बुधवार, ११ ऑक्टोबर, २०२३

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

अमरावतीदि. 10 : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 14 ऑक्टोबर 2023 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईलअसेही अपर जिल्हा दंडाधिकारी विवेक घोडके यांनी कळविले आहे.

000000

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.बारावी) फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखा जाहीर

 उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.बारावी) फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेची

आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखा जाहीर

 

अमरावतीदि. 10  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रु-मार्च 2024 परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची असून त्यासंबंधीच्या तारखा मंडळाव्दारे जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे आवेदन अर्ज 6 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्क भरुन सादर करता येईल, असे शिक्षण मंडळाव्दारे कळविण्यात आले आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ठ होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावयाची असून त्यांच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे आहे.

उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला, व वाणिज्य शाखांची नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा तसेच व्यवसाय अभ्यासक्रम (HSC Vocational Stream) शाखांचे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer Of Credit घेणारे विद्यार्थी) आदी विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे नियमित शुल्कासह 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरपर्यंत भरता येईल.  

उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी परीक्षा शुल्क RTGS द्वारे भरणा करणे वRTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट जमा करावयाची तारीख नंतर कळविण्यात येईल याची सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुख/ प्राचार्य यांनी नोंद घ्यावी.

सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज (College Login) मधून Pre-list उपलब्ध करून दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याची प्रिंट काढून आवेदनपत्रात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्याची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत प्राचार्य यांनी प्रिलिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.

इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.

शासननिर्णय क्र. गव्ह.१५१७/प्र.क.१९/संगणक, दि. १४/०८/२०१७ नुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे स्किारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची नोंद आवश्यक आहे. सदर Saral Database वरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरावयाची आहेत. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational)/औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) नियमित विद्यार्थ्यांची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे नियमित पध्दतीने ऑनलाईनच भरावयाची आहेत, याची नोंद घेण्यात यावी, असे राज्य मंडळ पुणेच्या सचिव, अनुराधा ओक, यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

विभागीय आयुक्तालयात सोमवारी लोकशाही दिन

 

विभागीय आयुक्तालयात सोमवारी लोकशाही दिन

अमरावती, दि. 05 :  विभागीय लोकशाही दिन सप्टेंबर महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी (दि. 9 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात लोकशाही दिन होईल.

विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी आपले अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०२३

दहावी व बारावीच्या खाजगी परिक्षार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी फॉर्म नं. 17 भरण्यास 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत

 दहावी व बारावीच्या खाजगी परिक्षार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी   

फॉर्म नं. 17 भरण्यास 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत

 

        अमरावती दि. 03 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र( इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी फॉर्म नं. 17 भरुन परीक्षेस प्रविष्ठ होण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने नियमित शुल्काने स्विकारण्याचा कालावधी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

जे विद्यार्थी उपरोक्त मुदतीत नाव नोंदणी करु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने विलंब व अतिविलंब शुल्काने सादर करावयाची सुविधा राज्य मंडळाकडून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

इयत्ता दहावी विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 100 रुपये व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 25 रुपये विलंब शुल्क 15 ऑक्टोबर पर्यंत भरुन नाव नोंदणी करता येईल. तसेच अतिविलंब शुल्क 20 रुपये भरुन 31 ऑक्टोबरपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन नाव नोंदणी करता येईल.

खाजगी विद्यार्थ्यांनी इ. दहावी व इ. बारावीसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाईन अर्ज स्विकारला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढीलप्रमाणे संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर मराठी/इंग्रजीमधून उपलब्ध आहेत, त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी. इयत्ता दहावी http://form१७.mh-ssc.ac.in, इयत्ता बारावी http://form१७.mh-hsc.ac.in

विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत), नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञा पत्र, आधारकार्ड, स्वतःचा पासपोर्ट आकारातील फोटो स्वत:जवळ ठेवावा. ऑनलाईन अर्ज भरतांना सदर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावयाची आहेत. कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्कॅनर/मोबाईलद्वारे कागदपत्रांचे फोटो काढून ते अपलोड करावेत. विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी पुढील संपर्कासाठी अनिवार्य (Compulsory) आहे.

संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर भरलेल्या अर्जाची प्रत विद्यार्थ्याला अर्जात नमूद केलेल्या ई-मेल वर पाठवावी. तसेच संपूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंटआऊट, शुल्क पावती व हमीपत्र यासह दोन प्रतीत काढून घ्यावी.

            विद्यार्थ्यांनी अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे नावनोंदणी अर्जावर नमूद केलेल्या माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विहीत मुदतीत जमा करावीत. खाजगी विद्यार्थ्यासाठी नावनोंदणी शुल्काचा तपशील पुढीलप्रमाणे इ. दहावी रु 1000/- नोंदणी शुल्क रु. 100, इ. बारावी रु 600/- नोंदणी शुल्क रु. 100 आहे. यासंबंधी महत्वाच्या पुढीलप्रमाणे दिल्या आहेत.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यास त्याच्या पत्त्यानुसार व त्याने निवडलेल्या माध्यमनिहाय माध्यमिक शाळांची यादी दिसेल त्यापैकी विद्यार्थ्याची पूर्वीची शाळा किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळची माध्यमिक शाळेची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या माध्यमिक शाळेने प्रकल्प, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, श्रेणी विषयासंदर्भातील कामकाज व अनुषंगिक मूल्यमापन करावयाचे आहे. याबाबत सर्व माध्यमिक शाळांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे. या वर्षापासून संपर्क केंद्र पध्दत बंद करण्यात आली असल्याने मान्यताप्राप्त सर्व शाळांमधून खाजगी विद्यार्थी अर्ज स्विकारणे अनिवार्य आहे, याची सर्व मान्यताप्राप्त शाळांनी नोंद घ्यावी व उचित कार्यवाही करावी.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे. नावनोंदणी करताना विद्यार्थ्याचा पत्ता, त्याने निवडलेलली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी दिसेल त्यामधील विद्यार्थ्याची शाळा/कनिष्ठ महाविद्यालय किंवा पत्त्यानुसार सर्वात जवळच्या शाळेची/कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्याने करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा दयावयाची आहे. याबाबत सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना विभागीय मंडळांनी मार्गदर्शन करावे.

इ.दहावी व इ.बारावी फेब्रु-मार्च 2024 खाजगी विद्यार्थी फॉर्म नं 17 नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking द्वारे) भरणे अनिवार्य राहील. ऑनलाईन पध्दतीने शुल्क जमा केल्यानंतर विद्यार्थ्याला पोचपावती प्राप्त होईल. सदर पोच पावती स्वत:कडे ठेवून त्याच्या दोन छायाप्रती माध्यमिक शाळेस/कनिष्ठ महाविद्यालयास देण्यात याव्यात. तसेच एकदा नावनोंदणी अर्ज सादर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव नावनोंदणी शुल्क विद्यार्थ्याला परत केले जाणार नाही. तसेच नाव नोंदणी अर्जात दुरुस्ती करावयाची (उदा. माध्यम, शाखा, माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय अथवा अन्य कारणास्तव) असल्यास विद्यार्थ्यास पुनःश्च नावनोंदणी शुल्क ऑनलाईन जमा करावे लागेल याची नोंद घ्यावी.

दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकीत्सकांच्या/प्राधिकृत केलेल्या रुग्णालयाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी व आवश्यकतेनुसार विभागीय मंडळ/माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडून माहिती प्राप्त करुन घ्यावी.

ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२०-२५७०५२०७/२५७०५२०८/२५७०५२७१ वर संपर्क साधावा.

विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र (Eligibility Certificate) ऑनलाईन देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयाकडून निर्धारित कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी.

पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे (Examination Application Form) मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. 14 खाजगी विद्यार्थी विलंब/अतिविलंब शुल्काने नावनोंदणी करण्याकरिता अंतिम मुदत ही दि. 31 ऑक्टोबर 2023 असणार आहे. यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घेवून उचित कार्यवाही करावी, असे राज्य मंडळ, पुणेच्या सचिव, अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग

 सत्यशोधक समाजाने दिला बहुजनांना विवेकी जगण्याचा मार्ग

 

Ø  महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाचा शतकोत्तरी

     सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा


Ø  अधिकारी व कर्मचारी यांना सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकाचे वाटप

 

            अमरावती दि. 25 : महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने बहुजन समाजाला विवेकी पद्धतीने जीवन जगण्याचा मार्ग दिला. मनुष्याला विषमताअंधश्रद्धाअनिष्ट रूढी यापासून परावृत्त करून उच्च मुल्यांवर आधारित पर्यायी संस्कृती तयार करून दिली. जन्ममृत्यूविवाह अश्या सर्व संस्कारांचे विवेकीकरण करणेनिर्मिकाला सर्व लोक समान असल्याचा संदेश देणे हे सत्यशोधक समाजाच्या कार्याचे महत्वाचे योगदान आहे. त्यामुळे बहुजन समाजाला शिक्षणाची प्रेरणा मिळत गेलीत्यामुळे आजही सत्यशोधक समाजाची तत्वे कालसुसंगत आहेत असे प्रतिपादन महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी केले.

महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाला 150 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आजच्या काळात सत्यशोधक समाजाचे महत्व या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होतेयावेळी प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे बोलत होते. महाराष्ट्राच्या सामाजिकशैक्षणिक क्षेत्रात सत्यशोधक समाजाचा मोठा प्रभाव पडला त्यामुळे बहुजनांना शिक्षण देणाऱ्या अनेक शिक्षण संस्था उदयाला आल्या तसेच अनेक सुधारणावादी चळवळीचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात देखील सत्यशोधक समाजाच्या विचारांना स्थान आहेत्यातूनच बहुजन कल्याणाच्या विविध योजना शासन तयार करीत आहे असे देखील शिरसाठे म्हणाले.

सत्यशोधक समाजाने पत्रकारितामहिला शिक्षण अश्या क्षेत्रात देखील मोठे योगदान दिल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मा.राजेश खवले यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी सत्यशोधक चळवळ जलास्याच्या माध्यमातून देश विदेशात पसरली आणि त्यातून शिक्षण चळवळीला हातभार लागला याचे सविस्तर विवेचन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाज्योतीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगेलेखाधिकारी रश्मी तेलेवारसहाय्यक लेखाधिकारी जयश्री बोदेले उपस्थित होते.

महाज्योती कार्यालयात सत्यशोधक समाजाचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरी करताना  कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सार्वजनिक सत्य धर्मपुस्तकाचे वाटप देखील करण्यात आले.

00000

 

‘सेवा महिना’ अंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सेवा-सुविधांचा लाभ

 ‘सेवा महिना’ अंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सेवा-सुविधांचा लाभ

·         16 ऑक्टोंबरपर्यंत विविध लोकाभिमूख उपक्रमांचे आयोजन

·         विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी विशेष शिबिराचे आयोजन

·         नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 25 :  राज्यात 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत ‘सेवा महिना राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शासनाच्या विविध कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना देणे तसेच योजनांचा लाभ घेण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘सेवा महिनाअंतर्गत  विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. या सेवा महिन्यात एकूण 25 सेवांचा समावेश राहणार असून त्याअंतर्गत आधारकार्ड व पॅनकार्ड अपडेशन, आधारकार्ड व पॅनकार्डची नवीन नोंदणी तसेच नवीन मतदार नोंदणी करणे आदी सेवा नागरिकांना पुरविण्यात येणार आहे. यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात येत्या बुधवारी (ता.27 सप्टेंबर) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा विभागातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप आयुक्त (सामान्य प्रशासन) संजय पवार यांनी केले आहे.

नवीन आधारकार्ड काढणे व आधारकार्ड अपडेशन करण्याकरीता तसेच नवीन पॅनकार्ड काढणे व पॅनकार्ड अपडेशन करण्याकरीता ओळखीचा पुरावा (पॅनकार्ड/ राशनकार्ड/वोटरआय.डी./पासपोर्ट/ड्राइविंग लाइसेंस), पत्त्याचा पुरावा (छायाचित्रासह मतदार ओळखपत्र/नवीन वीज बिल/पासपोर्ट/चालक परवाना), जन्म तारखेचा पुरावा (जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला) इ. कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.

घरातील मुलगा/मुलगी यांच्या नवीन मतदार नांव नोंदणीकरीता जन्म पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टीफिकेट, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, घरातील नात्यातील (आई, वडील, भाऊ, वहीण) यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ट असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स प्रत, घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे जसे की, जन्म पुरावा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टीफिकेट, रहिवासी पुरावा, आधारकार्ड, दोन पासपोर्ट साईज फोटो, माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला, माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला, पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स, लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला इ. कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील, असे श्री. पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

सेवा महिन्यात मिळणाऱ्या विविध सेवा-सुविधा

            या सेवा महिना कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टल, महावितरण पोर्टल, डी. बी. टी. पोर्टल, नागरी सेवा केंद्र,सार्वजनिक तक्रार पोर्टल (पब्लिक ग्रिव्हियन्स पोर्टल), कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या व प्रलंबित असलेल्या सर्व अर्जांचा मोहिम स्वरुपात निपटारा करण्यात येणार आहे.

            यामध्ये तांत्रिक अडचणीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रलंबित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे. पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे. (अपिल वगळून), नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म-मृत्यू नोंद घेणे व प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे आदी सेवांचा आता यामध्ये अंतर्भाव करण्यात आला आहे.

            सेवा महिन्यामध्ये सर्व शासकीय विभांगाकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करण्याच्या व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

00000

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना

 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन योजना

 

महाडीबीटी पोर्टल अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

              अमरावती दि. 25 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येते. राज्यामध्ये ब-याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. याचे कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे (Dense & Over Crowded Canopy) इ. बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे.

                  नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही 2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने सदरचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिक्कु या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम रू.40,000/- प्रति हे. ग्राह्य धरून त्याच्या 50 टक्के प्रमाणे जास्तीत-जास्त रक्कम रु.20000/- प्रति हेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल 2 हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरूज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय खालीलप्रमाणे राहील.

                  आंबा फळपिकासाठी फळपिकाचे कमीतकमी 20 वर्षे तर जास्तीत जास्त 50 वर्षे, चिकूसाठी पिकाचे कमीतकमी 25 वर्षे तर जास्तीत जास्त 50 वर्षे, संत्रा पिकासाठी कमीतकमी 10 वर्षे तर जास्तीत जास्त 25 वर्षे, मोसंबीसाठी कमीतकमी 8 वर्षे तर जास्तीत जास्त 25 वर्षे असावे.

                 तरी, याव्दारे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. या योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.

000000

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

 आरोग्य, पोषण आणि स्वच्छता यावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे

                                                                               -  अविश्यांत पंडा

निपाणी येथे अमृत कलश यात्रा

            अमरावती, दि.22 : 'मेरी मिट्टी, मेरा देश' अभियानांतर्गत जिल्ह्यात अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत मातीविषयी प्रेम आणि  देशभक्तीच्या भावनेसोबतच गावाच्या शाश्वत विकासासाठी आरोग्य,पोषण, स्वच्छता या तीनही विषयावर एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

       ग्रामपंचायत पिंपरी निपाणी येथे 'मेरी मिट्टी, मेरा देश' अभियानांतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. पंडा बोलत होते.  श्री. पंडा यांच्या हस्ते 'सर्वांसाठी घरे ' अंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत मंजूर असलेल्या भूमीहिन लाभार्थ्यांना इ वर्ग जमिनीमधील नमुना आठ मालकीपत्राचे मोफत वितरण यावेळी करण्यात आले. सोबतच 'आयुषमान भारत' अंतर्गत गोल्डन कार्ड तर पोषण महासप्ताहाचे औचित्य साधत  गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना सकस आहार कीटचे वाटप करण्यात आले.

        अमृत कलशाचे मंगल पूजन करत पालखी, बैलगाडी, ढोल -ताशे, लेझिम पथक आणि टाळ मृदंगाच्या नादात, उत्साहाच्या वातावरणात गावातून अमृत कलश यात्रेची मिरवणूक काढत माती गोळा करण्यात आली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आदी महापुरुषांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांचा उत्साह लक्ष वेधून घेणारा होता.

        समारोपीय कार्यक्रमामध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पिंपरी निपाणी गावाला अमरावती विभागामधे द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांनी गावकर्‍यांचे कौतुक केले. यावेळी सरपंच योगिता रिठे, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर, महिला बालविकास अधिकारी विरेंद्र गलपट, तालुका आरोग्य अधिकारी स्वप्नील मालखेडे, गटशिक्षणाधिकारी श्री. शेंडे, विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव , सामाजिक कार्यकर्ते सचिन रिठे, विशाल रिठे आदी उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश नाटकर यांनी केले .संचालन श्री.बरदिवे यांनी तर  व आभार  विठ्ठल जाधव यांनी मानले.

****

 ‘भगाडी’ तलावावर संस्था नोंदणीसाठी प्रस्ताव आमंत्रित

 

 

अमरावती, दि. 21 :  अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील 500 हे. खालील पाटबंधारे-जलसंधारण विभागांतर्गत असणारा भगाडी तलाव’ (96 हे.) हा तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या तलावावर 3 जुलै 2019 च्या शासन निर्णयानुसार मच्छिमार संस्था नोंदणी करावयाची असल्यामुळे तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व महिला यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

त्यानुसार भगाडी तलाव (96 हे.) या तलावावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिला यांनी सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था), अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाव्दारे करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी ही जाहिरात सूचना प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासुन 30 दिवसांच्या आत संस्था नोंदणीकरीता प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त सुरेश भारती यांनी जाहीर सूचनेव्दारे केले आहे.

00000

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

'आयटीआय'चा दीक्षांत समांरभ थाटात संपन्न आत्मसात केलेल्या कौशल्याचा उपयोग समाज हितासाठी करावा - सहसंचालक प्रदिप घुले

 'आयटीआय'चा दीक्षांत समांरभ थाटात संपन्न

 

आत्मसात केलेल्या कौशल्याचा उपयोग समाज हितासाठी करावा

                 - सहसंचालक प्रदिप घुले

 

अमरावती, दि. 18 : प्रत्येक विद्यार्थ्याच्या कौशल्याचे कौतुक होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही आत्मसात केलेल्या तांत्रिक शिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदिप घुले यांनी आज केले.

 माजी प्रशिक्षणार्थीनी एकत्र ऐवुन आपल्या संस्थेसाठी ॲल्युमिनी तयार क











रुन संस्थेचा विकास करायला हवा. त्यांचे हे कार्य येणाऱ्या पीढीसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरणार, असा आशावादही श्री. घुले यांनी व्यक्त केला.

रविवारी, (ता.17 सप्टेंबर) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित कौशल्य दीक्षांत समारंभ कार्यक्रमात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये संस्था स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमवारीत आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व इतर ट्रेडच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी श्री. घुले अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

सर्वप्रथम 'गर्जा महाराष्ट्र' या राज्य गीताने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते आयटीआय मधील प्राविण्यप्राप्त एकूण 55 प्रशिक्षणार्थींना पदवीदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासहीत सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व प्रमुख अतिथींनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. या समारंभाच्या अध्यक्षपदी अमरावती विभागाचे सहसंचालक (व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण) श्री. प्रदिप घुले हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये तंत्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक डॉ. विजय आर. मानकर, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महल्ले, सहायक संचालक रविंद्र लोखंडे, गुक्स इंडस्ट्रीलचे डॉ. संजय सुपे, श्री. इंगळे (अस्पा बंड संन्स) उद्योजिका सौ. रंजना बिडकर, अमरावती आयटीआयचे उपसंचालक संजय बोरकर, प्रभारी उपप्राचार्य संजय बोराडे या समारंभात उपस्थित होते.           

यावेळी गीत गायन समिक्षा थोरात यांनी केले. शिल्पनिदेशक सुरेंद्र भांडे यांनी सुत्रसंचालन केले तर संस्थेचे उपसंचालक संजय बोरकर आभर मानले. संजय बोराडे यांनी प्रास्ताविकातून आयटीआयमध्ये सुरु असलेल्या विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेतील गटनिदेशक, शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

शुभम गेडाम, ओम कावलकर, कार्तीक अवसरमोल,  राम राऊत, कु. प्रिया, सागर आडे, साक्षी चावरे, पायल पंडित, प्रणय सावरकर, स्वप्निल कोळसकर आदींना मान्यवरांच्या हस्ते ड्राफ्टमन मेकॅनिक पदवी प्रदान करण्यात आली. तसेच इतर विद्यार्थी- विद्यार्थींनींना पदवी प्रमाणत्रांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.