गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२६

 

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व ८ वी 

च्या विद्यार्थांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 

६ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

 

अमरावती दि. २२ : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व ८ वी साठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्याकरीता ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत या कालावधीत स्विकारण्यात येणार होती. परंतु नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस ६ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. या नवीन मुदतवाढीच्या सविस्तर तपशिलानुसार, २२ ऑक्टोबर २०२६ ते ६ नोव्हेंबर २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत या कालावधीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरणे आवश्यक आहे. त्यानंतर ७ ते १३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांनी मुळ अर्ज, विहित शुल्क व मुळ कागदपत्रे नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करायची आहेत. पुढे, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे जमा करणे आवश्यक आहे.

तरी नमूद कालावधीमध्ये ऑनलाईन नाव नोंदणी करणेबाबत आपल्या विभागीय मंडळाच्या अधिनस्त संबंधित संपर्क केंद्रशाळा प्रमुख यांनी मुख्याध्यापक यांना सूचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास त्वरीत सादर करावा, असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे येथील डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा