शिक्षकांचे पॅनल फार्म आता ऑनलाईन लिंक वर
अमरावती, दि. 24 : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10
वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) विषयनिहाय शिक्षकांची माहिती
ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत असून त्याकरीता अमरावती विभागीय मंडळाचे कक्षेतील
सर्व मान्यताप्राप्त शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात ई.9 ते 12 वी पर्यंत शिकविणाऱ्या
सर्व विषय शिक्षकांचे पॅनल तयार करण्याचे अनुषंगाने माहिती संकलित करण्यात येत
आहे. त्याकरीता मंडळाचे संकेतस्थळ Sscboardamravati.in वर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून सदर पत्रात दर्शविलेली
लिंक https://goo.gl/forms/oVQenzQaSPV5aWtT2 उघडण्यात
आलेली आहे सदर लिंकमध्ये शिक्षकांच्या माहिती प्रपत्र उपलब्ध असून ई. 8 वी ते ई.
12 वी पर्यंत शिकविणाऱ्या सर्व प्रकारच्या शिक्षकांची विषयनिहाय माहिती भरण्यात
यावी. आवश्यक माहिती शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी भरुन ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे
पाठवावयाची आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालय/शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी,
त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय/शाळेतील सर्व शिक्षकांची माहीती योग्यरितीने ऑनलाईन
सादर केल्याचे प्रमाणपत्र द्यावयाचे असून प्रमाणपत्र अमरावती विभागीय मंडळाचा ई.
मेल divsecamt@rediffmail.com दिनांक 30 ऑगस्ट, 2018 पर्यंत पाठवावी.
सदर परिप्त्रकाची नोंद घेवून सर्व कनिष्ठ महाविद्यालय/शाळेच्या
प्रमुखांनी मंडळाकडे त्वरीत माहिती सादर करावी, असे अनिल पारधी, विभागीय सचिव,
अमरावती विभागीय मंडळ यांनी कळविले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा