गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१९


दहावी व बारावीच्या
विद्यार्थ्यांनी 10 सप्टेंबर पर्यंत
अर्ज सादर करावे
                अमरावती दि.29 :  इयत्या 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्याना फेब्रुवारी/ मार्च 2020 या शैक्षणिक वर्षात खाजगी रित्या प्रविष्ठ होण्यासाठी ऑनलाईन नांव नोंदणी करण्यास  दिनांक 11 सप्टेंबर पर्यत मुदत वाढ देण्यात आली आहे. दि. 27 सप्टेंबर पासून विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी अर्ज सादर करावे. दि. 16 सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावी. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी http://form17.mh-ssc.ac.in ; http://form17.mh-hsc.ac.in ;या बेवसाईटचा वापर करावा. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरीता शाळा सोडल्याचा दाखला (मुळ प्रत),नसल्यास द्वितीयप्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा पासपोर्ट आकारातील फोटो अर्जासोबत द्यावा. ऑनलाईन अर्ज सादर करतांना सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी. दिव्यांग विद्यार्थ्यांना खाजगीरित्या प्रविष्ठ व्हायचे असेल तर त्यांनी त्यांच्या दिव्यांगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या/प्राधिकृत केलेल्या हॉस्पिटलच्या प्रमाणपत्राची छायाप्रत प्रमाणित करुन अर्जासोबत सादर करावी.पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने विहित केलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. असे  विभागीय मंडळाचे सचिव, राज्य मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

****


जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

विद्यार्थ्यांमध्ये खिलाडू वृत्ती जागृत करण्यासाठी
क्रिडा संकुलाची निर्मिती
-          पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे
क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी आठ कोटी
राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
अमरावती, दि.29: ग्रामीण भागातील मुलांमध्ये विशेषत: आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये कणखरता, निडरता व जिद्द आदी गुण असतात. त्यांच्यातील खेळगुणांना वाव देऊन उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात येत आहे, असे कृषीमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज सांगितले.
येथील विद्यापीठ परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करुन करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. आमदार अरुण अडसळ, आमदार रवि राणा, जि.प.सदस्य संजय गुलाणे, नगरसेविका जाधव, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव,अधिक्षक अभियंता श्रीमती शर्मा यांचेसह क्रीडा विभागाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
 हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन डॉ. बोंडे म्हणाले की, अमरावतीत विभागीय क्रीडा संकुल अस्तिवात आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये खेळवृत्तीला चालना देण्यासाठी जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी क्रीडा संकुलाची निर्मिती होणे आवश्यक आहे. क्रीडा संकुलाच्या निर्मितीतून शहरी व ग्रामीण भागातील खेळाडूंना खेळ साहित्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील. जिल्हा क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी शासनाव्दारे 16 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून आठ कोटी रुपयाचा निधी क्रीडा विभागाला देण्यात  आला आहे. त्याचा विनियोग झाल्यावर उर्वरित निधी दिला जाईल.
 ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ नेतृत्व समोर येण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आर्चरी रेंज निर्माण करण्यासाठी 5 कोटी 61 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आगामी काळात कबड्डी, खो-खो, धर्नुविद्या, लगोरी यासारख्या पारंपारिक खेळांना पुरस्कृत करण्यासोबतच नवीनतम ज्युदो, कराटे, मार्शल आर्ट, सॉफ्टबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट सारख्या खेळांना मैदानाची निर्मिती करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यापुढेही खेलो इंडियाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक खेळाप्रकाराला प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या अंतर्गत मोर्शीतून कबड्डी, ज्युदोसाठी दर्यापूर, आर्चरीसाठी नांदगावपेठ तर मेळघाटमध्ये ॲथलेटीक्स सारख्या क्रीडाप्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या जानेवारी महिन्यात सेमाडोह ते मेळघाट अशी राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मुलींना शारीरिक व मानसिकरित्या सक्षम करण्यासाठी स्वयंसिध्दा उपक्रम शाळा-महाविद्यालयातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पाच हजार मुलींनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून एक लाख मुलींना कराटे, लाठीकाठी व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षामध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी पाच कोटी रुपये निधी खर्चुन जिल्हा व तालुकास्तरावर अभ्यासिकांचे निर्मिती करण्यात येणार आहे, असेही डॉ. बोंडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, प्रत्येकाने  विद्यार्थी दशेत असतांना नियमित अभ्यासासोबतच किमान एक तास मैदानी खेळ खेळणे अत्यंत आवश्यक आहे. मैदानी खेळ खेळल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सातत्य व जिद्द यासारखे गुण निर्माण होऊन त्यांचे मानसिक व शारीरिकरीत्या व्यक्तिमत्व विकास होईल. विद्यार्थ्यांनी संगणक, मोबाईलवर ऑनलाईन आभासी खेळ खेळण्यापेक्षा खरोखरचे मैदानी खेळ खेळावे. मुलांनी आभासी दुनियेत न वावरता खरोखरचे जीवनाचे सार जाणून देशावर प्रेम करणारे व्यक्तिमत्व विकास करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यकमात राज्य शासनाव्दारे पुरस्कार प्राप्त क्रीडा मार्गदर्शक डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, जलतरणपटू चेतन राऊत, नेटबॉलपटू कु. स्वाती कांडलकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अरुण अडसळ व आमदार रवि राणा यांचेही समायोचित भाषणे झालीत.
जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या विविध क्रीडा सुविधांविषयी  क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. यावेळी शाळा- महाविद्यालयातील स्कॉउट गाईडचे व क्रीडा प्रबोधिनीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा
संरक्षक भिंत व प्रवेशव्दार, आर्चरी रेंज , जलतरण तलाव, बहुउद्देशीय हॉल, विद्युतीकरण
अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा सुविधा निर्माण करण्यात येणार आहे.

00000







मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

अमरावती विभागात 55 तालुक्यात पाऊस !


अमरावती विभागात 55 तालुक्यात पाऊस !

अमरावती, दि.27: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात  55 तालुक्यात पाऊस झाला. विभागातील तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 0.4 (536.5), भातकूली 2.3 (343.1), नांदगाव खंडेश्वर निरंक (502.2), चांदूर रेल्वे 0.2 (609.1), धामणगाव रेल्वे 6.5 (631.5), तिवसा 0.2 (490.4), मोर्शी 1.9 (518.2), वरुड 8.3 (558.7), अचलपूर 3.4 (580.9), चांदूर बाजार 1.0 (710.6), दर्यापूर 3.3 (477), अंजनगाव 0.8 (457.6), धारणी 28.4 (1067.9), चिखलदरा 19.8 (1381.2), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 5.5 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 633.2 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1  जून ते 27 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 103.1 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 77.7 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 9.8 (470.8), बार्शी टाकळी 8.8 (596.4), अकोट 8.5 (624.7), तेल्हारा- 21 (582.4), बाळापूर 16.2 (560.4), पातूर 23.6 (559.1),मुर्तीजापूर 4.9 (429.6), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 13.3 मि.मि तर आजवर 546.2 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1  जून  ते 27 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 103.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 78.3 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 5.8 (315.2), बाभूळगाव 4 (423.4),कळंब 3.2 (378.6), आर्णी 9.3 (477.9), दारव्हा 15.5 (344.7), दिग्रस 6.5 (339.1), नेर 2.5 (339.3), पुसद 0.7 (408.1), उमरखेड 0.4 (414.7), महागाव 1.0 (400.2), केळापूर 3.7 (420.1), घाटंजी 7.4 (380.2), राळेगाव 4.1 (416.3), वणी 5 (473.9), मारेगाव 1.6 (468.5), झरी जामणी 2.4 (390.2) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 4.6 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 399.4 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 27 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 57.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 43.8 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 3.5 (653.1), चिखली 3.8 (481.5), देऊळगाव राजा 2 (305.7), मेहकर 4.7 (422.6), लोणार 1.2 (353.1), सिंदखेड राजा 1.3 (373.3), मलकापूर 48.6 (607.9), नांदूरा 18.5 (568.2), मोताळा 19.5 (460.9), खामगाव 17.8 (453.6), शेगाव 8.2 (565.9), जळगाव जामोद 10.8 (575.3) संग्रामपूर 13.9 (681.2)  जिल्ह्यात दिवसभरात 11.8 तर यंदाच्या हंगामात आजवर 500.2 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 27 ऑगस्ट कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 100.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 74.9 टक्के एवढे आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 8.5 (430.3), मालेगाव 14.3 (417.7), रिसोड 3.8 (405.2), मंगरुळपिर 11.4 (365.1), मानोरा 11.3 (320.1), कारंजा 11.8 (374.6), जिल्ह्यात 24 तासात 10.2 तर 1 जून पासून आजवर 385.5 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 27 ऑगस्ट या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 63.8 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 48.3  टक्के इतके आहे.
***

सोमवार, २६ ऑगस्ट, २०१९

अमरावती विभागात पावसाचे पुनरागमन!


अमरावती विभागात पावसाचे पुनरागमन!

अमरावती, दि.26: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात  53 तालुक्यात पाऊस झाला. विभागात चिखलदरा येथे नोंदला गेलेला सर्वाधिक पाऊस 74 मिलीमीटर असून विभागातील तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 12.7 (536.1), भातकूली 10.8 (340.8), नांदगाव खंडेश्वर 7.9 (502.2), चांदूर रेल्वे 4.8 (608.9), धामणगाव रेल्वे 15.3 (625), तिवसा 28.6 (490.2), मोर्शी 25.6 (516.3), वरुड 15.3 (550.4), अचलपूर 27.9 (577.5), चांदूर बाजार 39.1 (709.6), दर्यापूर 16.4 (473.7), अंजनगाव 17 (456.8), धारणी 36.3 (1039.5), चिखलदरा 74 (1361.4), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 23.7 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 627.7 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1  जून ते 26 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 103.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 77.1 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 8.3 (461), बार्शी टाकळी 6.6 (587.6), अकोट 15.4 (616.2), तेल्हारा- 5.5 (561.4), बाळापूर 8.7 (544.2), पातूर 15.6 (535.5),मुर्तीजापूर 7.1 (424.7), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 9.6 मि.मि तर आजवर 532.9 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1  जून  ते 26 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 102.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 76.4 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 3.4 (309.4), बाभूळगाव 5 (419.4),कळंब 5.3 (375.4), आर्णी 0.7 (468.6), दारव्हा 1.9(329.2), दिग्रस निरंक (332.6), नेर 3.3 (336.8), पुसद निरंक (407.5), उमरखेड 0.4 (414.2), महागाव 1.0 (399.2), केळापूर 1.3 (416.4), घाटंजी 1.6 (372.8), राळेगाव 2.3 (412.1), वणी 7.8 (468.9), मारेगाव 3.8 (466.9), झरी जामणी 1.2 (387.8) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 2.4 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 394.8 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 26 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 57.4 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 43.3 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 2 (649.6), चिखली 1.7 (477.7), देऊळगाव राजा 0.5 (303.7), मेहकर 0.7 (417.9), लोणार 0.4 (351.9), सिंदखेड राजा 0.2 (372), मलकापूर 27.6 (559.3), नांदूरा 17.3 (549.7), मोताळा 7.5 (441.4), खामगाव 26 (435.8), शेगाव 2.4 (557.7), जळगाव जामोद 4.1 (564.5) संग्रामपूर 4.6 (667.3)  जिल्ह्यात दिवसभरात 7.3 तर यंदाच्या हंगामात आजवर 488.3 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 26 ऑगस्ट कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 99.5 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 73.1 टक्के एवढे आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 1.1 (421.9), मालेगाव 7.3 (403.5), रिसोड 1 (401.4), मंगरुळपिर 5.4 (353.7), मानोरा निरंक (308.8), कारंजा 3.0 (362.9), जिल्ह्यात 24 तासात 3 तर 1 जून पासून आजवर 375.3 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 26ऑगस्ट या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 62.8 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 47  टक्के इतके आहे.
****

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्‍ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावे


अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्‍ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावे
अमरावती, दि. 23  : केंद्र शासन पुरस्कृत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सन 2019-20 साठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया सुरु झालेली असून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार नविन मंजूरी व नूतनिकरणासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम 31 आक्टोंबर, 2019 आहे. तरी सदर योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी  National Scholarship Portal वरील मार्गदर्शक सूचना व Frequently Asked Questions (FAQs)  वाचून दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे डॉ. संजय जगताप, सहसंचालक उच्च, शिक्षण अमरावती विभाग यांनी कळविले आहे.
****

इयत्ता 12 वी विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी 4 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे


इयत्ता 12 वी
विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीसाठी 4 सप्टेंबर पर्यंत
अर्ज सादर करावे
अमरावती, दि. 23  : इयत्ता 12 वीच्या जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध आहेत. या माहितीची प्रत विद्यार्थ्यांना घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना गुणाची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमुन्यात विहित शुल्कासह सोमवार दि. 26 ऑगस्ट 2019 ते बुधवार दि. 4 सप्टेंबर 2019 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील.
फेब्रुवारी-मार्च 2020 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारायची असल्याने त्याच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार                (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2019 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतील, असे डॉ. अशोक भोसले, सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
00000

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरताना काळजी घ्यावी


शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरताना काळजी घ्यावी
अमरावती, दि. 22  : सध्याच्या हवामानातील बदलामुळे पिकांवर किड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. किड रोगांच्या नियंत्राणासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करण्यात येते. किटकनाशकांच्या असुरक्षित हाताळणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये याकरीता किटनकनाशके हाताळतांना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृषिविभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
किटकनाशकांचा वापर सुरु करण्यापूर्वी लेबलमधील दिशनिर्देश काळजीपूर्वक वाचावेत आणि त्यांचे अनुकरण करावे.त्यावरील चेतावणी आणि सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे. किटकनाशकांच्या डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह/खुण असलेली औषधे सर्वात अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. किटकनाशके थंड, कोरड्या आणि सुरक्षित जागी कुलूप लावून मुलांपासून दुर ठेवावीत. किटकनाशके नेहमी त्यांच्या मूळ डब्यात साठवावीत आणि कधीही ती खाद्य आणि खाद्य सामग्रीसह साठवू नये. किटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी इत्यादीचा पुर्नवापर करु नये. फवारणी करीता गळक्या फवारणी यंत्राचा वापर करु नये. किटकनाशके हाताळतांना सुरक्षिततेच्या दृष्टिने रबरी हातमोजे, लांब पॅट आणि लांब बाहीचे शर्ट वापरावेत तसेच पायात बुट, नाक व तोंडावर मास्क/रेस्पायरेटरचा वापर करावा. किटकनाशके वापरानंतर लगेच कपडे बदलवून हात धुवावेत. फवारणी वापरावयाची कपडे स्वतंत्र ठेवावीत तसेच, ती वेळोवेळी स्वच्छ धुवावीत. किटकनाशके विहिरी किंवा इतर जलस्त्रोताच्या जवळपास कधीही मिसळू नयेत अथवा त्याठिकाणी किटकनाशके वापरलेलीभांडी स्वच्छ करु नयेत. उघड्या हातांनी किटकनाशके कधीही ढवळू नयेत. त्याकरीता काठीचा वापर करावा तसेच किटकनाशकांचा वास घेणे टाळावे. किटकनाशकांचे शिल्लक द्रावण पडीक जमीनीत खड्डा करुन पुरुन टाकावे. बंद पडलेला नोंझल स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये. त्यासाठी तार किंवा काडी किंवा टाचणीचा वापर करावा. रिकाम्या पोटी फवारणी करु नये. किटकनाशके वापरताना खाऊ, पिऊ किंव धुम्रपान करु नये. खाण्यापूर्वी किंवा पिण्याआधी हात आणि चेहरा धुवावा. किटकनाशक फवारणी नेहमी वाऱ्याच्या दिशेने करावी. किटकनाशक शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. शरीरावर जखमा असलेल्या व्यक्तींनी किटकनाशके हाताळू नये. किटकनाशके फवारतांना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन सुभाष नागरे, विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांनी सर्व शेतकरी बंधूना केले आहे.

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

नागरी सेवा 2020 25 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे प्रेवश परीक्षा 6 ऑक्टोंबर रोजी


नागरी सेवा 2020
25 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे
प्रेवश परीक्षा 6 ऑक्टोंबर रोजी

अमरावती, दि.20:  केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा-2020 मध्ये विनामुल्य पुर्व प्रशिक्षणाकरीता भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे प्रवेश परीक्षा फक्त अमरावती  केंद्रावर घेण्यात येत आहे. अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  (Online )पध्दतीने www.preiasamt.in  या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दि. 26 ऑगस्ट 2019 पासून होत असून अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक दि. 25 सप्टेंबर 2019 आहे. परिक्षेचे प्रवेश पत्र दि. 1 ऑक्टोंबर 2019 पर्यंत Online पध्दतीने उपलब्ध होतील ते 6 ऑक्टोंबर 2019, प्रवेश परीक्षा दि. 6 ऑक्टोंबर 2019 सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत घेण्यात येईल.
सविस्तर जाहिरात,परीक्षेचा अभ्यासक्रम Online अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सुचना संस्थेच्या www.preiasamt.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे डॉ. एम.पी.वाडेकर, संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती यांनी कळविले  आहे.

****

अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध उपक्रमाबाबत लोक संवाद मोहिम सुरु


अटल महापणन विकास अभियान अंतर्गत
विविध उपक्रमाबाबत लोक संवाद मोहिम सुरु
अमरावती, दि.20: महाराष्ट्र शासनाकडून राज्यात सुरु असलेल्या अटल महापणन योजनेअंतर्गत सुरु असलेल्या खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी नाविण्यपूर्ण उपक्रम/व्यवसाय सुरु केले आहेत. ही कामे विविध प्रसारमाध्यमातून सहकारी संस्था,शेतकरी उत्पादक कंपन्या महिला बचत गट,शेतकरी व सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. जेणेकरुन सहकारी संस्थांना बळकटीकरणासाठी मदत होईल. महाराष्ट्रात अटल महापणन अभियानाअंतर्गत एकूण 3000 हजार पेक्षा जास्त विविध कार्यकारी संस्थानी व्यवसाय सुरु केले आहे. तर अमरावती विभागात अटल महापणन अंतर्गत एकूण 918 संस्थांची निवड करण्यात आली असून त्यापैकी 359 संस्थांनी नाविण्यपूर्ण व्यवसाय सुरु केले आहे.
अनेक व्यवसाय सुरु होत आहेत. अमरावती विभागातील गावातील अनेक सेवा सहकारी व खरेदी विक्री संस्थानी नाविण्यपूर्ण व्यवसाय सुरु करुन ग्रामीण भागातील शेतकरी सभासंदाचा सर्वागीण विकास होत आहे.
याकरीता सहकार विभागामार्फत लोक संवाद मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती येथे जिल्हा उपनिबंधक,सहायक निबंधक,सहकारी संस्था यांनी दिनांक 14 ऑगस्ट 2019 रोजी कार्यशाळा घेऊन संवाद मोहिमेचा शुभारंभ केला. याद्वारे जिल्हास्तरावर व तालुका व गावपातळीवर लोक संवाद कार्यक्रम घेऊन विविध उपक्रमाची माहिती लोकापर्यंत प्रसार माध्यमातून देण्यात येत आहे. दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेअंतर्गत शहरी भागातील गृहनिर्माण संस्थामध्ये कॉपशाप द्वारे कृषी माल व महाफार्म बॅन्डद्वारे कृषी माल विविध मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.याबाबत शेतकरी सभासदांना अशा नाविण्यपूर्ण उपक्रमाची माहिती मिळाल्यास ते या उपक्रमाशी जोडले जातील. व शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने विकास होईल.
अमरावती विभागात उत्कृष्ठ व्यवसाय सुरु केलेल्या संस्थांची सक्षिप्त माहिती :
अमरावती जिल्ह्यात नेरपिगंळाई सेवा संस्था सोनेतारक खते विक्री, बि-बियाणे कापड दुकान इ.व्यवसाय प्रगतीपथावर असून त्यापासून गावपातळीवर लोकांना फायदा होत आहे. दर्यापूर खरेदी विक्री, मोर्शी खरेदी विक्री व इतर सेवा सहकारी संस्था, विविध नाविण्यपूर्ण व्यवसाय करीत आहे. अकोला जिल्ह्यात मोरगाव येथे सौर उर्जा विज निमिर्ती सुरु करण्यात आली आहे. तसेच चाळणी यंत्र व स्पायरल सेपेरेटर इत्यादी व्यवसाय सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाढंरकवडा खेरदी विक्री सहकारी संस्थेनी माती परिक्षण केंद्र, खत खरेदीवर अपघात विमा केंद्र सुरु केले आहे. इतर सेवा सहकारी संस्थांनी सेद्रिय गांडूळ खतनिर्मीती व विक्री, आर.ओ. वाटर केंद्र, झेरॉक्स केंद्र, मशरुम विक्री, विद्युत विज भरणा केंद्र इत्यादी व्यवसाय सुरु केले असून त्यापासून शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सेवा सहकारी संस्था मार्फत धान्य चाळणी, चहा कॅन्टीग, साडी सेंटर, पशुखाद्य विक्री, दुध डेअरी, माल तारण कर्ज व्यवसाय सुरु केलेले आहे. अशी माहिती विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था, अमरावती यांनी दिली.
**** 

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

प्रधानमंत्री किसान मानधन योजना- शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा


प्रधानमंत्री किसान मानधन योजना
शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा

अमरावती, दि.16: प्रधानमंत्री किसान मानधन योजना भू-अभिलेखानुसार देशातील सर्व पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी वृध्दावस्थेतील निर्वाहासाठी अत्यंत अल्प बचत केलेली असते किंवा बहुतांशी शेतकऱ्यांची कोणतीही बचत नसते आणि उत्पन्नाचा इतर स्त्रोत उपलब्ध नसतो अशा शेतकऱ्यांना वृध्दापकाळात आरोग्यपूर्ण व आनंदी जीवन जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हा प्रधानमंत्री किसान मानवधन योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेअंतर्गत सव पात्र अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना दरमहा रक्कम रु. 3000/- ( तीन हजार) निश्चित पेन्शन देण्यात येईल. प्रधानमंत्री किसान मानधना योजना ही ऐच्छिक व अशंदायी पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत भारतीय जीवन विमा निगम (एल.आय.सी.) द्वारा (Managed) पेन्शन फंडाद्वारे नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांना पेन्शन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार 18 ते 40 वर्षे या वयोगटातील अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी नोंदणीकरण्यासाठी पात्र आहेत. या योजनेअंतर्गत पात्र नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांचे 1 ऑगस्ट 2019 रोजीच्या वयानुसार रक्कम  रु. 55 ते 200/- प्रती माहे मासिक हप्ता वयाचे पूर्ण होईपर्यंत पेन्शन फंडामध्ये जमा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी पेन्शन फंडामध्ये जमा केलेल्या मासिक हप्त्याइतकीच मासिक रक्कम केंद्र शासन संबंधित शेतकऱ्यांच्या पेन्शन फंडामध्ये जमा करणार आहे. अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी पती-पन्ती स्वतंत्र पणे योजनमध्ये भाग घेऊ शकतात. त्यांच्या स्वतंत्र नोंदणीनुसार वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यांनतर त्यांना स्वतंत्रपणे रु 3000/- मासिक पेन्शन मिळणार आहे. ज्या पात्र अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांनी योजनमेध्ये भाग घेतलेला असून  काही कारणामुळे त्यांना योजनेतून बाहेर पडायचे असल्यास त्यांची पेन्शन फंडामध्ये जमा केलेली रक्क्म व्याजासह त्यांना परत करण्यात येईल. या योजनअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सेवानिवृत्ती तारखेपुर्वी ( म्हणजे वय 60 वर्षे पूर्ण होण्यापुर्वी) आकस्मिक निधन झाल्यास त्या व्यक्तीचे 60 वर्षे वयापर्यंतचे उर्वरीत मासिक हप्ते पती/पत्नी हे पेन्शन फंडामध्ये जमा करुन त्या व्यक्तीचे पेन्शन खाते चालू ठेवू शकतात. सेवानिवृत्ती तारखेपूर्वी निधन झालेल्या पती/पत्नी  नसल्यास त्या शेतकऱ्यांचे पेन्शन फंडामध्ये अंशदायी जमा केलेली रक्कम व्याजासह वारसदारास मिळेल. सेवानिवृत्ती तारखेपुर्वी निधन झालेल्या शेतकऱ्याचे पती-पत्नीस दर महा 50 टक्के म्हणजे रु. 1500/- पारिवारीक मासिक पेन्शन मिळेल. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकरी पी.एम.किसान मानधन योजनेची अंशदायी हप्ता रक्कम कपात करण्यात येईल. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सामाईक सुविधा केंद्र (csc-common service centre) मार्फत https://www.pmkmy.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावयाची असून सदर नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र शासनाकडून लाभार्थी नोंदणी फी रक्कम रु. 30 (प्रती शेतकरी) सामाईक सुविधा केंद्रास अदा करण्यात योणार आहे. नोंदणीसाठी लाभार्थी शेतकरी यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक असणारी कागदपत्रे (आधारकार्ड,बँक पासबुक, मोबाईल नंबर इ.) सामाईक सुविधा केंद्रात घेऊन जाणे आवश्यक आहे.
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी अपात्रतेचे निकष
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एन.पी.एस), कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन स्किम,यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ घेणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (पी.एम.एस.वाय.एम) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे प्रशासित प्रधानमंत्री लघू व्यापारी मानधन योजना (पी.एम.एल.व्ही.एम) मध्ये निवडण्यात आलेले शेतकरी या योजनेस अपात्र असतील. उच्च आर्थिक  स्थितीतल शेतकरी लाभार्थी खालीप्रमाणे प्रधानमंत्री किसान मानधन योजना या योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र नसतील. जमीन धारण करणारी संस्था, सवैधानिक पद धारक करणारी/ केलेलीआजी/ माती व्यक्ती, आजी/ माजी मंत्री, खासदार, आमदार, महापालीकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, केंद्र  व राज्य शासनाचे सर्व कार्यरत व निवृत्त अधिकारी/ कर्मचारी,शासन अंगीकृत संस्था, स्वायत्त संस्थेतील व स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी/ कर्मचारी (चतुर्थ श्रेणी/ गट-ड वर्ग कर्मचारी वगळून) मागील वर्षात आयकर भरलेल्या व्यक्ती, नोंदणीकृत व्यवसायिक डॉक्टर,वकील,अभियंता,सनदी लेखापाल (सी.ए.), वास्तुशास्त्रज्ञ (आर्कीटेक्ट) इत्यादी क्षेत्रातील व्यक्ती,असल्यास योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असतील.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे  आवाहन विभागीय कृषी सहसंचालक अमरावती विभाग , अमरावती यांनी केले आहे.
****


मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१९

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे


महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालयात प्रवेशासाठी
31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे
                                                  
अमरावती, दि.13: महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व 8 वी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 13 ऑगस्ट 2019 पासून दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत  स्विकारण्यात येणार आहेत. दिनांक 14 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे. दिनांक 6 सप्टेंबर पर्यंत संपर्क केंद्र शाळा ही यादी विभागीय मंडळाकडे सादर करतील. अधिक माहितीसाठी या  http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाला भेट द्यावी असे डॉ. अशोक भोसले,सचिव महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.
****

विभागीय लोकशाही दिनात दहा प्रकरणे दाखल





     विभागीय लोकशाही दिनात दहा प्रकरणे दाखल

·         प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

अमरावती,दि.13विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त पियूष सिंह  यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आलेविभागातून लोकशाही दिनासाठी दहा प्रकरणे दाखल करण्यात आलीतदाखल प्रकरणांवर योग्य कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना श्री. सिंह यांनी दिल्याविविध विभागाशी संबंधित असलेली प्रलंबित प्रकरणे अनेक दिवस प्रलंबित न ठेवता तत्काळ निकाली काढावित तसेच केलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची प्रत तक्रारकर्त्यांस देण्यात यावीअसे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
आज विभागीय लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ दोन प्रकरणे, जि.प.यवतमाळ दोन प्रकरणे, न.प. यवतमाळचे एक प्रकरण, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमचे एक प्रकरण, जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीचे दोन प्रकरण आणि भूमि अभिलेख कार्यालयाचे एक अशी नऊ प्रकरणे वैशाली पाथरे यांनी सादर केली. यातील 4 प्रकरणे आजच्या लोकशाही दिनात निकाली काढण्यात आली. अमरावती जि.प. च्या एका प्रकरणात न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत प्रलंबित ठेवण्याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी दिले.
विभागीय लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी भूमी अभिलेख, जिल्हा परिषद, मनपा अमरावतीकृषी विभाग या कार्यालयांचे संबंधित अधिकारी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.


 





शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण व उद्योजकता कार्यक्रम




कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजनेअंतर्गत
शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रशिक्षणाचे
प्रमाणपत्र वितरण व उद्योजकता कार्यक्रम

            अमरावती दि.9: स्वयंरोजगारातून स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने शासकीय तंत्र निकेतन यांच्या वतीने कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलीटेक्निक योजनेअंतर्गत युवक युवतींसाठी तांत्रिक कौशल्यावर आधारीत व्यवसाय प्रशिक्षण  उद्योजकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा..व्ही.उदासी, प्रमुख अतिथी म्हणून योजनेचे समन्वयक प्रा.एस.जे.गायकवाड,बालकल्याण समितीच्या सचिव डॉ.अंजली कुथे, सहसचिव श्रीमती लुगेकर उपस्थित होते.
          प्राचार्य प्रा..व्ही.उदासी यांनी यावेळी प्रशिक्षणातुन रोजगार कसा निर्माण करावा  यशस्वी उद्योजक कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन केलेडॉ.अंजली कुथे यांनी स्वंयरोजगारातू आर्थि उन्नती कशी साधावी याबाबत माहीती दिलीया योजनेअंतर्गत भटवाडी येथील प्रशिक्षण केंद्रावर गारमेंट मेकींग प्रशिक्षण घेतलेल्या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी शिला मुंजे, मालती मेश्राम, प्रशिक्षीका श्रीमती उदापुरे, प्रवीण गडकर, निलेश जुनघरे, विनोद कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.जे. गायकवाड यांनी केले.आभार संदिप डाहाके यांनी मानले.






इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी 26 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे


इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांनी
26 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावे
                                                  
अमरावती, दि.9: खाजगी विद्यार्थ्यांनी इ. 12 साठी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाचे आहेत. विद्यर्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज प्रिट करुन त्यांच्या अर्जावर दिलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात मूळ कागदपत्रासह व शुल्कासह दि. 26 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावयाचे आहेत.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी ऑनलाईन करावयाची आहे, नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांनी पत्ता, त्याने निवडलेली शाखा व माध्यम निहाय त्यास कनिष्ठ महाविद्यालयाची यादी असेल त्यामधील एका कनिष्ठ महाविद्यालयाची निवड विद्यार्थ्यांनी करावयाची आहे. या कनिष्ठ महाविद्यालयाद्वारे परीक्षा अर्ज, प्रकल्प, प्रात्यक्षिक/तोंडी, श्रेणी परीक्षा द्यावयाची आहेत.
ऑनलाईन अर्ज भरतांना कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक                        202-25705208/25705207/25705271 वर संपर्क साधावा, असे विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविले आहे.
****


सबलीकरण योजनेतील लाभार्थ्यांना अन्य योजनांचे लाभ द्यावेत - पियुष सिंह


सबलीकरण योजनेतील लाभार्थ्यांना
अन्य योजनांचे लाभ द्यावेत
                                                  - पियुष सिंह
अमरावती, दि.9: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शेतीशी निगडीत अन्य योजनांचे लाभ देण्यात यावेत, म्हणजे त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या दक्षता व नियंत्रण विभागस्तरीय समितीची बैठक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त पियुष सिंह होते. विशेष पोलीस महानिरिक्षक मकरंद रानडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विभागात दाखल झालेले गुन्हे, गुन्ह्यांचा तपास आणि त्या संदर्भातील कारवाई, या प्रकरणातील अत्याचारग्रस्त व्यक्तींना देण्यात आलेली मदत, रमाई घरकुल (आवास) योजना, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात आलेली कामे, तसेच जिल्हा निधी मधून अपंगासाठी राबवण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल झालेल्या प्रकरणांचा तपास वेळेत पूर्ण व्हावा आणि दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे आयुक्तांनी सांगितले.
रमाई घरकुल योजनेतील मंजुरी प्रलंबीत राहणार नाही, याबाबत काळजी घेण्याची सुचना देवून त्यांनी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेत शेतजमीन दिल्यानंतर संबंधित लाभार्थ्यास शेतीशी निगडीत विविध वैयक्तिक योजनांचा लाभ दिला जावा,  म्हणजे लाभार्थ्याला उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देत त्याचे जीवनमान उंचावण्याचा हेतू साध्य होवू शकेल, असे त्यांनी सांगितले. याबाबतीत आजवर झालेल्या प्रयत्नांची आणि त्यानूसार देण्यात आलेल्या लाभाची माहिती संकलीत करण्यास त्यांनी सांगितले.
या बैठकीला विभागातील सर्व जिल्ह्यातील सामाजिक न्याय, पोलीस आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे सुत्रसंचालन प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी केले व माहिती सादर केली.
****

अमरावती विभागात दमदार पाऊस चिखलदरा,धारणी,चांदूर बाजार, मोर्शी, अकोट तालुक्यात अतिवृष्टी


अमरावती विभागात दमदार पाऊस
चिखलदरा,धारणी,चांदूर बाजार, मोर्शी,
अकोट तालुक्यात अतिवृष्टी

अमरावती, दि.9: अमरावती विभागात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात सर्वच तालुक्यात पाऊस झाला. विभागात नोंदला गेलेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहे.
अमरावती जिल्हा : अमरावती 52.5 (499.2), भातकूली 33.7 (314.7), नांदगाव खंडेश्वर 50.5 (451.2), चांदूर रेल्वे 61.9 (572.2), धामणगाव रेल्वे 59.3 (575.4), तिवसा 60.9 (429.8), मोर्शी 65.8 (432), वरुड 52.4 (443.8), अचलपूर 58.9 (510), चांदूर बाजार 83.9 (585.5), दर्यापूर 51.6 (435.8), अंजनगाव 61.7 (415.6), धारणी 101.6 (887.9), चिखलदरा 114.6 (1061.5), अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 65 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 543.9 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे  हे प्रमाण 1  जून ते 9 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पाऊसमानाच्या 111.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 66.8 टक्के आहे.
अकोला जिल्हा :- अकोला 52.8 (422.5), बार्शी टाकळी 47.6 (529.5), अकोट 87.9 (584.9), तेल्हारा- 60.8 (547.3), बाळापूर 50 (509.1), पातूर 48.4 (501.3),मुर्तीजापूर 36.7 (397), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 54.9 मि.मि तर आजवर 498.8 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1  जून  ते 9 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित पावसाच्या 118.9 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 71.5 टक्के आहे.
यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 25.4 (291.4), बाभूळगाव 38 (378.6),कळंब 24 (316.3), आर्णी 37.2 (450.9), दारव्हा 27.4 (308.6), दिग्रस 32.5 (327.1), नेर 37.5 (307.8), पुसद 17.3 (401.5), उमरखेड 9.7 (397.6), महागाव 25 (392.1), केळापूर 21.5 (397.6), घाटंजी 20.6 (356.1), राळेगाव 17.1 (370.6), वणी 26 (410.5), मारेगाव 14 (418.5), झरी जामणी 22 (352.8) जिल्ह्यात 24 तासात सरासरी 24.7 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 367.4 मि.मि पाऊस झाला आहे. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 9 ऑगस्ट या कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 66.3 टक्के तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत 40.3 टक्के एवढे आहे.
बुलडाणा जिल्हा :- बुलडाणा 32.5 (623.7), चिखली 32.4 (462.7), देऊळगाव राजा 16 (261.4), मेहकर 23.9 (412.9), लोणार 9.5 (350.5), सिंदखेड राजा 13.3 (367.1), मलकापूर 44.4 (506.9), नांदूरा 43.3 (507.8), मोताळा 30.3 (421.3), खामगाव 33.8 (400.8), शेगाव 44.6 (535.2), जळगाव जामोद 58.6 (553) संग्रामपूर 62 (648.2)  जिल्ह्यात दिवसभरात 34.2 तर यंदाच्या हंगामात आजवर 465.5 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून  ते 9 ऑगस्ट कालावधीत अपेक्षित सरासरीच्या 117.7 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 69.7 टक्के एवढे आहे.
वाशिम जिल्हा : - वाशिम 21.8 (415.6), मालेगाव 30.8 (375.6), रिसोड 16 (397.3), मंगरुळपिर 30.1 (330.8), मानोरा 29.8 (308.6), कारंजा 50.5 (316.7), जिल्ह्यात 24 तासात 29.8 तर 1 जून पासून आजवर 357.4 मि.मि. पाऊस झाला. पावसाचे हे प्रमाण 1 जून ते 9 ऑगस्ट या कालावधीतील अपेक्षित सरासरीच्या 74 टक्के तर वार्षिक सरासरीच्या 44.8  टक्के इतके आहे.
****