विशेष वृत्त
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेने शेतकऱ्यांना दिलासा
नागपूर, ९ दि. :राज्य शासनाने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २ जून २०२६ रोजी या योजनेबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.
कर्जमाफी, एकवेळ समझोता, प्रोत्साहनपर लाभ हे या योजनेचे तीन घटक आहेत. ज्यांनी १-४-२०१९ ते ३१-३-२०५ या काळात एक किंवा अधिक अल्पमुदती पीक कर्जे घेतली किंवा ज्यांच्या या कालावधीतील पीक कर्जाचे पुनर्गठन- फेरपुनर्गठन झाले असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. परंतु कर्ज हप्ते ३०-९-२०२५ रोजी थकित असणे व ३१-३-२०२६ पर्यंत परतफेड न झालेली बाकी २ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अशा शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळेल.
ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत लाभ मिळाला, अशा शेतकऱ्यांकडील अखेरची थकबाकी ५०,००० किंवा कमी असल्यास त्यांना ५०,००० रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
एकवेळ समझोता
ज्या शेतकऱ्यांनी १-४-२०१९ ते ३१-३-२०५ या काळात एक किंवा अधिक अल्पमुदती पीक कर्जे घेतली किंवा ज्यांच्या या कालावधीतील कर्जाचे पुनर्गठन- फेरपुनर्गठन झाले असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. परंतु कर्ज हप्ते थकबाकी ३०-९-२०२५ रोजी २ लाख रुपयापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
ही थकबाकी ३१-३-२०२६ पर्यंत परतफेड झालेली नसावी. अशा शेतकऱ्यांना प्रथम २ लाखावरील रक्कम बँकेत भरणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना २ लाख रुपये रकमेच्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांकडील ५०,००० रुपयांवरील रक्कम बँकेत भरल्यास ५०,००० रुपये कर्जमाफी मिळेल.
प्रोत्साहन लाभ
२०२२-२३, २०२३- २४, २०२४- २५ या आर्थिक वर्षात पीककर्ज घेऊन त्याची किमान दोन वर्षे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळेल. मात्र त्यासाठी २०२५-२६ व २०२६- २७ मधील पीककर्जाची मुदतीपूर्वी परकतफेड करणे आवश्यक आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा