विभागीय लोकशाही दिनात नऊ प्रकरणे दाखल
·
प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली
काढण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना
अमरावती,दि.13- विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त पियूष
सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय
लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. विभागातून लोकशाही दिनासाठी नऊ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. दाखल प्रकरणांवर योग्य कार्यवाही करून अहवाल देण्याच्या
सूचना संबंधित अधिकाऱ्यांना श्री. सिंह यांनी दिल्या. विविध विभागाशी संबंधित असलेली प्रलंबित प्रकरणे अनेक दिवस
प्रलंबित न ठेवता तत्काळ निकाली काढावित तसेच केलेल्या कार्यवाहीच्या अहवालाची
प्रत तक्रारकर्त्यांस देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
आजच्या विभागीय लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी जिल्हाधिकारी
कार्यालय यवतमाळ एक प्रकरण, जिल्हाधिकारी
कार्यालय वशिम एक, जि.प. अमरावती व यवतमाळ अनुक्रमे एक अशी दोन, अमरावती पंचायत
समिती दोन, भुमि अभिलेख एक, कृषी विभाग एक, म्हाडा एक प्रकरण अशी एकूण नऊ प्रकरणे
तहसीलदार वैशाली पाथरे यांनी कामकाजासाठी सादर केलीत. यापैकी तीन
प्रकरणे आजच्या लोकशाही दिनात निकाली काढण्यात आलीत.
विभागीय लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी उपायुक्त (पुरवठा) रमेश मावसकर, कृषी सहसंचालक
सुभाष भामरे, महसूल उपजिल्हाधिकारी रामदास
सिध्दभट्टी तसेच भूमी अभिलेख, जिल्हा परिषद, मनपा अमरावती, कृषी विभाग या कार्यालयांचे संबंधित अधिकारी व अन्य विभाग
प्रमुख उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा