अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्ती प्रस्तावासाठी ई-पोर्टल कार्यान्वित
* 25 ऑगस्ट, अंतीम मुदत
*www.etribal.maharashtra.gov.in संकेतस्थळ कार्यान्वित
अमरावती, दि. 20: प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी जि. अमरावती अंतर्गत येत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानीत, कायम विना अनुदानीत महाविद्यालयांना जाहिर सूचीत करण्यात येते की, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2012-13 ते 2017-18 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क योजनेसंबंधी प्रस्ताव/अर्ज महाविद्यालय व विद्यार्थी पातळीवर प्रलंबित आहेत.
सदर प्रलंबित अर्जाबाबत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी यांच्यातर्फे वेळोवेळी लेखी तसेच दूरध्वनीद्वारे तोंडी व Whats App ग्रुपद्वारे व वैयक्तिक संपर्क साधुन महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे परीपूर्ण प्रस्ताव मंजुरी करीता सादर करण्याबाबत संबंधित महाविद्यालयास कळविण्यात आले आहे. तथापी सुचना निर्गमित करुन सुध्दा धारणी प्रकल्प कार्यालयाकडे बऱ्याच महाविद्यालयाने परीपूर्ण प्रस्ताव जमा केलेले नाहीत.
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन शासनाने शिष्यवृत्ती करिता नविन पोर्टल तयार केलेले असुन सन 2017-18 पर्यंतची शिष्यवृत्तीचे पोर्टल दि. 31 ऑगस्ट, 2018 नंतर बंद होणार आहे. सर्व महाविद्यालयांना सुचित करण्यात येते की, सन 2012-13 ते 2017-18 पर्यंतचे शिष्यवृत्ती प्रस्ताव विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या परिपुर्ण कागदपत्रासह प्रकल्प कार्यालयाकडे सादर करण्याचे सूचना दिल्या आहेत. तसेच www.etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन महाविद्यालयीन किंवा विद्यार्थ्यांच्या पातळीवर असलेल्या ऑनलाईन अर्जाची पुर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव दि. 25 ऑगस्ट्र, 2018 पर्यंत या कार्यालयात सादर करावे.
ज्या विद्यार्थ्यांना सन 2012-13 ते 2017-18 कालावधीतील शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधित महाविद्यालयास संपर्क साधुन परीपूर्ण प्रस्ताव महाविद्यालयांमार्फत दि. 27 ऑगस्ट, 2018 रोजी कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात जमा केल्याबाबतची खात्री करावी. शिष्यवृत्तीचे परिपूर्ण प्रस्ताव मुदतीत सादर झाले नाहित व त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थीनी शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क पासुन वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहिल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07226-224803 आर. एम. नागराळे 9372747539, पी. एस. वानखडे 9405318996 याच्याशी संपर्क साधावा, असे राहुल कर्डिले (भा. प्र.से), प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा