सोमवार, ६ जुलै, २०२६

 १३ जुलै रोजी विभागीय व महिला लोकशाही दिनाचे आयोजन;

 १५ दिवस आधी अर्ज करण्याचे आवाहन

        अमरावती दि. ६ : शासन सामान्य प्रशासन विभाग आणि महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या परिपत्रक व निर्णयानुसार दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यानुषंगाने आगामी जुलै महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, म्हणजेच दिनांक १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय लोकशाही दिन आणि महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

          या लोकशाही दिनात आपल्या तक्रारी मांडू इच्छितो अशा सामान्य नागरिकांना आणि महिलांना सूचित करण्यात आले आहे की, त्यांचा तक्रार अर्ज हा तालुका, जिल्हा किंवा महानगरपालिका लोकशाही दिनानंतरचाच असावा. हा अर्ज विहीत नमुन्यात, लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या तक्रारी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहीत नमुन्यात पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा