मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२६


#महाड #चवदारतळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्कांविषयी जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सार्वजनिक उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांतील पात्र पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार असून, राज्यस्तरावर प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही गटांसाठी विद्यापीठ स्तरावर स्वतंत्र पारितोषिके देण्यात येतील. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ७ हजार ५०० आणि ५ हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी. मराठी किंवा इंग्रजी भाषेत स्वहस्ताक्षरात लिहिलेला निबंध ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करण्यासाठी आणि स्पर्धेचे नियम, अटी व सविस्तर माहितीसाठी https://dbaspratishthan.in या अधिकृत संकेतस्थळा भेट द्यावी.

कृषी, पशुविज्ञान, मत्स्यविज्ञान आणि आरोग्यविषयक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक समता, बंधुता आणि न्यायाची मूल्ये रुजविण्यास हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
#निबंधस्पर्धा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा