मुक्त
विद्यालय मंडळाच्या इयत्ता
पाचवी व आठवी
साठी प्रवेश प्रक्रिया सुरु
अमरावती, दि. ७ : महाराष्ट्र राज्य मुक्त
विद्यालय मंडळाच्या इयत्ता ५ वी व ८ वीसाठी नव्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या
विद्यार्थ्यांकरीता ऑनलाइन पध्दतीने नावनोंदणी व प्रवेश अर्ज प्रक्रिया सुरू
करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ५
ऑक्टोबर पासून २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत
ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. असे पुणे येथील महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय
मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी कळविले आहे.
ऑनलाइन नावनोंदणी केल्यानंतर
विद्यार्थ्यांनी २२ ते ३० ऑक्टोबर
२०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्जाची प्रत, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे
संबंधित संपर्क केंद्र शाळेत जमा करावीत. त्यानंतर संपर्क केंद्र शाळांनी
विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व संबंधित माहिती २ नोव्हेंबर रोजी संबंधित
विभागीय मंडळाकडे जमा करावयाची आहे.
या कालावधीत विद्यार्थ्यांची ऑनलाइन
नावनोंदणी करण्याबाबत संबंधित संपर्क केंद्र शाळांचे प्रमुख/मुख्याध्यापक यांनी
विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व
कागदपत्रांबाबत आवश्यक कार्यवाही करून त्याची माहिती संबंधित विभागीय मंडळाकडे
वेळेत सादर करावी, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी कळविले
आहे.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा