सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्चला होणार

 

राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्चला होणार

 

अमरावती, दि. 14 : विधी सेवा प्राधिकरणातर्फे 12 मार्चला राष्ट्रीय लोकअदालत होणार असून, संबंधितांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणातर्फे संपूर्ण राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

ग्रामीण भाग स्वयंपूर्ण करण्यासाठी विकासकामांना गती - राज्यमंत्री बच्चू कडू








 

ग्रामीण भाग स्वयंपूर्ण करण्यासाठी विकासकामांना गती

                                                                     - राज्यमंत्री बच्चू कडू

अचलपुर ग्रामीण भागात 15 कोटी 45 लक्ष रुपयांच्या

निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

 

        अमरावती, दि. 11 :  नागरिकांसाठी आवश्यक सोई-सुविधांच्या निर्मितीने ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. त्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती प्रक्रिया पुर्ण करण्यावर भर देण्यात येईल. ग्रामीण भागात रस्ते निर्मिती, काँक्रिटीकरण, अद्ययावत सुविधायुक्त शाळा, रुग्णालये, सभागृहे, इमारती इत्यादींची निर्मिती, परिसराचे सौंदर्यीकरण इत्यादी कामांमधून ग्रामीण भागांचा विकास घडवुन आणण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी दिली.

            अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात आज (दि.11) विविध शासकीय योजनेअंतर्गत प्राप्त  15 कोटी 45 लक्ष रुपयांच्या निधीतुन श्री कडू यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जिवनपूरा येथे 1 कोटी 40 लक्ष रुपयांच्या निधीतुन विविध विकास कामांचे भूमिपूजन

            अचलपूर नाका ते मालवेशपूरा गेट रस्ता रुंदीकरणाचे, डांबरीकरणाचे काम 75 लक्ष रुपयांच्या निधीतुन करण्यात आले. जिवनपूरा येथे बाल गणेश मंदिर, गजानन मंदिर, शीतला माता मंदीर परिसरात 28 लक्ष रुपयांच्या निधीतुन निर्माण करण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण श्री कडू यांनी केले. बाहेकर यांच्या घरापर्यंत, नागोबा मंदीर ते दत्त मंदिर पर्यंत  रस्त्याचे काँक्रीटीकरण, श्रीरामबाबा मंदिर येथे रंगकाम विद्युत फीडिंग व शौचालयाची निर्मितीचे काम, विठ्ठल मंदिर परिसराचे सौंदर्यीकरणाचे 37 लक्ष रुपयांच्या निधीतुन विकासकांमांचे भूमिपूजन आज श्री कडू यांनी केले.

बुंदेलपुरा येथे 29 लक्ष रुपयांच्या निधीतुन विकासकामे

            येथिल कलंका मंदिराच्या मागील सभागृहाचे 5 लक्ष, हनुमान मंदिर परिसरात 10 लक्ष रुपये निधीतुन सभागृहाचे काम, भोई समाजासाठी 10 लक्ष रुपये निधीतुन सभागृहाची निर्मिती, सिद्धेश्वर मंदिर परिसरात सभागृहाचे 4 लक्ष रुपयांच्या निधीतुन बांधकामाचे भूमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

विलायतपुरा येथे 72 लक्ष निधीतुन विकासकामे

येथिल दानाखोरी प्रभागातील विठ्ठल मंदिरापर्यतच्या रस्त्याचे बळकटीकरण 4 लक्ष निधीतुन, हनुमान मंदिरासमोर, आदीवासी  समाजासाठी सभागृह 25 लक्ष रुपये निधीतुन, महादेव मंदीर, मनकर्ण संस्थान, पोळा चौक, कलिका माता मंदीर ते विलापुर मज्जित पर्यंत रस्त्याचे काम व विलायतपुरा येथिल राजु सोनवणे यांच्या घरासमोरील परिसराचे सौंदर्यीकरणाचे 43 लक्ष रुपयांतुन भूमिपूजन आज करण्यात आले.

बावनीपूरा/सुलतानपूर येथे 30 लक्ष निधीतुन विकासकामे

येथिल भोंडे यांच्या घरासमोर न.प. च्या खुल्याजागेवर, सुल्तानपुरा, अचलपूर व बालाजी मंदिर  परिसरात सभागृहाच्या निर्मितीच्या 30 लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले.

 

 हिरापूर येथे 71 लक्ष निधीतुन व  बागवानपूरा येथे 13 लक्ष निधीतुन विविध कामे करण्यात येणार असल्याचे श्री कडू यांनी सांगितले. येथिल हनुमान मंदीर हिरापूरा, अचलपूर येथे सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष निधीतून, 8 लक्ष रुपयांच्या निधीतून हिरापूर येथे  सभागृह बांधकाम करणे , 35 लक्ष रुपये निधीतून शादीखाना निर्माण करणे , हिरापूर येथिल दुर्गापूर रस्ता कॉक्रीटीकरण करणे 6 लक्ष, हिरापूर येथील लाल हनुमान मंदिराचे बाजूला लादिकरण व चैन्लिंग फेन्सिंगचे काम, हनुमान मंदिर ते नंदू भूस्कते रोडवर लादिकरणाचे 10 लक्ष रुपयांच्या काम, 5 लक्ष रुपयांच्या निधीतून अमृतकर ते जर्फाबदी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे , येथील खोलापूरे ते मेन रोड पर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे 8 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमीप आज श्री कडू यांनी केले.

दुल्हागेटे येथे 132 लक्ष निधीतुन विकासकामे  तर बिलनपूरा येथे 25

लक्ष निधीतुन    बियाबानी येथे 15 लक्ष निधीतुन व आदी विकासकामांना सुरुवात

72 लक्ष निधीतून दुल्हा गेट ते श्रीकृष्ण पूल ते गांधी पूल मुख्य रस्ता बांधकाम लांबी 1.800 किमी , 60 लक्ष निधीतून दुल्हा गेट ते चावलमंडी चौक ते गांधी पूल मुख्य रस्ता बांधकामाचे  भूमिपूजन,येथिल शनी मंदिर सभागृह बांधकाम  12 लक्ष निधींतून, बिलनपूरा अचलपूर येथे श्री.देशमुख ते पंचवटे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे 5 लक्ष निधीतून, डॉ. सालकर यांच्या घरामागील रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे 8 लक्ष निधीतून,येथिल मुशाब्बर पठाण यांच्या घरासमोर खुल्या जागेवर सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष, डॉ. जाहिद दवाखान्यासमोर खुल्या जागेवर सभागृह बांधकाम करणे 5 लक्ष.

दिलदारपूरा येथिल बुध्देगा चौक ते बजरंगबली महाराज दिलदारपूरा पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 4 लक्ष, बुध्देखा चौक येथिल विविध ठिकाणी लादिकरण 10 लक्ष, लोहार लाईन येथिल हत्तीवले रामंदिर परिसरामध्ये स्वचालाय बांधकाम करणे 2 लक्ष. फरमानपूरा येथिल जहीर बास यांचे घरासमोर इमामवाडा सभागृह बांधकाम करणे 10 लक्ष, देवळी चौक येथिल उपजिल्हा रुग्णालय ते जीवनपुरा गेट रस्याभाचे डांबरीकरण करणे 35 लक्ष. पाटीलपूरा येथिल नागोबा मंदिर सभागृह बांधकाम करणे 15 लक्ष. चावलमंडी येथिल हदाले यांचे घरी सांत्वन भेट. माळीपूरा नामदारगंज येथिल सलाम भाई ते मुस्तफा मास्टर ते हुसेन खान यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे 5 लक्ष. नामदारगंज अचलपूर येथे लाकोडे ते माकोडे यांच्या घरापर्यंत डांबरीकरणे करणे 5 लक्ष. बेगमपूरा येथिल आंबेडकर पुतळा बेगमपुरा येथे सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष. तहसिल येथिल मुस्लीम कब्रस्थान येथे आवारभिंत व शेड बांधकाम करणे 4 लक्ष. अब्दालपूरा येथिल सभागृह बांधकाम करणे 9 लक्ष. ठिकरीपूरा येथिल गुणवंत महाराज सभागृह बांधकाम करणे 12 लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

000000

 


बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२

महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यास मुदतवाढ विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावे

 

महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

                        विद्यार्थ्यांनी 15 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती दि. 9:-  सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22  या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र पुरस्कृत भारत सरकार शिष्यवृत्ती करीता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे नविन अर्ज भरण्याकरिता व अर्जाचे नुतणीकरण करण्यासाठी दिनांक 15 फेब्रुवारी 2022पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत  . htt://mahadbtmahait.gov.in हे पोर्टल विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी सुरू राहणार आहे.

सद्यस्थितीत htt://mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीकृत झाले नाहीत. याबाबत महाविद्यालयांत विद्यार्थ्यांसाठी सुचना फलक लावुन विहीत मुदतीत नोंदणीकृत अर्ज सादर करण्याची कार्यवाही करावी. तसेच पात्र अर्जदारांनी आपले अर्ज नोंदणीकृत करून ऑनलाईन महाविद्यालयांकडे सादर करावेत व महाविद्यालयांनी हे ऑनलाईन अर्ज समाज कल्याण विभागाकडे सादर करावेत. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अंतर्गत येणा-या विविध योजनांचे अर्ज व अर्जाचे नुतणीकरणासाठीचे प्रस्ताव महाविद्यालयांनी दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे सादर करावे, असे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी कळविले आहे.

                                                               00000

 

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

चिखलदरा पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी सुरु / मेळघाटातील निसर्ग पर्यटन पर्यटकांसाठी सुरु / दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरीता अमरावती विभागीय मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

 

                                चिखलदरा पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी सुरु

अमरावती दि. 8 : राज्यात कोविड-19 रोगाचा संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने गुगामल वन्यजिव विभाग चिखलदरा अंतर्गत वैराट, हरिसाल जंगल सफारी, चिखलदारा शासकीय वनउद्यान व मेमना गेट निसर्ग पर्यटनासाठी दि. 11 जानेवारी 2022 पासून पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते.

महाराष्ट शासन महसूल व वनविभाग आपत्ती व्यवस्थापण मदत व पुनर्वसन मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार गुगामल वन्यजिव विभाग चिखलदरा अंतर्गत वैराट, हरिसाल जंगल सफारी, चिखलदरा शासकीय वनउद्यान व मेमना गेट निसर्ग पर्यटनासाठी दि. 2 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात येत आहे. पर्यटकांनी प्रवेशाच्या वेळी त्यांच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील, असे मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गुगामल वन्यजीव विभाग, चिखलदराचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी कळविले आहे.

000000

वृत्त क्र. 59                                                                दिनांक: 8 फेब्रुवारी 2022

 

मेळघाटातील निसर्ग पर्यटन पर्यटकांसाठी सुरु

          अमरावती दि. 8 : राज्यात  कोविड -19 रोगाचा संसर्ग रोखण्याचे मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा अंतर्गत निसर्ग पर्यटन आमझरी संकुल  शासन आदेशानुसार संरक्षित क्षेत्रातील वन पर्यटन पुर्णत: बंद ठेवण्यात आले होते.

              अमरावती जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा अंतर्गत निसर्ग पर्यटन आमझरी संकुल लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झालेल्या पर्यटकाकरीता संरक्षित क्षेत्रात वनपर्यटना करीता दि. 2 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आले आहे. पर्यटकांनी प्रवेशाच्यावेळी त्यांचे लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक राहील  असे मेळघाट वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मधुमिथा एस. यांनी कळविले आहे.

000000

    वृत्त क्र. 60                                                              दिनांक: 8 फेब्रुवारी 2022

 

                                             दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकरीता

                               अमरावती विभागीय मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

अमरावती दि. 8 : इयत्ता दहावी व बारावीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च/एप्रिल 2022 मध्ये दिनांक 4 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीमध्ये आयोजित केली आहे. अमरावती विभागीय मंडळस्तरावर  समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून ते विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधी समस्याचे निराकरण, मार्गदर्शन, करण्यासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत पुर्णवेळ कार्यान्वीत राहील. ही सुविधा दि. 4 फेब्रुवारी 2022 पासून सुरु करण्यात आलेली आहे. भ्रमणध्वनीवरुन विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱ्या समुपदेशकांची नावे व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे.

               नेहरु हायस्कूल,वरुर ता. आकोट अकोला, वाशिमकरीता एन. आर. गोडचर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9922063636, कस्तूरबा जैन हायस्कूल, शिराळा अमरावतीकरीता डी. जी. मेटांगे, 9420187903, जनता हायस्कूल, हरम ता. अचलपूर जि. अमरावतीकरीता सी. एम. गुलवाडे 8007042402, सी. एस. कोठारी हायस्कुल, नांदुरा जि. बुलडाणाकरीता एस. एन. लाघे 9552290889, देऊळगांव राजा जि. बुलडाणाकरीता एस.एस. लालवाणी 8275232316, तथागत हायुस्कुल कोटंबा ता. बाभुळगांव जि. यवतमाळकरीता रवी शिरभाते 9404138632, बाबाराव खोडे विद्यालय, वडगाव ता. दारव्हा जि. यवतमाळकरीता एस. एम. राजगुरे 9527450385, वरिष्ठ अधिक्षक अमरावती विभागीय मंडळ अमरावतीकरीता बी. के. किन्नाके 0721-2662608 आणि एस. एम. पाचंगे, 0721-2662608 असे अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सहसचिव तेजराव काळे यांनी कळविले आहे.

0000000

 

 

 

 

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

अमरावती विभागात नवे 1090 कोरोनाबाधित

अमरावती विभागात नवे 1090 कोरोनाबाधित

 

अमरावती, दि. 4 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 1090 कोरोनाबाधित आढळून आले.

            आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 190, अकोला येथे 99, यवतमाळ 162, बुलडाणा 460 व वाशिम येथे 179 असे एकूण 1090 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

००००००

 

  

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

गावातील नागरिकांसाठी प्रस्तावित सुविधा निर्मितीची कामे गतीने पूर्ण करावी - बच्चू कडू

 












गावातील नागरिकांसाठी प्रस्तावित

सुविधा निर्मितीची कामे गतीने  पूर्ण करावी

                                                             - बच्चू कडू

चांदुर बाजार येथे 43 कोटी 63 लक्ष रुपये निधींतून  विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

अमरावती, दि. 3 : गावाच्या विकासप्रक्रियेत नागरिकांसाठी पायाभूत सुविधांची प्राधान्याने निर्मिती करण्यात येईल. या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा निधी शासन स्तरावर वेळोवेळी  उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही जलसंपदा मंत्री बच्चू कडू यांनी दिली.  गावात करण्यात येणाऱ्या विविध कामांच्या माध्यमातून नागरिकांसाठी तातडीने सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी सर्व कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश बच्चू कडू यांनी यावेळी दिले. आज (दि.3) विविध योजनेअंतर्गत प्राप्त 43 कोटी 63 लक्ष रुपयांच्या निधीतून  चांदुर बाजार तालुक्यात विविध विकास कामाचे भूमिपूजन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शारदा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता ललित बोबडे, उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे, जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता नितीन झगडे आदी उपस्थित होते.

बेलोरा येथे 85 लक्ष रुपये निधीतुन विविध कामे

बेलोरा येथे तांडावस्ती योजनेअंतर्गत मोईपूर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम, स्थानिक अहिल्याबाई होळकर नगर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत  कृषि उत्पन्न साठवण गृह गोदाम व विक्री केंद्राचे बांधकाम, मौजा बेलोरा येथे सिमेंट कॉकीट रस्ता बांधकामाचे  असे एकून 85 लक्ष रुपये निधीतुन विविध कामांचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

शिरजगाव बंड सर्कल मध्ये एकूण 27 कोटींची विकासकामे

बेलोरा,शिरजगाव बंड सर्कल मध्ये एकूण 27 कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन श्री कडू यांनी केले. चांदुर बाजार- वलगाव रस्ता,जुनी पंचायत समिती ते परसोडा फाट्याचे चौपदरीकरणाचे 13 कोटी 19 लक्ष रुपये निधीतून भूमिपूजन करण्यात आले. बेलोरा येथे युवकांसाठी उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे लोकार्पण श्री कडू यांनी केले. युवकांनी सुदृढ व मजबूत शरीरयष्टी कमविण्यासाठी या व्यायामशाळेतील आधुनिक उपकरणांचा वापर करावा. व्यायामशाळेतील उपकरणांची वेळोवेळी योग्य ती देखभाल करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.  

चिंचोली काळे, वाठोडा येथे रस्ता, नाली व सभागृहाची निर्मिती

चिंचोली काळे गावात  तांडावस्ती योजनेअंतर्गत प्राप्त 10 लक्ष रुपये निधीतुन सिमेंट रस्ता व नाली बांधकाम भुमिपुजन श्री कडू यांनी केले. वाठोडा येथे 18 लक्ष रुपयांच्या निधीतून सामाजिक सभागृह बांधकाम करणे व हनुमान मंदिर परिसरात सामाजिक सभागृह बांधकामाचे भुमिपूजन यावेळी करण्यात आले. चांदुर बाजार, नानोरी, सोनोरी, घाटलाडकी रस्त्याचे रुंदीकरणाचे काम 8 कोटीच्या निधीतून करण्यात आले. सुरळी येथे 6 कोटी 15 लक्ष रुपयांच्या निधीतुन रस्ता बळकटीकरणाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले.

वारुळी फाटा ब्राम्हणवाडा थडी येथील घाटलाडकी रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भुमिपूजन 22 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणार आहे. परसोडा येथे तांडावस्ती योजनेअंतर्गतथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम 10 लक्ष निधीतुन करण्यात येत आहे. चिंचकुंभ येथील अडगाव विचोरी तळेगाव, विण्मोरा, खेड, सायवाडा,, गणेशपुर, चिचकुंभ रस्त्यांची सुधारणा करण्याच्या कामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

 

घाटलाडकी येथे 3 कोटी 75 लक्ष रुपये निधीतुन विविध विकासकामांचे भुमिपूजन

घाटलाडकी, राजस यांचे घर ते राममंदिर पर्यंत रस्ता व बांधकामाचे लोकार्पण, कब्रस्थान, संरक्षकभिंत, ओटा व रस्ता बांधकाम करणे, शांतिनगर गवळी येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे. तांडावस्ती योजनेअंतर्गत मोईपूर येथे सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी केले. दलितवस्ती, मातंग समाज व अण्णाभाऊ साठे परिसराचे सौदर्यकरणाचे कामाचे भुमिपुजन, घाटलाडकी येथील सिमेंट कॉक्रीट रस्ता व भुमिगत गटारे बांधकाम करणे, सिमेंट कॉक्रीट जोडरस्ता बांधकामाचे, सभागृह बांधकामाचे व येथील सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे सौंदर्यीकरणासह बांधकामाचे सुमारे 3 कोटी 75 लक्ष प्राप्त निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भुमिपूजन आज श्री कडू यांनी केले.

       ब्राम्हणवाडा येथे विकासकांमांचे भुमिपूजन

बाम्हणवाडा थडी येथे 61 लक्ष निधीतून मोठया पुलाचे बांधकाम, तांडावस्ती योजनेअंतर्गत 5 लक्ष निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम, नागोवा तांडा येथे 4 लक्ष रुपये निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम करणे, 90 लक्ष रुपये निधीतून सिमेंट कॉक्रीट रस्ता व भुमिगत गटारे बांधकाम, 60 लक्ष रुपयांच्या निधीतुन सभागृहाचे बांधकाम, 51 लक्ष रुपयांच्या निधीतुन सिमेंट कॉक्रीट रस्त्याचे सौंदर्यीकरणासह बांधकाम करणे, सभागृह व नाली बांधकामाचे भुमिपूजन श्री कडू यांनी आज केले.

000000000

 

बुधवार, २ फेब्रुवारी, २०२२

अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावे

अनुसूचित जमातीच्या युवकांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन

                           20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 2 : एकात्मिक आदिवासी कार्यालयाकडून केंद्रशासनाकडून प्राप्त निधीतून मंजूर योजनांचे वित्तीय मापदंड, लक्षांक आणि अंमलबजावणीच्या पध्दतीनुसार योजना राबविण्याचे निर्देश आहेत. त्याबाबत त्याअनुषंगाने अकोला,वाशिम,बुलडाणा या जिल्ह्यांकरिता ज्या योजना राबविणे प्रस्तावित आहे अशा योजनांमध्ये निकषाधारीत बदल करुन सुधारीत मार्गदर्शक सूचना अमरावती येथील अपर आयुक्त आदिवासी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांना मंजूरी मिळण्याच्या अधिन राहून खालिल योजनांकरीता आदिवासी लाभार्थी / प्रशिक्षणार्थीचे विहित नमुण्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील लाभाथ्यांना जंगलातील वनोपज मालावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण देणे (अनिवासी) या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी वनहक्क कायद्याअंतर्गत लाभ मिळालेल्या जमिनीचे प्रमाणपत्र (वन पटा)किंवा शेतीचा 7/12,आठ अ.,दारिद्रयरेषेचे कार्ड, जातीचा दाखला (उपविभागीय अधिकाऱ्याने दिलेला असावा), आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, 2 छायांकित फोटो, या पुर्वी लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्रसादर करणे आवश्यक आहे.

आदिवासी युवकांना सुरक्षा रक्षकाचे प्रशिक्षण देणे (अनिवासी), , आदिवासी युवकांना अग्निशमन व सुरक्षादल विषयक प्रशिक्षण देणे(अनिवासी) आणि आदिवासी युवकांना वार्डबॉयचे प्रशिक्षण देणे (अनिवासी) या योजनेचा लाभ घेण्याकरीता पूढील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

दारिद्रयरेषेचे कार्ड, जातीचा दाखला (उपविभागीय अधिकायाने दिलेला असावा), 10वी/12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, 2 छायांकित फोटो, या पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रतिज्ञापत्र,प्रशिक्षणार्थी किमान वय 18 ते 35 असावे, शाररिक पात्रता-उंची 165 से.मी व वजन 50 कि.ग्रॅ. छाती न फुगवता 81 सेमी फुगवुन 86.5 सेमी असावे.

या योजनांकरिता इच्छुक अनुसूचित जमातीच्या विदयार्थी/लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प अकोला न्यु राधाकिसन प्लॉट माहेश्वरी भवन जवळ महसूल भवन, अकोला) येथे सादर करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत शासकीय सुटीचे दिवस सोडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला येथून प्राप्त करुन परिपूर्ण भरून सादर करावे. तसेच योजनांच्या मार्गदर्शक सुचनांना मंजूरी मिळण्याचे  अधिन राहून योजना राबविण्यात येत असल्या कारणाने जर अपवादात्मक परिस्थित योजना राबविणे शक्य नसल्यास झाल्यास कार्यालयात प्राप्त अर्ज मंजूर करण्याचे किंवा रद्द करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवले आहे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी कळविले आहे.

000000

 

  

दहावीची परीक्षा 15 मार्च तर बारावीची 4 मार्च पासुन सुरू

 

दहावीची परीक्षा 15 मार्च तर बारावीची 4 मार्च पासुन सुरू 

 

अमरावती, दि. 2 : मार्च-एप्रिल 2022 मध्ये इयत्ता दहावी व बारावी लेखी व अन्य परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहे.

इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दि. 4 मार्च ते 30 मार्च पर्यंत, प्रात्यक्षिक परीक्षा दि. 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम इयत्ता बारावी परीक्षा लेखी परीक्षा दि. 4 मार्च ते दि. 30 मार्च 2022 पर्यंत, प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी दि. 14 फेबुवारी ते गुरुवार दि. 3 मार्च, इयत्ता दहावीची लेखी परीक्षेचा कालावधी दि. 15 मार्च 2022 ते 4 एप्रिल 2022 राहणार आहे. या परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे निर्धारित मुदतीत घेऊन नियमानुसार कोणताही पात्र विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (माध्य), यांना आपल्या स्तरावरुन सूचना निर्गमित करण्यात याव्यात. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर विद्युत जोडणी, पंखे, दिवे व इतर भौतिक सुविधा असणे आवश्यक असून, परीक्षा कालावधीत अखंडित विद्युत पुरवठा राहण्यासाठी जनरेटर/इन्हर्टर सुविधा असणे आवश्यक आहे. परीक्षा कालावधीत विभागीय मंडळ स्तरावर नियंत्रण कक्षाची सुविधा निर्माण करण्यात यावी. हा नियंत्रण कक्ष सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत कार्यरत राहील. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

000000

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 28 फेब्रुवारी पर्यत अर्ज सादर करावे

 

पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी

28 फेब्रुवारी पर्यत अर्ज सादर करावे

 

अमरावती, दि. 2 :महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 1 फेब्रुवारी  ते 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत.

            विद्यार्थ्यांनी मंगळवार दिनांक 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी अर्ज सादर करावे. 3 फेबुवारी  ते 3 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे.

            मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवी वर्गासाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in  या संकेतस्थळावरुन माहिती घ्यावी असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

000000

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

अमरावती विभागात नवे 1193 कोरोनाबाधित

 

अमरावती विभागात नवे 1193 कोरोनाबाधित

 

अमरावती, दि. 1 : अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात आज नव्याने 1193 कोरोनाबाधित आढळून आले.

            आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, अमरावती जिल्ह्यात 204, अकोला येथे 166, यवतमाळ 101, बुलडाणा 628 व वाशिम येथे 94 असे एकूण 1193 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

००००००