शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

स्वयसहाय्यता बचतगटांना शेतीपयोगी साधनांचा पुरवठा


स्वयसहाय्यता बचतगटांना

शेतीपयोगी साधनांचा पुरवठा


विभागातर्फे 205 मिनी ट्रॅक्टर-उपसाधने पुरविण्याचे उद्दिष्ट

अमरावती, दि.3 :  अनुसूचति जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर नऊ ते अठरा अश्वशक्तीच्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरविण्याची योजना समाजकल्याण विभागाव्दारे राबविण्यात येते. योजने अंतर्गत कल्टीव्हेटर किंवा रोटॅव्हेटर व ट्रेलर याचा पुरवठा लाभार्थ्यांना करण्यात येतो.  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या महाराष्ट्राच्या रहिवासी असलेल्या किमान एंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना या योजनेचा लाभ देण्यात येतो.
या योजने अंतर्गत मिनी ट्रॅकर व त्याची उपसाधने खरेदीसाठी कमाल मर्यादा 3.50 लाख इतकी असुन स्वयंसहाय्यता बचत गटांना या मर्यादेच्या दहा टक्के (रुपये-35 हजार) स्वहिस्सा भरल्यानंतर नव्वद टक्के (कमाल रुपये तीन लाख पंधरा हजार) शासकीय अनुदान अनुज्ञेय असते. या कमाल मर्यादेपेक्षा जास्त किंमतीचा टॅक्टर, उपसाधने इच्छुक बचत गटांना घ्यावयाचे असल्यास अनुदानाव्यतिरिक्त जादाची रक्कम स्वयंसहाय्यता  बचत गटांना स्वत: खर्च करावी लागेल.
या योजनेकरीता सहाय्यक आयुक्त यांच्याकडे ठरवून दिलेल्या उद्दिष्ठापेक्षा अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येईल. या योजनान्वये लाभार्थ्याला 90 टक्के अनुदानावर 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने बचत गटाला देण्यात येतात. सध्या या योजनेचे स्वरुप थेट लाभार्थी बचत गटाच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्यात येत आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतर लाभार्थी बचत गटास शासकीय अनुदानाचा 50 टक्के रक्कम आधार सलग्न बचत गटाच्या बॅक खात्यात जमा करण्यात येते व उर्वरित अनुदान आर.टी.ओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर लाभार्थी गटास देण्यात येते. लाभार्थ्यांस पुरविण्यात येणारी यांत्रिकी उपसाधने भारत सरकारचे मिनीस्ट्री ऑफ अग्रिक्लचर ॲन्ड फार्मस वेलफेअर,डिपार्टमेन्ट आफॅ अग्रिक्लचर कॉपरेशन ॲन्ड फार्मस वेलफेअर यांनी ट्रॅक्टर व उपसाधने टेस्टिंग करुन जाहीर केलेल्या उत्पादकाच्या यादीतील परिणामानुसार असावी.
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेच्या माध्यमातून अमरावती विभागाकरीता सन 2012-2013 पासून ते 2017-2018 पर्यंत 1030 मिनी ट्रॅक्टर वाटपाची उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत विभागामार्फत 825 मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात आले आहे. व 205 मिनी ट्रॅक्टर करिता 4 कोटी 93 लाख 45 हजार रुपयांची तरतुद विभागास उपलब्ध होणार आहे. तेव्हा इच्छुक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांनी शेतीपयोगी यांत्रिकी साधने मिळण्यासाठी अर्ज सादर करावीत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा