यशकथा
मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी
माझी कन्या भाग्यश्री योजना
वंशवृदधीसाठी मुलगाच हवा या हटटापायी मुलींचा जन्मदर कमी झाला असल्याचे चित्र दिसते. समाजात रुजलेल्या याविचारांमध्ये परिवर्तन आणून मुलींच्या जन्माच्या स्वागताला प्रोत्साहन देणारी माझी कन्या भाग्यश्री योजना अमरावती जिल्हयातप्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
पूर्वीच्या सुकन्या योजनेचे लाभ कायम ठेउन नविन स्वरुपातील माझी कन्या भाग्यश्री या या योजनेअंतर्गत अधिकचेलाभ लाभार्थ्यांना प्रदान करण्यात येत आहेत. ज्या जिल्हयांमध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे त्या जिल्हयांमध्ये ही योजनालागू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत दोन प्रकारांमध्ये लाभार्थ्यांची विभागणी करण्यात आली आहे. ज्या दाम्पंत्यांनाएकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटूंबनियोजन केले आहे, आणि लाभार्थ्यांच्या दुसऱ्या प्रकारात ज्या दाम्पंत्यांना एक मुलगीआहे आणि मातेने दुसऱ्या मुलिनंतर कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना योजनेचा लाभदेण्यात येतो. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास संबधितांना लाभ घेता येणार नाही.
सन 2018 सप्टेंबरअखेर जिल्हयातील 14 तालुक्यातील 844 दाम्पत्यांनी मुलीच्या जन्मानंतर कुटूंबनियोजनाची शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. यात सर्वाधिक वरुड येथील 179 लाभार्थी आहेत. यापैकी 75 लाभार्थ्यांना अनुदानवितरीत करण्यात आले आहे. अनुदानाची रक्कम 18 लक्ष 75 हजार असून या 75 लाभार्थ्यांच्या नावे ही रक्कम ‘फिक्सडिपॅाजीट’ करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्हयातील 844 लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून 325 लाभार्थ्यांना 81 लक्ष25 हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. एक अथवा दोन मुलींनंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रियाकरणाऱ्या कुटूंबास 50 व 25 हजारांची रक्कम या योजनेतून देण्यात येते. ही रक्कम बॅंकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येत असून जिल्हयातील 315मुलींच्या नावे 79 लक्ष 75 हजार रुपयांची मुदत ठेव करण्यात आली आहे. अचलपुर शहरी,अमरावती जुने व नविन शहरी भागातील 79 दाम्पत्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेउ इच्छिणाऱ्या201 लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकेकडे पुढील प्रकियेसाठी पाठविण्यात आले.
योजनेचा उददेश…बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझी कन्या भाग्यश्री योजना मुलींचा जन्मदरवाढविण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. तसेच गर्भावस्थेदरम्यान लिंगनिवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करणे हा या योजनेचा उद्देश होय. या योजनेतूनमिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे मुलींना आपले माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतांना येणाऱ्या अडचणींसवर मातकरता येत आहे.
असा मिळतो योजनेचा लाभ…….जात, धर्म, पंथ, ग्रामीण, शहरी असा कुठलाही निकष न ठेवता समाजातील सर्व घटकांसाठीही योजना लागू करण्यात आली आहे, हे या योजनेचे वैशिष्ठय आहे. ज्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 7.50 लाख रुपयांच्यामर्यादेत आहे, अशा सर्व कुटूंबामधिल पहिल्या दोन मुली अपत्यांपर्यत हया योजनेचा लाभ घेता येतो. एकुलती एक मुलगी वतिच्या आईच्या संयुक्त बँक खात्यात 50 हजार रुपये तर दोन मुलींसाठी प्रत्येकी 25 हजार रुपये एवढी रक्कम मुदत ठेवी मध्येजमा करण्यात येते. लाभार्थी असलेल्या मुलींच्या वयाच्या 6 व्या व 12 व्या वर्षी या रक्कमेवरील व्याजाची रक्कम काढता येतअसून त्यांना आरोग्य, शिक्षण या सारख्या अत्यावश्यक बाबींवर ती रकम खर्च करता येते. ही रक्कम त्या मुलीला 18 वर्षानंतरकाढता येत असून त्यावेळी मुलगी अविवाहीत असणे आवश्यक आहे. लाभार्थी मुलीला वयाच्या 18व्या वर्षी मुद्दलासहव्याजाची संपूर्ण रक्कम मिळते. लाभार्थी मुली आर्थिकदृष्टया स्वावलंबी व्हाव्यात हा या मागचा उद्देश होय. बालगृहातील अनाथमुलींसाठी ही योजना लागू आहे.
एक किंवा दोन मुली असणाऱ्या कुटूंबातही आता मुलींच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे हेच यायोजनेचे फलित होय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा