सोमवार, ५ ऑक्टोबर, २०२६

 

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी

आज ११ उमेदवारांची १८ नामनिर्देशनपत्रे दाखल

 

         अमरावती, दि. ५ : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी आज सोमवार ५ ऑक्टोबर २०२६ रोजी ११ उमेदवारांनी १८ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकुण संख्या १६ झाली आहे.

          आज नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये दिलीप भिमराव कडू ( अपक्ष), डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे ( अपक्ष+अपक्ष), दत्तात्रय श्रीराम लहाने ( शिवसेना उबाठा+ पक्ष नमुद नाही -तीन अर्ज), सुरेश बाबुराव देवकर ( समाजवादी गणराज्य पार्टी + अपक्ष ) गजानन गोविंदराव डोके ( भारतीय जनसम्राट पार्टी) भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव ( भाजपा+ अपक्ष) , सुनील दुर्गादास राठोड ( अपक्ष), सुमित सुरेशराव पवार ( अपक्ष) , गजानन रामचंद्र उल्हे ( अपक्ष), किरणराव रामराव सरनाईक ( शिवसेना+अपक्ष), अविनाश मधुकर बोर्डे ( अपक्ष +अपक्ष) यांचा समावेश असून आज १५ व्यक्तींनी ३० नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे.

          भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रांची उचल तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

     नियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार बुधवार ७ ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, शुक्रवार ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे.

 

--००--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा