शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

 

विभागीय आयुक्तांनी घेतला

विविध क्रीडा सुविधांचा आढावा

 

अमरावती, दि. 14 : विभागीय क्रीडा संकूल येथे बास्केटबॉल, मल्लखांब, टेनिस खेळांचा सरावासाठी खेळाडूंना सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या. रनिंग ट्रॅकच्री दुरुस्ती, वुडनकोर्टची दुरुस्ती तसेच देखभाल करण्यात यावी. अशा सुचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक गणेश जाधव यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित होते.

या बैठकीमध्ये विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडुंसाठी विविध क्रीडा सुवीधांच्या उभारणीस विभागीय आयुक्तांनी मान्यता  दिली. यामध्ये 400 मीटर धावनपथाचे नुतनीकरण, खेळाडुसांठी प्रसाधनगृह, संपूर्ण आऊटडोअर स्टेडीयममध्ये पब्लीक ॲड्रेस सांऊड स्स्टिीम, खेळाडुंसाठी पिण्याचे पाण्याची सुविधा, बॉस्केटबॉल मैदानास रिटेनींग वॉल बांधकाम करणे, रुफटॉप सोलर यंत्रणेची उभारणी करणे, एअर कुलींग नुतनीकरण, कॅफेटेरीयाची उभारणी करणे त्याच प्रमाणे खेळाडुंसाठी लॉकरची व्यवस्था करणे इ. बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.

****






बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्वलागृह योजनेच्या प्रस्तांवाना 24 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्वलागृह योजनेच्या

प्रस्तांवाना 24 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 12 : महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, बुलडाणा यांचेमार्फत केंद्र पुरस्कृत स्वाधार व उज्वलागृह योजनेच्या प्रस्तांवाना मान्यता देण्यासाठी प्रकल्प मंजूरी बाबतचा प्रस्ताव दाखल करणेबाबत अंतिम मुदत दि. 24 जुलै 2020 देण्यात आलेली होती. परंतू प्रस्ताव दाखल करण्यासाठी सामाजिक संस्थांना कमी कालावधी असल्यामुळे हे प्रस्ताव सादर करण्यासाठी दि. 24 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बुलडाणा यांनी कळविले आहे.

****

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

चराईत जमा झालेल्या गुरांची 12 ऑगस्ट रोजी विक्री

 

चराईत जमा झालेल्या गुरांची

12 ऑगस्ट रोजी विक्री

अमरावती, दि. 10 : मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभागाच्या अधिनस्त जारिदा परिक्षेत्रातील अवैध चराईमध्ये सरकार जमा करण्यात आलेल्या 31 गुरांची 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता द्विलिफाफा पध्दतीने विक्री करण्यात येणार आहे. या विक्री प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बोली धारकास पाच हजार रुपयांची रक्कम निविदा फॉर्म भरतेवेळी धनाकर्ष/रोखीने सादर करावी लागेल. बोलीधारकांनी त्यांचे अर्ज 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत कार्यालयात सादर करावे असे उपवनसंरक्षक यांनी कळविले आहे.

किटकनाशकाची शिफारशीनुसार व काळजीपूर्वक फवारणी करावी

 

कृषी सहसंचालकाचे शेतकऱ्यांना आवाहन

किटकनाशकाची शिफारशीनुसार व

काळजीपूर्वक फवारणी करावी

अमरावती, दि. 10 : सध्या खरीपाचा हंगाम सुरु असून पीक फवारणीच्या अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कपाशी व इतर पीकांवर किटकनाशकाची फवारणी करतात. शेतकऱ्यांनी शिफारशीत असलेली किटकनाशकाची फवारणी करणे, योग्य मात्रा वापरणे तसेच फवारणी करतांना काळजी घ्यावी असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले.

पिकांवर फवारणी करतांना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी

किटकनाशके खरेदी करतांना परवानाधारक किटकनाशके विक्रेताकडूनच खरेदी करावी. तसेच खरेदी पूर्वी किटकनाशकांच्या पॅकींगवरील लेबल, बॅच नंबर, उत्पादन तारीख, अंतीम तारीख व सिल तपासून घ्यावे. किटकनाशंकाची साठवणूक त्यांचे मूळचे पॅकींग/वेष्टणात ठेवावीत. तसेच साठवतांना त्यांचा वातावरणाशी सरळ संबध येणार तसेच लहान मुलांशी संबध येणार  नाही याची काळजी घ्यावी. द्रावण तयार करतांना तसेच फवारणी करतांना संरक्षक कपडे उदा. ॲप्रान, गॉगल, मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड, गमबुट, इत्यादी वापरावेत. किटकनाशके आपले शरीराच्या कोणत्याही भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले नाक, डोळे, कान व हात उडणाऱ्या औषधांपासून संरक्षीत राहतील याची संपूर्ण काळजी घ्यावी. वापरा विषयक सूचनांचे अवलोकन केल्याशिवाय मिश्रण तयार करु नये. फवारणी करतांना शिफारशीत नसलेल्या किटकनाशके/पिक वाढ संजिवके (PGR) यांचे मिश्रण करु नये. फवारणी करतांना शरीरास अपायकारक ठरतील असे कामे करु नयेत. खाणे पिणे, धुम्रपान करणे, तंबाखु खाने, फवारणीच्या कालावधीमध्ये अजिबात करु नये. एकाच व्यक्तीकडून सतत किटकनाशकाची सतत फवारणी करणे टाळावे. तसेच फवारणी झाल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी व कपडे बदलावे, फवारणी करीता वापरलेले कपडे परत न धुता वापरु नये, असे आवाहन विभागीय आयुक्त व विभागीय कृषि सहसंचालक यांनी केले आहे.

****

 

 

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आकार’प्रकल्प 251 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन आकार’प्रकल्प

251 विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

 

अमरावती, दि. 6: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकिय, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता यावा यासाठी आदिवासी विकास विभाग, आकार बहुउद्देशिय ग्रामणि विकास संस्था, नागपूर आणि आकार ग्रुप हिंगणा यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘मिशन आकार’प्रकल्पाचा 251 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्याकरिता NEET,III-JEE,MH-CET या प्रेवश परिक्षांच्या 10 दिवसांचे ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. या ऑनलाईन वर्गामध्ये धारणी, पांढरकवडा, पुसद, किनवट, कळमनुरी, औरंगाबाद व अकोला येथील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

          या रिव्हिजन वर्गामध्ये डॉ. आशिष दर्यापूरकर आय.आय.टी.मुंबई, डॉ. सचिन बोंगावार, एम.एससी (रसायनशास्त्र), डॉ. विरेंद्र सांगोडे एम.एससी, श्रीमती मिनाक्षी एम. टेक, श्री. धनराज लांजे (रसायनशास्त्र), श्रीमती सुषमा गौतम एम.एससी (गणित) या तज्ञ प्राध्यपकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

****


इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी नविन परीक्षा केंद्र मागणीचे प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत सादर करावे.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी

नविन परीक्षा केंद्र मागणीचे प्रस्ताव

31 ऑगस्ट पर्यंत सादर करावे.

 

अमरावती, दि. 6 : शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षांसाठी नविन परीक्षा केंद्राच्या मागणीचे प्रस्ताव 31 ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहे. नविन प्रस्ताव अर्जाचे शुल्क एक हजार रुपये असून 31 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज विक्री व अर्ज स्विकृत करण्यात येतील अशी माहिती विभागीय सचिव अनिल पारधी यांनी दिली.

****


शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
अमरावती, दि. 1 : विभागीय आयुक्त कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
यावेळी नाझर श्री. पेटे आणि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार, २८ जुलै, २०२०

उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल होणार जाहिर


उद्या दुपारी एक वाजता दहावीचा निकाल होणार जाहिर
* संकेतस्थळावर मिळणार निकाल
अमरावती, दि. 28 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षांचा निकाल बुधवार, दि. 29 जुलै 2020 रोजी दुपारी एक वाजता जाहिर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर त्यांचा निकाल बघता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या www.mahresult.nic.in www.sscresult.mkcl.org www.maharashtraeducation.com www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर बुधवार, दि. 29 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहिर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी दिली.
ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्या त्यांने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय परीक्षेपासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
        अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. प्रविष्ठ विद्यार्थी गुणपडताळणीसाठी दिनांक 30/07/2020 ते 08/08/2020 पर्यंत व छायाप्रतीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्ट 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे भरू शकतील.
मार्च 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
मार्च 2020 च्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) उपलब्ध राहतील, असेही कळविण्यात आले आहे.
00000

शनिवार, २५ जुलै, २०२०

राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी

 राज्यात गेल्या 10 वर्षातली विक्रमी कापूस खरेदी

मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

अमरावती, दि. 25 :  राज्यात कोरोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने विक्रमी 218.73 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.  काल 23 जुलै रोजी या संदर्भात मंत्रिमंडळाने या कापूस खरेदीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्धल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सहकार व पणन मंत्र्यांचे अभिनंदन केले. गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी खरेदी झाल्याचे प्रधान सचिव, पणन अनुप कुमार यांनी एका सादरीकरणाद्धारे सांगितले.

या खरेदीचे एकूण मुल्य 11,776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,029.47 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.  तसेच सीसीआय ने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.

राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने कोव्हिड-19 च्या प्रादुभावापूर्वी अनुक्रमे 91.90 व 54.03 लाख क्विंटल अशी एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली.

कोव्हिड-19 च्या प्रादुभावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्यामुळे, शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता.  त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून कोव्हिड-19 च्या काळात सीसीआय व कापूस पणन महासंघाने आतापर्यंत अनुक्रमे 35.70 व 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी 418.8 लाख क्विंटल झाली असून वास्तविक पहाता 410 लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती.  एकूण 8 लाख 64 हजार 72 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.

-----०-----

गुरुवार, २३ जुलै, २०२०

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन


अमरावती, दि. 23 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात लोकमान्य बाळगंगाधर टिळक जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
*****




*****