शनिवार, १ डिसेंबर, २०१८

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न


भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचा
 उद्घाटन सोहळा संपन्न
Ø  केंद्राच्या दोन आय. ए. एस, सात आय. आर. एस व 24 एमपीएससी व 27
इतर परीक्षेत प्रशिक्षणार्थ्यांची स्पर्धा परिक्षेत निवड

अमरावती, दि. 1 : भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती येथे सन 2018-19 करीता नव्याने प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज 1 डिसेंबर 2018 रोजी पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा. दिनेशजी सूर्यवंशी हे उद्घाटक म्हणुन तर या केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर प्र. वाडेकर हे संस्था प्रमुख म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पुजन झाले. केंद प्रमुख डॉ. मुरलीधर वाडेकर यांनी प्रा. दिनेशजी सुयवंशी यांचे पुष्पगुच्छ व ग्रामगिता भेट देवून स्वागत केले. तसेच केंद्राचे प्रमुख डॉ. मुरलीधर वाडेकर यांचे स्वागत केंद्राचे अधीक्षक विलास मानकर यांनी केले.
सदर कार्यक्रमामध्ये केंद्राचे प्रमुख डॉ. मुरलीधर प्र. वाडेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा सखोल आलेख मांडला.  त्यांनी प्रास्तविकामध्ये भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढावे म्हणून भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र हे जुन 2013 पासुन अमरावतीमध्ये शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथील जीवशास्त्र विभागाच्या जुन्या इमारतीमध्ये सुरु झाल्याचे सांगीतले. ह्या केंद्राची इमारत सन 1923 मधील असल्यामुळे या केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांनी सर्वप्रथम या इमारतीच्या विविध दुरुस्तीकरीता शासनाकडुन मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त करुन घेतला, यामध्ये त्यांनी केंद्राच्या इमारतीमध्ये विविध सोयी सुविधा प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
अमरावतीकरांसाठी ही एक फार मोठी उपलब्धी असून यामुळे सर्वस्तरातून या केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन मिळत असे, परंतु हे विद्यावेतन अतिशय कमी असल्याने व यामध्ये गरीब प्रशिक्षणार्थ्यांचा खर्च भागत नसल्यामुळे या केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांनी ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देवून याबाबत सतत पाठपुरावा करुन सन 2018-19 पासुन प्रशिक्षणार्थ्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करुन घेवून ते दरमहा दोन हजार रुपये वरुन चार हजार रुपये याप्रमाणे मंजुर करुन घेतले आहे.
या केंद्रामध्ये अद्ययावत अभ्यासिका, ग्रंथालय, इंटरनेट सुविधेसह संगणक कक्ष इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. या केंद्रात विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक वेळोवेळी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळेच या केंद्रातून आजपर्यंत केद्रीय लोक सेवा आयोगाच्या परीक्षेमधून दोन आय. ए. एस,. सात आय. आर. एस., करीता प्रशिक्षणार्थ्यांची निवड झाली असून महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेतून 24 आणि इतर स्पर्धा परीक्षेतून 27 प्रशिक्षणार्थ्यांची विविध पदावर निवड झालेली आहे.
उद्घाटन सोहळ्यात कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. सुर्यवंशी यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आय. ए. एस. परीक्षेची तयारी कशी करावी करावी व यासाठी कोणकोणत्या तत्वाचे पालन करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करुन प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी सुभेच्छा दिल्यात. त्याचप्रमाणे या केंद्रातील प्रशिक्षणार्थ्यांकरीता उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, प्रशिक्षणार्थ्यांना मिळणारी सन्मानजनक वागणूक व केंद्राची शिस्त याबाबत गौरवोद् गार काढले.
सदर कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील वाठोडकर यांनी केले व आभार प्रदर्शन अमोल कदम यांनी केले. या कार्यक्रमास नव्याने प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा