राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष ‘रक्षा अलंकरण’ सोहळ्यात शहीद जवान #प्रवीणजंजाळ यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ प्रदान करण्यात आले. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्यावतीने त्यांच्या पत्नी श्रीमती श्यामबाला जंजाळ व आई श्रीमती शाहू प्रभाकर जंजाळ यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्राच्या #अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील रहिवासी तथा महार रेजिमेंटच्या पहिल्या बटालियन, राष्ट्रीय रायफल्सचे शिपाई प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच अन्य केंद्रीय मंत्री, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
#कीर्तीचक्र
#शहीद #वीरजवान
#KirtiChakra


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा