गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
फरदड न घेण्याबाबत सूचना
अमरावती, दि. 6: अमरावती विभागात खरीप 2018 मध्ये कापुस पिकाखाली
10.25 लाख हे. पेरणी झालेली आहे. कापुस पिकांवर आढळुन येणाऱ्या किडीची त्यांच्या
नुकसानीच्या प्रकारावरुन दोन गटात विभागणी करता येईल. पहिल्या गटात येणाऱ्या किडी
म्हणजे मावा, तुडतुडे फुलकिडे, कोळी, पांढरी माशी इ. रसशोषक किडी आणि दुसऱ्या गटात
येणाऱ्या किडी म्हणजे हिरवी बोंड अळी, ठिपक्याची बोंड अळी, गुलाबी बोंड अळी इ.
किडीचा प्रादुर्भाव आढळुन येतो.
कपाशी
वरील बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी बी.टी वाणाचा केल्या जातो. मागील वर्षापासुन
कपाशी पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळुन येत असल्याने कपाशी पिकाचे
नुकसान टाळण्याच्या दृष्टीने किडीचा जीवनक्रम खंडीत करणे आवश्यक आहे.
कपाशी
पिकाच्या फुले, पते, बोंड, अवस्थेमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव सुरुवात
होते. अंड्यातुन बाहेर पडलेली अळी प्राथमीक अवस्थेत पांढऱ्या रंगाची असुन पुर्ण
वाढ झालेली अळी गुलाबी रंगाची असते. अळी अवस्था 9 ते 21 दिवस राहते, त्यानंतर कोषा
अवस्थेत जाते व जर शेतात खाद्य उपलब्ध असेल तर पुन्हा पतंगा द्वारे पिकांवर अंडी
घालुन पुढील पिढीची निर्मीती केली जाते. सुरवातीच्या काळात अळ्या पाते, कळ्यांवर
उपजीवीका करते. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळुन पडतात. अळी बोंडातील बिया तसेच
रुई कातरुन नुकसान करते त्यामुळे रुईची प्रत खालावते व सरकीतील तेलाचे प्रमाण कमी
होते.
चालु
वर्षी कृषि विभाग, कृषि विद्यापीठे, महसुल विभाग व इतर कापुस उत्पादनाशी संलग्न
संस्था यांच्या प्रत्याने कपाशी पिकांवरील गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव अल्प
प्रमाणात आढळुन आलेला आहे. तसेच पुढील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव
आटोक्यात ठेवण्याचे दृष्टिने आतापासुन नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी
गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत केल्याशिवाय तरणोपाय नाही. गुलाबी बोंड अळीचा
जीवनक्रम खंडीत करण्यासाठी सर्व कापुस उत्पादक शेतकरी यांनी खालील उपाय करावे.
माहे
डिसेंबर उखेरच्या वेचणी नंतर शेतात जनावरे किंवा शेळ्या/मेंढ्या चरण्यास
सोडाव्यात. जनावरे कपाशीच्या झाडावरील पाने, बोंडे इत्यादी खातील व त्यामधील
असलेल्या किडी/रोगाच्या अवस्थांचा सुध्दा नायनाट होईल.
शेतकऱ्यांनी
कोणत्याही परिस्थितीत खोडवा किंवा फरदड घेऊ नये. डिसेंबर नंतर कपाशीचे पीक
पुर्णपणे काढुन टाकावे. रोटाव्हेटर किंवा श्रेडर यासारख्या यंत्राद्वारे शेतातील
पऱ्हाट्या नष्ट करण्यात याव्यात किंवा सेद्रीय खतामध्ये रुपांतरीत करावे.
पऱ्हाट्या शेतातुन काढल्यानंतर त्यांची साठवणुक न करता त्या इंधन ब्रिकेटस तयार
करणाऱ्या कारखान्यांना दयाव्यात. मार्च-एप्रिल मध्ये जमीनीची खोल नांगरणी करावी
जेणेकरुन किडीच्या जमीनीत असलेल्या अवस्था (उदा. कोष) वर येऊन उन्हामुळे मरतील
किंवा पक्षी त्यांना टिपुन खातील.
कपाशीची
धसकटे, पालापाचोळा जमा करुन कंपोस्ट खड्यात टाकावीत. या प्रमाणे स्वच्छता मोहीम राबवुन संपुर्ण शेत तथा बांध
स्वच्छ करण्यात यावे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची
फेरपालट करणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी घेतलेल्या शेतात पुढील हगांमात
कापुस लागवड करु नये. पुर्वी तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य लागवड केलेली जमीन
कापुस लागवडीसाठी निवडावी. पुढील हंगामात कपाशीच्या सभोवती नॉन बी टी (रेफ्युजी)
कपाशीची लागवड करावी. तसेच कपाशीवरील किडीच्या नैसगिक शत्रू किटकांचे संवर्धन
होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मुंग, झेंडू व एरंडी या मिश्र सापळा पिकांची एक ओळ
लावावी. या प्रमाणे कार्यवाही केल्यास निश्चीतच गुलाबी बोंड अळीवर नियंत्रण करणे
शक्य होईल.
सर्व
कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी वरील प्रमाणे उपाय योजना करुन पुढील हगांमात गुलाबी
बोंड अळीवर नियंत्रण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सुभाष का. नागरे विभागीय
कृषि सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांनी सर्व शेतकरीबंधूना केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा