गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६

 


राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये बालकांचे #कुपोषण रोखण्यासाठी तसेच गर्भवती आणि स्तनदा मातांना पोषण व आरोग्यविषयक सुविधा अखंडितपणे उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अंगणवाड्यांना दररोज भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा आणि दुष्काळी परिस्थितीत अंगणवाड्या सुरू ठेवण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी विविध जिल्ह्यांतील समस्या जाणून घेतल्या.

यावेळी विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सहसचिव वि. रा. ठाकूर, सहआयुक्त संगीता लोंढे, अवर सचिव सरदार उपस्थित होते. आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी विभागाच्या कामकाजाचे सादरीकरण केले.

#
दुष्काळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा