गुणवत्तापूर्ण विकासकामे हाच
केंद्रबिंदू
-पालकमंत्री प्रविण पोटे पाटील
पालकमंत्र्यांच्या हस्ते 93 कोटी रस्ताकामांचे भुमिपूजन
अमरावती, 9 :- केंद्र
सरकार व राज्य शासनाकडून जिल्ह्यातील रस्ते निर्मितीसाठी भरीव निधी मिळत आहे. मंजूर निधीतून रस्ता निर्मितीची कामे गुणवत्तापूर्ण व नागरिकांच्या सुविधेसाठी
व्हावीत हाच केंद्रबिंदू ठेवून विकासकामे पुर्णत्वास नेण्यात येत आहे, असे
प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी आज केले.
दस्तुरनगर स्थित हायब्रीड ॲन्युटी प्रकल्प अंतर्गत अमरावती वळण रस्ता बडनेरा ते
पॉवरहाऊस आणि रहाटगाव ते कॅम्प शार्ट ते प्र. रा.मा. 14 ते रा.मा. 280 रस्ता
बांधकामांचे भुमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत
होते. विदर्भ पाटबंधारे विकास
महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार
आनंदराव अडसूळ, आमदार
सुनील देशमुख, रवी राणा, उपमहापौर
संध्याताई टिकले, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष विवेक कलोती, भाजपचे
महानगराध्यक्ष जयंत डेहणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक
साळवे आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे म्हणाले की, केंद्रीय रस्ते बांधकाम व
जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकहिताच्या
दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या सिंचन, रस्ते तसेच मुलभूत सुविधां संदर्भात अनेक
महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जिल्हयातील रस्ते बांधकाम व विविध महत्वपूर्ण प्रकल्प
पूर्ण करण्यासाठी त्यांच्या खात्यांमार्फत भरीव निधी पुरविण्यात येत आहे. राज्यात
हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत सुमारे 30 हजार कोटी रुपयांच्या निधीतून 10 हजार
किलोमीटरचे रस्ते निर्माण होत आहेत. एकट्या अमरावती जिल्ह्यात 1600
किमी लांबीचे विविध रस्ते निर्माण होत आहेत. रस्ते व पायाभूत सुविधांसाठी केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्राकडून मोठा निधी मिळवून दिला आहे. जिल्ह्याला 22
हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. यापुढेही येत्या काळात
प्रत्येक परिक्षेत्रात शंभर टक्के काँक्रिट रस्ते व ड्रेनेज सिस्टीम निर्माण
करण्यात येणार आहे.
जिल्हयात पालकमंत्री पादंण
रस्ता योजनेच्या माध्यमातून सुमारे 10 हजार किमीचे पादंण रस्ते शेतशिवारात निर्माण
करण्यात आले आहे. जिल्हयातून शुभारंभ झालेल्या या योजनेची अमंलबजावणी संपूर्ण राज्यात झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजनेच्या
माध्यमातून 40 हजार घरांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी
शहराच्या चारही बाजूने लाईटस लावण्यात येणार आहे. सिंचनाबाबतीत प्रलंबित कामे
पूर्ण होण्यासाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. देशमुख यांच्या
प्रयत्नामुळे 1800 कोटी रूपयांचा निधी जिल्ह्यात आला आहे. सर्वांच्या साथीने
विकासाचा हा प्रवाह आणखी पुढे जाणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकास
होण्यासाठी सर्व विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार राहतील हाच केंद्रबिंदू ठेवून
राज्यशासन काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
खासदार श्री. अडसूळ म्हणाले की,
प्रभावी दळणवळणासाठी राज्यभर प्रचंड प्रमाणावर कामे सुरु आहेत. त्यामुळे विकासाला
गती मिळाली आहे. अमरावती
जिल्हयातील हायब्रीड ॲन्युईटी प्रकल्पा अंतर्गत अमरावती वळण रस्ता बडनेरा
ते पॉवर हाऊस व रहाटगावं ते कॅम्प शॉर्ट ते प्र. रा. म 14 ते राज्य मा. 280 ला
जोडणाऱ्या लांबीमध्ये रस्त्याची सुधारणा करणे अशी कामे अंतर्भूत आहेत. या
रस्त्यांची लांबी 22 किमी असून 12 किमीचा रस्ता हा अमरावती तर नऊ किमी चा रस्ता
बडनेरा शहरातून जातो. 21.76 किमी रस्त्याची लांबी आहे. या रस्त्यांचे चौपदरीकरण
करण्यात येणार असून सुमारे 93 कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहे. हायब्रीड ॲन्युईटीअंतर्गत
कंत्राटदाराकडून रस्तेनिर्मितीनंतर दहा वर्षे देखभाल व दुरुस्ती केली जाणार आहे,
असे श्री. साळवे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी कार्यक्रमाला परिसरातील
नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा