बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

 

अमरावती विभाग शिक्षक निवडणूक

छाननीअंती ३० उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली;

तर एका उमेदवाराचे अवैध

 

          अमरावती दि. ७ - विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या ३१ उमेदवारांपैकी ३० उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे आज झालेल्या छाननीमध्ये वैध ठरविण्यात आली. तर एका उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. त्यामुळे छाननीअंती या निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या ३० झाली आहे. अशी माहिती अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी दिली.

          भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार ७ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांच्या कार्यालयातील सभाकक्ष क्र. २, तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प अमरावती येथे करण्यात आली. यावेळी निवडणूक निरीक्षक अभय महाजन, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) संजय जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

          या छाननीमध्ये ३० उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आली त्यामध्ये अदिती ऋषिकेश पोहरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), किरणराव रामराव सरनाईक (शिवसेना), दत्तात्रय श्रीराम लहाने (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ), प्रा.अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), गजानन गोविंदराव ढोके (भारतीय जनसम्राट पार्टी), प्रिती हर्षल रेवणे (राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी), सुरेश बाबुराव देवकर (समाजवादी गणराज्य पार्टी), अविनाश मधुकर बोर्डे (अपक्ष), अशोक वामन हिवाळे (अपक्ष), आशिष मनोहर अंबुलकर (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष), किरण अर्जून चौधरी (अपक्ष), किरण अर्जून पवार (अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), दिलीप भिमराव कडू (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष), डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे (अपक्ष), भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव (अपक्ष), मिलिंद तुकाराम ब्राह्मणे (अपक्ष), राजेशकुमार शालिग्राम कड (अपक्ष), रामदास संपतराव कटक (अपक्ष), विनोद प्रल्हाद कडू (अपक्ष), श्रीकांत गोवींद देशपांडे (अपक्ष), श्रीकृष्ण सुर्यभान पहुरकर (अपक्ष), सजील खान खलील खान (अपक्ष), सुनील दुर्गादास राठोड (अपक्ष), सुमित सुरेशराव पवार (अपक्ष), डॉ. सौ. संगीता सचिंद्र शिंदे- बोंडे (अपक्ष), प्रा.डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष) आणि हेमलता दिलीपसिंग मुणोत (अपक्ष) यांचा समावेश आहे.

          यावेळी छाननीमध्ये गाजी मोहम्मद जाहेरोश (वंचित बहुजन आघाडी) यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. छाननी अखेर आता ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात शुक्रवार ९ ऑक्टोबर, २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

 

*****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा