गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

महामंडळाच्या पर्यटक निवासस्थानांमध्ये कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध

महामंडळाच्या पर्यटक निवासस्थानांमध्ये कलाकारांना
हक्काचे व्यासपीठ उपलब्ध
अमरावती, दि.6: स्थानिक लोककलेचे जतन व संवर्धन व्हावे आणि स्थानिक लोककलाकारांना कला सादर करण्याची संधी उपलब्ध व्हावी, आणि पर्यटक निवासांत पर्यटकांना स्थानिक लोककलेचा आनंद घेता यावा या उद्देशाने महामंडळाकडे असलेल्या पर्यटक निवासांत स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.    अमरावती विभागात असलेले विदर्भाचे नंदनवन चिखलदरा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, महानुभाव लोकांची काशी रिध्दपूर, टिपेश्वर वन्यजीव, सहस्त्रकुंड, शेगाव  सिंदखेडराजा अशा विविध पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या अमरावती विभागाअंर्तगत येणाऱ्या पाच जिल्हयामधील पर्यटक निवास चिखलदरा, रिध्दपूर (अमरावती ),लोणार, शेगाव (बुलडाणा), वाशिम, मार्गस्थ सुविधा केंद्र, बाळापुर (अकोला), टिपेश्वर, सहस्त्रकुंड (यवतमाळ) इत्यादी ठिकाणी ही पर्यटन विकास महामंडळाची कामे करण्यात येत आहे. कलाकारांना विना मानधन तत्वावर पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवासाच्या ठिकाणी कला सादर करावयाची असल्यास कलाकारांनी/संस्थांनी महामंडळाच्या अमरावती प्रादेशिक कार्यालय, बॅरक नं तीन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दुरध्वनी क्रमांक 0721-2661611/01 यावर संपर्क साधुन नाव नोंदणी करावी असे, महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळाचे  वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत हेडे यांनी केले आहे.
                                                   000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा