शुक्रवार, १० जुलै, २०२६

 


#विधानपरिषदलक्षवेधी

राज्यातील #अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचे काम केले जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिज चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, पोलीस महानिरीक्षक स्तरावरूनही आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा