नागरी सेवा परीक्षा २०२७ पूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा जाहीर
सविस्तर माहितीसाठी www.siac.org.in संकेतस्थळ उपलब्ध
अमरावती, दि. ३ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२७ च्या पूर्व प्रशिक्षणाकरिता अमरावती येथील 'भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र' (युपीएससी) यांच्यातर्फे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. राज्यस्तरावरून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या या प्रवेश परीक्षेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्राच्या संचालिका डॉ. प्रतिभा भोरजार यांनी केले आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज भरण्याचा कालावधी १ ते १७ जून २०२६ पर्यंत असणार आहे. तसेच परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम मुदत १९ जून २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे. ही ऑफलाइन प्रवेश परीक्षा १९ जुलै २०२६ (रविवार) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत घेतली जाईल. या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना ह्या www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा