शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

शेतकऱ्यांनी किटकनाशकांची खरेदी, साठवण, हाताळणी व फवारणी काळजीपूर्वक करावी


शेतकऱ्यांनी किटकनाशकांची खरेदी, साठवण, हाताळणी
व फवारणी काळजीपूर्वक करावी
अमरावती, दि.3 :  किटकनाशके खरेदी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. अनोळखी किंवा रस्त्यावर विना परवाना किटकनाशकांची खरेदी करु नये. किटकनाशके खरेदी करतांना परवानाधारक किटकनाशके विक्रेताकडूनच खरेदी करावी. पूर्ण हंगामा करीता किटकनाशक मोठ्या प्रमाणात खरेदी करु नये. आपणांस आपले आवश्यक क्षेत्रात फवारणसाठी आवश्यक एवढेच किटकनाशक खरेदी करावीत. खरेदी पूर्वी किटकनाशकांच्या पॅकींगवरील लेबल पहावे. अपूर्ण लेबल, घटक पदार्थ नमूद न केलेले पॅकींगवर लेबल नसलेले किटकनाशके खरेदी करु नये. खरेदीपूर्वी किटकनाशकांचे बॅच नंबर केंद्रीय किटकनाशक नोंदणी मंडळाचे नोंदणी क्रमांक, उत्पादन तारीख व अंतीम तारीख बघून खरेदी करावेत. वापराची अंतीम तारीख संपलेली अथवा नजीकच्या अंतीम तारखेची किटकनाशके खरेदी करु नये. किटकनाशके पॅकींग करण्याविषयी नियम आहेत. ते व्यवस्थित पॅकींग केलेले असेल तरच खरेदी करावेत. गळती होणाऱ्या पॅकीगची खरेदी करु नये.
किटकनाशके साठवतांना शेतकऱ्यांनी राहत्या घरामध्ये किटकनाशके ठेवू नयेत. राहत्या घरापासून दूर सुरक्षित स्थळी किटकनाशकांची साठवणूक करावी. किटकनाशके त्यांचे मूळचे पॅकींग/वेष्टणात ठेवावीत. किटकनाशकांचे मुळ पॅकींगमधून किटकनाशके इतर पॅकींग मध्ये ओतून घेवू नये. किटकनाशके/ताण नाशके यांची वेगवेगळे साठवणूक करावी. ज्या ठिकाणी किटकनाशके ठेवण्यात आली आहे त्या टिकाणी धोक्याच्या सूचना लिहून ठेवाव्यात व लहान मुले पोहचणार नाही अशा ठिकाणी ठेवावेत. किटकनाशके साठवतांना त्यांचा वातावरणाशी सरळ संबध येणार नाही याची काळजी घ्यावी. किटकनाशके सूर्यप्रकाश पावसाचे पाणी तथा हवेची झुळूक यांचे संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी.
किटकनाशके हाताळणी करतांना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. वाहतूक करतांना किटकनाशके स्वतंत्र पिशवित ठेवातीत. बाजार हाट करतांना अन्नपदार्थ जनावरांची वैरण अथवा खाद्यपदार्थ बरोबर घेवून जावू अथवा वाहून नेवू नये. मोठ्या प्रमाणावर किटकनाशकांचे पॅकींग डोक्यावर, खांद्यावर अथवा पाठीवर वाहून नेवू नये.
किटकनाशके फवारणीचे द्रावण तयार करतांना शेतकऱ्यांनी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. गढूळ पाणी अथवा साचलेल्या पाण्यात वापरु नये. सरंक्षण साहित्य वापरल्याशिवाय द्रावण तयार करु नये. जसे हातमोजे, मास्क, टोपी, ॲप्रान, पूर्ण पँट, गॉगल या सरंक्षण साहित्याचा वापर करावा. किटकनाशके आपले शरीराच्या कोणत्याही भागावर पडणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले नाक, डोळे, कान व हात उडणाऱ्या औषधांपासून संरक्षीत राहतील याची संपूर्ण काळजी घ्यावी. वापरा विषयक सूचनांचे अवलोकन केल्याशिवाय मिश्रण तयार करु नये. किटकनाशकांच्या लेबलवरील सूचनांचे वाचन करुन समजून घ्यावे. गरजेनूसार व गरजे इतकेच द्रावण तयार करावे. दाणेदार प्रकारची औषधे आहे तशीच वापरावीत. दाणेदार प्रकारची औषधी पाण्यात विरघळू नयेत. स्प्रेपंपाची टाकी भरतांना औषधे सांडणार नाही याची काळजी घ्यावी. फवारणी करतांना शरीरास अपायकारक ठरतील असे कामे करु नयेत. खाणे पिणे, धुम्रपान करणे, तंबाखु खाने, फवारणीच्या कालावधीमध्ये अजिबात करु नये.
00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा