बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

 

निवडणूक विशेष

मंगळवार ६ ऑक्टोबर

 

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी

आज शेवटच्या दिवशी २० उमेदवारांची २९ नामनिर्देशनपत्रे दाखल

 

            अमरावती, दि. ६ : विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी, आज मंगळवार ६ ऑक्टोबर २०२६ रोजी २० उमेदवारांनी २९ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. दरम्यान आज २ व्यक्तींनी ६ नामनिर्देशनपत्रे उचल केली आहेत. आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकुण संख्या ३१ झाली आहे.

            आज नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सुमित सुरेशराव पवार (अपक्ष), उपेंद्र बाबाराव पाटील (शिवसेना+अपक्ष), संगीता सचिंद्र शिंदे- बोंडे (भाजपा+२अपक्ष), विनोद प्रल्हाद कडू (अपक्ष), दिलीप भिमराव कडू (अपक्ष),सजील खान खलील खान (अपक्ष), श्रीकृष्ण सुर्यभान पहुरकर (अपक्ष), अदिती ऋषिकेश पोहरे ( भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस- ३), भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव (भाजपा+अपक्ष), प्रा.डॉ. संतोष श्रीकृष्ण हुशे (अपक्ष), नितीन सुभाषराव आगे (अपक्ष -३),प्रिती हर्षल रेवणे ( राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी+अपक्ष), गजानन रामचंद्र उल्हे (अपक्ष), मिलिंद तुकाराम ब्राह्मणे (अपक्ष), किरण अर्जून चौधरी (अपक्ष), हेमलता दिलीपसिंग मुनोत (अपक्ष),किरण अर्जून पवार (अपक्ष), राजेशकुमार शालिग्राम कड (अपक्ष), प्रा.अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी), रामदास संपतराव कटक (अपक्ष) यांचा समावेश आहे.

            भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्रांची छाननी बुधवार ७ ऑक्टोबर, २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकारी, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांच्या कार्यालयातील सभाकक्ष क्र. २, तळमजला, विभागीय आयुक्त कार्यालय, कॅम्प अमरावती येथे करण्यात येईल. तसेच उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या त्याच्या कोणत्याही प्रस्तावकाला किंवा निवडणूक प्रतिनिधीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहआयुक्त (सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्याकडे त्यांच्या कार्यालयात शुक्रवार ९ ऑक्टोबर, २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

 

*******

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा