जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त लेख:
स्तनपान बालकांसाठी सर्वोत्तम आहार
----------------------------------------------------------------------------
जागतिक स्तनपान सप्ताह दि. 1 ते 7
ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येतो.
स्तनपानाविषयी जनजागृती करण्यासाठी हा
लेख
----------------------------------------------------------------------------
बालकाच्या पोषणाच दृष्टीने आईचे दुध सर्वेकृष्ट आहार आहे. बालकाचा जन्म
झाल्यानंतर 12 तासांनी दूध पाजावे मात्र दूध ओढण्याची शक्ती सुरुवातीला अतिशय कमी
असते. त्यामुळे बालंक जास्त वेळ स्तनपान करु शकत नाही. बालकाला आहार देण्याची व
योग्य पोषण करण्याच्या दृष्टिने स्तनपान ही नैसर्गिक व आदर्श पध्दत आहे. स्तनपान
बालकाच्या शरीरिक व मानसिक निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. स्तनपानाचे आई व बाळाच्या
दृष्टीने अनेक फायदे आहेत.
आई व मुल यांच्या संबंधामध्ये स्तनपानाला अतिशय महत्व
आहे. स्तनपानामुळे बालक आईला प्रथम ओळखायला लागते. कारण बालकाची भूकेची गरज
तिच्यावरच भागविली जाते. स्तनपानामुळे बालक व आई यांच्यामध्ये भावनिक संबंध
प्रस्थापित होते. मातेचे दूध हे बालकाच्या दृष्टीने नैसर्गिक अन्न आहे.
आईचे दुध पचनास हलके असते. इतर प्राणीज दुधाच्या आईचे
दुध लवकर पचते कारण आईचे दूध हे शुध्द स्वरुपात असते. स्तनामधून ते बाळाच्या
शरीरात जात असल्याने निर्जतुक असते. त्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची भिती नसते.
म्हणून आईचे दूध सुरक्षित अन्न समजले जाते. आईच्या दुधामध्ये सर्व पोषक घटक असतात.
केसीनोज, लॅक्ट अल्युमीन, प्रथीने, लॅक्टोज कर्बोदके अ, ड, क जीवनसत्वे आढळून
येतात. रोगप्रतिकारशक्ती मध्ये वृध्दी होते. कारण आईच्या दुधामध्ये कोलेस्ट्रम हा
पिवळसर घट् चिकट पदार्थ असतो. या पदाथामध्ये प्रथिने जीवनसत्व अ, ब जास्त अधिक
प्रमाणात असते मात्र साखर कमी प्रमाणपत आढळते. यामुळे संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध
होतो. आईच्या दुधामध्ये संसर्गजन्य रोगांना प्रतिकार करण्यात आवश्यक प्रतिवणे Antibodies
असल्याने पोलीओ हे सर्दी गोवर यासारख्या संसर्गजन्य रोगापासून बालकाचे संरक्षण
होते. या व्यतिरिक्त सुध्दा आईच्या दुधामध्ये निरनिराळे Protective आणि
Anti-infective factors असताता. त्यामुळे बालकांच्या आतडीच्या रोगापासून बचाव
होतो. आईच्या दुधाचे तापमान शरीराच्या सामान्य तापमानाइतके असते. त्यामुळे
बालकाच्या दृष्टिने ते योग्य ठरते. स्तनपान केल्यामुळे बालकाच्या तोंडाला व्यायाम
होतो. त्यामुळे जबड्याचा विकास होतो. गभवस्थेमध्ये वाढलेल्या गर्भाशयाचा आकार
पूर्वीसारखा होत नसला तरी स्तनपानाच्या क्रियेमुळे गर्भाशयाचे आंकुचन होते व
गर्भाशाच्या आकर कमी होतो. आईच्या स्तनपानामुळे पैशाची बचत होते. कारण गाय, म्हैस,
पावडरचे दूध यांच्या किंमती दिवसे दिवस वाढत आहेत. त्यामुळे समाजातील निम्नवर्गा व
मध्यम वर्ग यांना परवडण्यासारखे नसते. स्तनपानामुळे मात्र पैशाची बचत होते. आई व
बाळातील संबंध घनिष्ठ होते. स्तनपानामुळे बालकाला व आईला मानसिक समाधान होते.
बालकामध्ये सुरक्षितेचा जाणीव निर्माण होते. प्रेम वाल्सल्य जिव्हाळा निर्माण
होतो. सुखदायक भावनांची निर्मिती स्तनपान करित असतानाच दोघांमध्ये होते. यांनी याच
क्रियांमुळे स्त्रीला मातृत्वाचा आनंद प्राप्त होतो. वेळेची बचत होते. कारण
बाजारातून दूध विकत आणणे, गरम करणे, बाटली निर्जतुक करणे बाटलीत भरणे यासारख्या क्रिया
स्तनपान करणाऱ्या मातेला वारंवार कराव्या लागत नाही. त्यामुळे मातेला थकवा येत
नाही व श्रमाची सुध्दा बचत होते. शाररिरिक वाढ व मानसिक विकास कृत्रिम पोषण
करणाऱ्या बालकापेक्षा अधिक असतो. स्तनपान करणाऱ्या बालकांना सर्वांगीण विकास
चांगला होतो. सद्यस्थितीत स्थ्यिांना होणाऱ्या आजारांमध्ये कर्करोग (कॅन्सर) हा आजार
जास्त प्रमाणात झालेला आढळून येतो. परंतु स्त्रियांनी बाळाला स्तनपान केल्यास
कर्करोग सारखे होणारे आजाराचे प्रमाण सुध्दा कमी होते. कारण स्तनपान करणाऱ्या
स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण स्तनपान न करणाऱ्या स्त्रियाच्या तुलनेत कमी
आढळते. याशिवाय स्तनपान केल्यामुळे स्त्रियांची मासिक पाळी उशिरा येत असल्यामुळे
कुटुंबनियोजन करण्यास मदत होते. परंतु स्तनपान करतांना आईच्या मनावर कोणताही
मानसिक ताण येऊ नये, राग, काळजी चिंता स्तनपान करतान असून नये. कारण त्यामुळे दूध
स्त्रवण्याचे प्रमाण कमी होऊन बालकाची दुधाची गरज पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून
स्तनपान करतांना आईचे मन पसन्न असावे. शांतचिताने बालकांला दूध द्यावे चिडचिड करु
नये.
प्रा. डॉ. सौ. सिमा बा. अढाऊ
इंदिराबाई मेघे महिला
महाविद्यालय, अमरावती
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा