शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२६

 

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी

आज ४ उमेदवारांची ४ नामनिर्देशनपत्रे दाखल

 

         अमरावती, दि. ३ : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज शनिवार ३ ऑक्टोबर २०२६ रोजी ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकुण संख्या ६ झाली आहे. 

         आज नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये अशोक वामन हिवाळे (अपक्ष), दिलीप भिमराव कडू (अपक्ष) गाजी मोहम्मद जाहेरोश (वंचित बहुजन आघाडी) आणि आशिष मनोहर अंबुलकर (अपक्ष) यांचा समावेश असून आज ७ व्यक्तींनी १५ नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे. 

     रविवार ४ ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रांची उचल तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

            भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. बुधवार ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, शुक्रवार ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

 

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा