शासकीय सेवा म्हणजे जनतेची सेवा करण्याची संधी
-विभागीय आयुक्त पियूष सिंह
1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त महसूल खात्याच्या
उत्कृष्ट अधिकारी-कर्मचारी यांचा गौरव-सन्मान
अमरावती, दि.2 : जनतेला पारदर्शी, गतीमान सेवा-सुविधा देण्याबरोबरच
महसूल विभागाची जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी यांनी
झटले पाहिजे. शासकीय नोकरी म्हणजे जनतेची सेवा करण्याची मिळालेली संधी, असे समजून काम
केले तर कामाचे ओझे वाटणार नाही, काम करतांना आनंद मिळेल, असे मत विभागीय आयुक्त
पियूष सिंह यांनी व्यक्त केले.
1 ऑगस्ट, महसूल दिना निमित्त अमरावती
विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव-
सन्मान कार्यक्रमाचे आयोजन विभागीय आयुक्तालयात करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते
बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर,
महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, उपायुक्त श्री. मोहिते, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह
परदेशी यांचेसह अन्य वरिष्ठ महसूल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महसूल विभागात
क्षेत्रियस्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,
तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी, लघुलेखक, लिपिक, शिपाई,
पोलीस पाटील, कोतवाल यांचा गौरव व सन्मान करण्यासंबंधी शासनाव्दारे कळविण्यात आले
होते. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीव्दारे
उत्कृष्ठ अधिकारी-कर्मचारी यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमात निवड करण्यात आलेल्या
उत्कृष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांचे विभागीय आयुक्त यांचे हस्ते पुष्पगुच्छ,
स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानार्थी अधिकारी
कर्मचारी यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. यवतमाळचे अपर
जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उप जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, लिपीक
प्रविण नाईकवाड, अकोला जिल्ह्यातील पातूरचे तहसीलदार रामेश्वर पूरी, मुर्तिजापूरचे
नायब तहसिलदार वैभव फरतारे, वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून एस. डी.
घोडे, बुलडाणा जिल्हयातील मोताळाचे मंडळ अधिकारी ए. बी. होले, सिंदखेडराजा तहसीलचे
कोतवाल मदन वायाळ, वाशिम जिल्हयातील रिसोडचे तलाठी एस. बी. जाधव, मानोराचे पोलीस
पाटील वासुदेव सोनोने आदींचा समावेश आहे.
तसेच अमरावती विभागीय आयुक्तालयाचे पुरवठा उपायुक्त
रमेश मावस्कर, उपजिल्हाधिकारी गजानन निपाणे, सहायक विभागीय पुरवठा अधिकारी
विवेकानंद काळकर, नायब तहसीलदार निकीता जावरकर, रवि महाले, स्वीय सहायक नवनित
राऊत, अव्वल कारकुन अर्चना निपाणे, शरद लोणारे, लिपीक टंकलेखक प्रशांत पवार,
वाहनचालक विजय भाकरे, शिपाई दामोधर कोल्हे, रामचंद्र देशमुख, किशोर बिसने आणि
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाचे लघुटंकलेखक अमित चेडे , अचलपूर तहसीलचे शिपाई
पी.बी.इंगळे आदींचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा