19 रोजी भरती मेळाव्याचे
आयोजन
अमरावती,
दि. 13 : व्यवसाय शिक्षण व
प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती यांच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
मोर्शि रोड, अमरावती या संस्थेत दि. 19 डिसेंबर 2018 रोजी सकाळी अकरा वाजता
विभागीय शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व आय.टी.आय
उर्तीण उमेदवारांनी आपल्या सर्व मुळ प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे, असे पु.तु.
देवतळे, सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय, अमरावती यांनी
कळविले आहे.
000000
रोजगार भरती मेळावा 15 रोजी
अमरावती,
दि. 13 : औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, मोर्शी रोड, अमरावती येथे दि. 15 डिसेंबर 2018 रोजी सकाळी अकरा वाजता पं.
दिनदयाल उपाध्याय रोजगार भरती मेळावा व शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित
करण्यांत येत आहे. सर्व आय. टी. आय. उर्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मुळ
कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे संस्थेचे प्राचार्य यांनी कळविलेले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा