विभागातर्फे पिक स्पर्धा घेण्यात येत आहे.

            पिक स्पर्धेतील जिल्ह्याकरिता रब्बी हंगामातील स्पर्धेसाठी ज्वारी, गहू,हरभरा,करडई व जवस पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे आणि ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. तसेच एकावेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. लाभार्थीचे शेतामध्ये त्या पिकाखालील किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये, तर आदिवासी गटासाठी 150 रूपये राहणार आहे.ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम दि. 31 डिसेंबर 2024 आहे.

पिकस्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासह प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा आणि अनुसूचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.

            तालुका पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले पाच हजार रूपये, दुसरे तीन हजार रूपये, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 10 हजार रूपये, दुसरे सात हजार रुपये, तिसरे पाच हजार रूपये बक्षीस असणार आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 50 हजार  रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये बक्षीस असणार आहे.

            पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा,तसेच पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा,असे आवाहन कृषी आयुक्तालय पुणेचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

०००००

बुधवार, २७ नोव्हेंबर, २०२४

इयत्ता दहावीच्या गणित व विज्ञान उत्तीर्णतेच्या विषयाच्या निकषाबाबत सूचना जारी.

 

इयत्ता दहावीच्या गणित व विज्ञान उत्तीर्णतेच्या विषयाच्या निकषाबाबत सूचना जारी.

            अमरावती,दि. 27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10,वी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. यावर्षी या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररीत्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक,  विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटक यांनी घ्यावी, असे राज्य मंडळ पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

            अमरावती, दि. 27 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाळ राज्यमंडळ,पुणे यांनी कळविले आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण, द्विलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा) मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी ते मंगळवार दिनांक 18 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दिनांक 24 जानेवारी ते सोमवार दिनांक 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये घेण्यात येतील.

            माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेण्यात येतील. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हाट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून प्रसारित झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, असेही राज्य मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

0000

पशुधन क्षेत्राच्या विकासासाठी 21 व्या पशुगणनेस सुरुवात

                                पशुधन क्षेत्राच्या विकासासाठी 21 व्या पशुगणनेस सुरुवात

            अमरावती,दि.27:केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या मार्फत व सलग्न पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दि. 25 नोव्हेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 21 वी. पशुगणना संपूर्ण जिल्ह्यामध्ये पशुधनाच्या संख्येबाबत सर्वसमावेशक माहीती गोळा करण्यासाठी पशुगणना हे एक महत्वाचे साधन आहे.

            त्या अनुषंगाने पशुगणनेची उद्दिष्टे बहुआयामी असून पशुधन क्षेत्र सुधारण्यासाठी असलेल्या कार्यक्रमाचे योग्य नियोजन, सुसुत्रिकरण, अमंलबजावणी बाबतचे देखरेख सुलभ करण्याच्या अनुषंगाने 21 वी. पशुगणना एकविसाव्या पशुगाने सुरुवात झाली आहे सांख्यिकीय माहितीसाठी पशु गणना अचूक होणे आवश्यक आहे. पशु गणनेसाठी पशुपालक गौशाळा चालक व नागरिकांनी यात सहभागी होऊन प्रगणकास अचूक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

             पशुगणना ही दर पाच वर्षांनी होत असून, पशुधनाबाबत व विविध पशुधन प्रजातीची लोकसंख्या, त्यांची जात, वय, आणि लिंग यासह तपशीलवार आणि अचूक माहिती गोळा करणे हे पशुधानाचे उद्दिष्ट असुन, पशुक्षेत्राचा विकास आणि सुधारणा करण्याच्या धोरणे कार्यक्रम उपक्रमाबाबतचे नियोजन या करीता पशुगणनाची आवश्यकता असल्याने व पशुगणनेची माहिती घेताना पशुधनाशी संबधित कार्यक्रम व योजनाची प्रभावी अमंलबजाणी ही पशुधनाच्या संख्येवर अवलबून असुन,

            पशुगणनेच्या अनुषगांने क्षेत्रिय स्तरावर प्रगणक व पर्यवेक्षक हे नेमलेले असून, त्यांचे द्वारे प्रत्येक पशुपालकाच्या घरी जावून जनावरांना टँगीग करुन जनावराबाबतचा तपशीलाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. यामध्ये गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, वराह, घोडा, गाढव, उंट, ई. पाळीव प्राणी तथा पक्षांची माहीती गोळा केली जाणार आहे. प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये नेमलेले प्रगणक घरोघरी जावून माहीती घेणार आहेत. ग्रामीण भागामध्ये 3 हजार कुंटुबा मागे एक प्रगणक व शहरी भागामध्ये 4 हजार कुंटुबा मागे एक प्रगणक या प्रमाणे नियुक्ती करण्यात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या मध्ये सहभागी होवून योग्य माहीती द्यावी असे ही आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी केले आहे.

०००००

मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०२४

विभागीय आयुक्तालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

 


विभागीय आयुक्तालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

अमरावती, दि. 26 :  संविधानिक मुल्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आज सकाळी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.

यावेळी अपर आयुक्त संजय पवार, उपायुक्त गजेंद्र बावणे, संतोष कवडे, राजू फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, सुशील आग्रेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारले. या घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय संविधान व त्यातील मुल्य, हक्क-अधिकार व कलम यासंबंधी सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाने जिल्ह्यात संविधान मंदिरांची उभारणी केले असल्याचे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना श्रीमती पाण्डेय यांनी उजाळा दिला.

0000


सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४

इयत्ता दहावीच्या गणित व विज्ञान उत्तीर्णतेच्या विषयाच्या निकषाबाबत सूचना जारी.

 

इयत्ता दहावीच्या गणित व विज्ञान उत्तीर्णतेच्या विषयाच्या निकषाबाबत सूचना जारी.

            अमरावती,दि. 25 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10,वी परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयांकरिता मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणे उत्तीर्णतेचे निकष असणार आहेत. यावर्षी या निकषात बदल होतील त्यावेळी मंडळामार्फत स्वतंत्ररीत्या कळविण्यात येईल, याची नोंद सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक,  विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटक यांनी घ्यावी, असे राज्य मंडळ पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

 

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांची वेळापत्रक जाहीर

 

फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांची वेळापत्रक जाहीर

            अमरावती,दि.25: फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,छत्रपती संभाजी नगर,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण यांना विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12,वी व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10,वी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा पुढील प्रमाणे

            उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12,वी परीक्षा सर्वसाधारण व्दिलक्षी व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा,लेखी व प्रात्यक्षिके परीक्षेचा कालावधी मंगळवार दि. 11 फेब्रुवारी 2025 ते मंगळवार दि. 18 मार्च 2025 असा राहील. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच (एन.एस.क्यु.एफ) अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी शुक्रवार दि. 24 जानेवारी 2025 सोमवार 10 फेब्रुवारी 2025 असा राहील. माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र 10,वी परीक्षेचा कालावधी शुक्रवार दि.21 फेब्रुवारी 2025 ते सोमवार दि. 17 मार्च 2025 असा राहील. प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचा  सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2025 ते गुरुवार 20 फेब्रुवारी 2025 असा राहील.

            उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांक/निहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscbord.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.21 नोव्हेंबर 2024 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. यासंदर्भात  संबंधितांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळ पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०२४

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याबाबत सूचना.

 मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याबाबत सूचना.

          अमरावती, दि. 22 :राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजना सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईनरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे.

            तथापि, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अडचणी निर्माण झाल्या अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यशासनाने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती ऑफलाईन पद्धतीने मंजूर करून अदा करण्यास मान्यता दिलेली आहे. त्याकरिता शासन निर्णयामध्ये विहित कार्यपद्धती अवलंबविण्यात आलेली आहे.यानुषंगाने योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी व महाविद्यालय यांनी संबंधित जिल्हयांचे सहायक, आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.विविध स्तरावर ऑफलाईन अर्ज स्विकारण्याकरिता खालीलप्रमाणे वेळापत्रक दिलेले आहे.

            उपरोक्त योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे दि.30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे.तसेच संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी अर्जाची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांसह 31 जानेवारी 2025 पर्यंत अन्वेषण प्रस्ताव सादर करावे.

            सन 2018-19 ते 2023-24 पर्यंत महाडीबीटी प्रणालीमार्फत वरील योजना राबविण्यात येत असल्यातरी पोर्टलद्वारे अर्ज करतांना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरूनही अर्ज महाडीबीटी एडमिन कडून अर्ज ऑटो रिजेक्ट होणे, अर्जाची आधार नोंदणी न करता अर्ज भरणे, एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहीत वेळेत न लागल्यामुळे अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरूनही पुढच्या वर्षीचा अर्ज नुतनीकरण करण्यास अडचण येणे अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेचा लाभ देता येत नाही.

            तेव्हा, सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत असलेल्या अर्जाचे ऑफलाईन प्रस्ताव विहित नमुन्यात उपरोक्त दिलेल्या मुदतीत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन, अमरावती विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, (समाज कल्याण) सुनिल वारे, विभागातील संबंधित सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांचे प्राचार्य यांना केले आहे.

०००००

लोकशाही भवनात मतमोजणीची तयारी पूर्ण

 लोकशाही भवनात मतमोजणीची तयारी पूर्ण

अमरावती, बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी

अमरावती, दि. 22 : विद्यापीठ रस्त्यावरील लोकशाही भवनात अमरावती आणि बडनेरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. पोस्टल बॅलेट, ईटीपीबीएमएस आणि ईव्हीएम वरील मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 मतमोजणी होणार आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघातील 345 आणि 23 सहायक मतदानकेंद्रावर मतदान घेण्यात आले आहे. या सर्व मतदानकेंद्रावर ईव्हीएमद्वारे झालेले मतदान मतमोजणीकरीता प्रत्येक फेरीसाठी 14 टेबल, तसेच पोस्टल मतपत्रीकेची मतमोजणी करण्याकरीता 10 आणि ईटीपीबीएमएसकरीता 1 याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आहे.

            मतमोजणी वेळी याठिकाणी गर्दी होणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक आयोगामार्फत सौरभ स्वामी यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी निरीक्षक मतमोजणी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून त्याची पाहणी करतील. मतमोजणीची माहिती देण्यासाठी मिडीया कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी कळविले आहे.

00000

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

अमरावती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवनात

 

अमरावती विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी लोकशाही भवनात

            अमरावती दि. 21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी झाले. त्या अनुषंगाने अमरावती विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 23 नोव्हेंबरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ रोड वरील लोकशाही भवन येथे होणार आहे.

            भारत निवडणूक आयोगाच्या पत्राअन्वये लोकशाही भवन, संत गाडगेबाबा, अमरावती विद्यापीठ रोड अमरावती यास मतमोजणी केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणी केंद्रावर अनुषंगिक सोयी सुविधा व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

            23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया सकाळी 8.00 वाजता पासून सुरू होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना लोकशाही भवन परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी दिली आहे.

००००००

बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ; अमरावती विभागातील 30 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 59.22 टक्के मतदान





वृत्त क्र. 203                                                                         दिनांक: 20 नोव्हेंबर 2024

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024

अमरावती विभागातील 30 मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत

सरासरी 59.22 टक्के मतदान

 

अमरावती, दि. 20 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत अमरावती विभागातील 30 विधानसभा मतदारसंघात सरासरी 59.22 टक्के मतदान झाले आहे.

अमरावती जिल्ह्यातील 8 मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धामनगाव रेल्वे-57.20 टक्के, बडनेरा- 53.73 टक्के, अमरावती - 50.32 टक्के, तिवसा - 53.21 टक्के, दर्यापूर- 59.90 टक्के, मेळघाट -64.57 टक्के, अचलपूर -67.53 टक्के, मोर्शी- 64.74 टक्के

 

अकोला जिल्ह्यातील 5 मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

अकोट - 57.60 टक्के, बाळापूर - 58.30 टक्के, अकोला पश्चिम - 54.45 टक्के,

अकोला पूर्व -51.28 टक्के, मुर्तिजापूर- 60.08

 

बुलडाणा जिल्ह्यातील 7 मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

मलकापूर -61.85 टक्के, बुलडाणा -57.90 टक्के, चिखली - 62.28 टक्के, सिंदखेड राजा -62.55 टक्के, मेहकर - 64.76 टक्के, खामगाव – 67.31 टक्के, जळगाव जामोद -63.32 टक्के

 

यवतमाळ जिल्ह्यातील 7 मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

वणी - 63.73 टक्के, राळेगाव - 67.75 टक्के, यवतमाळ - 53.40 टक्के, दिग्रस - 65.33 टक्के,

आर्णी - 62.07 टक्के, पुसद- 57.72 टक्के, उमरखेड- 60.38

 

वाशिम जिल्ह्यातील 3 मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

रिसोड -60.18 टक्के, वाशिम - 56.87 टक्के, कारंजा -55.22 टक्के

 

                                                                     00000




विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी अमरावती विभागात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.22 टक्के मतदान

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी

अमरावती विभागात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 59.22 टक्के मतदान

 

         अमरावती, दि. 20 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात सरासरी 59.22 टक्के मतदान झाले आहे.

 

        अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

         अमरावती -58.48 टक्के, अकोला- 56.16 टक्के, यवतमाळ- 61.22 टक्के, बुलढाणा- 62.84 टक्के, 



वाशिम -57.42 टक्के मतदान झाले आहे.

 

0000

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०२४

निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

 

निवृत्ती वेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

          अमरावती,दि.19: कोषागारामधुन निवृत्तीवेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन/कुटुंबनिवृत्तीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर राज्य निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येते की, माहे नोव्हेंबर महिन्यात संबधित बँक शाखेत निवृत्तीवेतनधारकांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांनी त्यांच्या पेन्शन संबंधित बँक शाखेत जाऊन कोषागार कार्यालयाकडून प्राप्त असलेल्या बँकेच्या निवृत्तीवेतनधारकांच्या हयात यादीवरच स्वाक्षरी करावी. तसेच विहीत नमुन्यात संपूर्ण माहिती भरावी (बँकेत जातांना आधार कार्ड, पॅन कार्ड मोबाईल नबंर सोबत घेउन जावे). निवृत्तीवेतनधारकांनी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 चे निवृत्ती वेतन काढता येणार नाही. ह्यातीचे प्रमाणपत्र ई-मेल द्वारे सादर करू नये, असे केल्यास ते स्वाकारले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

          तसेच जीवन प्रमाण पोर्टल वर तयार झालेले हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारले जातात त्यामुळे अशा प्रमाणपत्राच्या मुद्रित प्रती सादर करू नये. असे दिल्यास ते देखील स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार व कोषागार अधिकारी अमोल इंखे (नि.वे.) यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

०००००

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करा



 लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी मतदान करा

                               -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे आवाहन

अमरावती, दि. 19 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता उद्या, 20 नोव्हेंबर रोजी सर्वत्र मतदान आहे. मतदान प्रक्रिया सकाळी 7 वाजता सुरु होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागातील सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केले आहे.

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने निवडणुकीत सहभाग नोंदवत लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी पुढे यावे. मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर पोहोचून शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने मतदान करावे, असेही आवाहन डॉ. पाण्डेय यांनी सर्व मतदारांना केले.

0000

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी विभागीय मदत केंद्र स्थापन

 


निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी

विभागीय मदत केंद्र स्थापन

 

·        मदतीसाठी 0721-2662062 संपर्क क्रमांक जाहीर

 

अमरावती, दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय पातळीवर स्वतंत्र मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिली आहे. मतदान पथकांना येणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी 0721-2662062 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला असून संबंधितांनी यावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

            निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोयी-सुविधांसाठी कर्तव्यनिष्ठ कर्मचारी अभियानांतर्गत या मदत कक्षाची विभागीय पातळीवर विभागीय आयुक्त कार्यालयात स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या आरोग्य विषयक समस्या, भोजन व्यवस्था, निवास व्यवस्था, परिवहन व्यवस्था इत्यादी अनुषंगिक बाबींवर निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण या मदत कक्षाव्दारे करण्यात येणार आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत 24 तास हा मदत कक्ष कार्यरत राहणार आहे. याची नोंद निवडणूक कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले.

0000

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याबाबत सूचना.

 मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याबाबत सूचना.

          अमरावती, दि. 18 :राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजना सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईनरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे.

            तथापि, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अडचणी निर्माण झाल्या अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यशासनाने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती ऑफलाईन पद्धतीने मंजूर करून अदा करण्यास मान्यता दिलेली आहे. त्याकरिता शासन निर्णयामध्ये विहित कार्यपद्धती अवलंबविण्यात आलेली आहे.यानुषंगाने योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी व महाविद्यालय यांनी संबंधित जिल्हयांचे सहायक, आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.विविध स्तरावर ऑफलाईन अर्ज स्विकारण्याकरिता खालीलप्रमाणे वेळापत्रक दिलेले आहे.

            उपरोक्त योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे दि.30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे.तसेच संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी अर्जाची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांसह 31 जानेवारी 2025 पर्यंत अन्वेषण प्रस्ताव सादर करावे.

            सन 2018-19 ते 2023-24 पर्यंत महाडीबीटी प्रणालीमार्फत वरील योजना राबविण्यात येत असल्यातरी पोर्टलद्वारे अर्ज करतांना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरूनही अर्ज महाडीबीटी एडमिन कडून अर्ज ऑटो रिजेक्ट होणे, अर्जाची आधार नोंदणी न करता अर्ज भरणे, एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहीत वेळेत न लागल्यामुळे अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरूनही पुढच्या वर्षीचा अर्ज नुतनीकरण करण्यास अडचण येणे अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेचा लाभ देता येत नाही.

            तेव्हा, सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत असलेल्या अर्जाचे ऑफलाईन प्रस्ताव विहित नमुन्यात उपरोक्त दिलेल्या मुदतीत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन, अमरावती विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, (समाज कल्याण) सुनिल वारे, विभागातील संबंधित सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांचे प्राचार्य यांना केले आहे.

०००००

 

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन अमरावती, दि. 08 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 14.34 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या 22.44 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल. कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10 नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील. लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा. मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. उपसा सिंचन धारकांनी (उदा. कालवा, नदी व नाले) पाणी मंजुर करून घेवूनच उपसा सिंचनास पाणी वापर करावा. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 20 टक्के दर लागू असेल. पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल. शेतचारा स्वच्छ ठेवा कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही. लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील. थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही. वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणी पाळी कालावधीत वाढ होते. रब्बी हंगाम 2024-25 संभाव्य पाणी पाळी नियोजन कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी दि. 15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 (15 दिवस) तर कालवा बंद कालावधी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2024 राहील. दि. 7 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 कालव्यात (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 22 ते 28 डिसेंबर 2024 कालवा बंद राहील. दि. 29 डिसेंबर ते दि. 1 जानेवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 13 ते 19 जानेवारी 2025 कालवा बंद राहील. दि. 20 ते दि. 3 फेब्रुवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 4 ते दि. 10 फेब्रुवारी 2025 कालवा बंद राहील. दि. 11 ते 25 फेब्रुवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर दि. 26 फेब्रुवारी ते दि. 4 मार्च 2025 कालवा बंद राहील. कालव्यात एकूण 75 दिवस पाणी सोडण्यात येईल. जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे. 000000

 

‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी पाच पाणीपाळ्या प्रस्तावित

शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 08 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी  पाणीसाठा उपलब्ध असून पाच पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

       उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून  14.34 किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या  22.44 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार  ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान पाच वेळा पाणी मिळेल.

       कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10  नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात  नोव्हेंबर 2024 अखेरपर्यंत  या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

            इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

             मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. उपसा सिंचन धारकांनी (उदा. कालवा, नदी व नाले) पाणी मंजुर करून घेवूनच उपसा सिंचनास पाणी वापर करावा. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 20 टक्के  दर लागू असेल.

पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

शेतचारा स्वच्छ ठेवा

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

     लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.

थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणी पाळी कालावधीत वाढ होते.

 

रब्बी हंगाम 2024-25 संभाव्य पाणी पाळी नियोजन

कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी  दि. 15 नोव्हेंबर  ते 29 नोव्हेंबर 2024  (15 दिवस) तर  कालवा बंद कालावधी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2024 राहील. दि. 7 डिसेंबर 2024 ते 21 डिसेंबर 2024 कालव्यात  (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 22 ते 28  डिसेंबर 2024  कालवा बंद राहील. दि. 29 डिसेंबर ते  दि. 1 जानेवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 13 ते 19 जानेवारी 2025 कालवा बंद राहील.  दि. 20 ते  दि. 3  फेब्रुवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर  दि. 4 ते दि. 10 फेब्रुवारी 2025  कालवा बंद राहील. दि. 11  ते 25 फेब्रुवारी 2025 (15 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर दि. 26 फेब्रुवारी ते दि. 4 मार्च 2025 कालवा बंद राहील.  कालव्यात एकूण 75 दिवस पाणी सोडण्यात येईल.

जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000