शुक्रवार, १२ जून, २०२६

 


बालरुग्णांसाठी ‘कर्करोग निदान सुविधा’ अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्यामुळे ९४ बालकांच्या आणि त्यांच्या पालकांच्या जीवनात नवी उमेद जागविण्याचे प्रेरणादायी काम झाले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सुविधेचे कौतुक केले आहे.

अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने २०२५-२६ मध्ये शिक्षण, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांमध्ये सीएसआरच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये शिक्षण क्षेत्राला विशेष प्राधान्य असले तरी आरोग्य क्षेत्रातही महत्वाचे काम केले आहे. देशभरातील कर्करोगाचा संशय असलेल्या बालरुग्णांसाठी तातडीची निदान सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाअंतर्गत अफकॉन्सने टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून ‘Emergency Diagnostic Support for Children with Suspected Cancer’ या योजनेसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या सहाय्यामुळे देशभरातील ९४ बालकांना कर्करोगाचे तातडीने निदान आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध होऊ शकल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा