गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८


वरुड, शेंदुरजनाघाट व मोर्शी नगरपालिकांचा आढावा
Ø जानेवारीअखेरपर्यंत निधी खर्च करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
                अमरावती, दि. 6 :  जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील दुष्काळसदृश्य स्थिती पाहता सन 2017-18 मध्ये प्राप्त 2 कोटी  रुपयांच्या निधीतून पाणीपुरठ्याचे योग्य नियोजन तात्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करावे. पाणी साठवण  करणाऱ्या टाक्यांची पूर्तता करुन या समस्येवर उपाययोजना  करावी. प्रस्तावित कामांच्या प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण  करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी आज दिले.
आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या तिन्ही नगरपालिकांच्या विकासकामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीद्वारे घेण्यात आला. 
                        जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत नगरपरिषदेला विविध योजनेतून प्राप्त निधी, प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव व प्रस्तावित कामांचा आढावा घेतला. जानेवारीअखेरपर्यंत प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
विविध विकास कामांसाठी प्राप्त निधीपैकी वरुड नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेत  सन 2017-18मध्ये 4 कोटी रुपये  निधी प्राप्त झाला असून आठवडी बाजारातील ओटे ,फळ व भाजीविक्रेत्यांसाठी उपलब्ध जागेत दुकानांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती रविंद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. पूर नियंत्रण रेषेच्या आत सर्व बांधकाम करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
तालुक्यातील सर्व शाळेतील स्वच्छतागृह तयार झाले असून 14 व्या वित्त आयेागातील प्राप्त निधीतून  रस्ता व नाली बांधकामाचे काम पूर्ण झाल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. दलितवस्ती योजनेअंतर्गत कामे व हरित पट्टा योजनाअंतर्गत प्राप्त परंतु अखर्चित निधी तात्काळ खर्च करण्याबाबत सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत  घरकुलांची माहिती त्यांनी घेतली. सद्य:स्थितीत वरुडला दर 3 दिवसानंतर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठा नियमित व्हावा यासाठी पाणीसाठवण  क्षमता वाढविणे आवश्यक आहे.  त्यासाठी नगरोत्थान योजनेअंतर्गत  जादा टाकीची व्यवस्था करण्यात यावी असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
                         शहरात स्वच्छता राहण्यासाठी घनकचरा व्य्वस्थापनासाठी 12 कोटी रुपयांचा निधी  प्राप्त झाला असून 14 घंटीगाड्यांव्दारे 90 सफाई कर्मचाऱ्यांकडून घरोघरी कचरा संकलित केल्या जातो. कचऱ्याच्या भुभरावाचे नियोजन वेळोवेळी करण्यात येत असून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती रविंद्र पाटील यांनी दिली.
              नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत वरुड,मोर्शी व शेंदूरजनाघाट येथे स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र अभ्यासिका, ग्रंथालय यासर्व बाबींची तातडीने उभारणी करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी  दिले.
शेंदूजनाघाट येथे परिसरात होणाऱ्या उत्सवादरम्यान यात्रेचे मोठया प्रमाणावर आयेाजन करण्यात येते. यात्रेदरम्यान स्वच्छता राखण्याच्यादृष्टीने पुरेशा स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात यावी. मोर्शी येथे रमाई घरकुल योजनेअंतर्गत  प्राप्त  दिड कोटी रुपयांचा निधीतून लाभार्थ्यांच्या घरकुलांचे प्रस्ताव  तात्काळ सादर करावे असे निर्देश  जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी वरूडच्या नगराध्यक्ष स्वाती आंडे, शेंदूरजनाघाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, मोर्शीचे नगराध्यक्षा शिला रोडे, उपाध्यक्ष जितेंद्र गेडाम, उपजिल्हाधिकरी रामदास सिद्धभट्टी, वरुड  नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र पाटील, शेंदुरजनाघाट चे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजाजन भोयर व मोर्शीचे मुख्याधिकरी एस.एन. वाहुरवाघ उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा