महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी एकूण
१८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघांत २ हजार ४१९
मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, १० लाख ६८ हजार ७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार
आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
या पाचही मतदारसंघातील विद्यमान
सदस्यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने भारत निवडणूक आयोगाने
जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक घेण्यात येत आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून,
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर
२०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
#विधानपरिषदनिवडणूक
#पदवीधर
#शिक्षक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा