गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६





स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

 टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार

 टाटा ट्रस्ट सोबत १२ व नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार

 

मुंबई१२ : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेमृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोडमहिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरेसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर - साकोरे उपस्थित होत्या.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेराज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्यपोषणपाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणे याला शासनाचे प्राधान्य आहे. या  भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या योजना  लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत आहे. टाटा ट्रस्टचे सहकार्याने विविध विभागांच्या माध्यमातून सकारात्मक प्रभाव पाडण्यात  यशस्वी होऊ. समाजातील सर्व घटकात उत्पन्न वाढून जगण्याचा स्तर उंचावण्यास यामुळे निश्चितच मदत होईल. दुर्धर आजारांवर महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना मर्यादा येतात मात्र राज्यात यापुढे उपचाराविना कुणीही मृत्यू पावणार नाहीअशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. टाटांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मोठी मदत असून यामुळे आपण गरजू रुग्णांना निश्चित स्वरूपाची मदत देऊ शकतो.

 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेमागील दहा वर्षापासून टाटा ट्रस्ट सोबत शासन काम करीत आहे. केवळ निधी देऊन भागीदारी होत नाहीतर काम करून समाजात सकारात्मक प्रभाव पाडणारी भागीदारी टाटा करत असते. हे बहु-आयामी करार  मातानवजात बालकबाल आणि किशोरवयीन घटकांसाठी आरोग्य सेवा बळकट करणे,  खुंटलेली वाढ रोखून  कुपोषणावर उपाय शोधण्यासाठी मदतगार ठरतील. या सोबतच पोषणासाठी आहारात वैविध्य आणणे,  जलस्रोतांचे अधिक शाश्वतपणे जतन आणि व्यवस्थापन,  ग्रामीण महाराष्ट्रात हवामान आधारित कृषी आणि पशुधन विकासाला चालना देण्याची क्षमता या भागीदारीत आहे.

 

नाम फाउंडेशन राज्यात जलसंधारणामध्ये मोठे काम करीत आहे. मागील काळात जल स्त्रोतांमधील गाळ काढणे नाला,नदी खोलीकरण व रुंदीकरण आदी कामे करण्यात आली आहेत. राज्यात जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. ही योजना लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत जनतेची योजना झाली. नाम फाउंडेशनच्या सहभागाने विदर्भ व मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या भागात जलसंधारणाचे मोठे काम झाले. यासाठी टाटा ट्रस्टचीही मदत झाली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा म्हणाले,   महाराष्ट्र शासनाशी भागीदारी करून आरोग्यशिक्षणपोषणउपजीविकापाणी आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सुसूत्रता आणणार आहे.  सर्व सामन्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासनाचे विविध विभाग आणि समुदायांसोबत सकारात्मक परिणाम आणण्याचा हेतू असणार आहे.  शासन आणि टाटा ट्रस्ट्स यांनी आज राज्याच्या एकात्मिक विकासाला पाठबळ देण्यासाठी सामंजस्य करारांवर  स्वाक्षरी करून धोरणात्मक भागीदारी अधिकृत केली आहे. नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर यांनीही शासनासोबत जलसंधारण क्षेत्रात काम करण्यास मदत मिळत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

 

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवालसचिव (आरोग्य) डॉ. निपुण विनायकसचिव (महिला व बालविकास) अनुपकुमार यादवटाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटानाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकरमकरंद अनासपुरेटाटा ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा आदींसह टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन च पदाधिकारी उपस्थित होते.

 

कराराचा उद्देश

सामंजस्य करार तंत्रज्ञानडिजिटल नवोपक्रम आणि 'लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी'  याद्वारे आरोग्यपोषणजलसंधारण आणि ग्रामीण उपजीविका यांमधील शासकीय  प्राधान्यक्रमांना पाठबळ देणेसमुदायांपर्यंत प्रमुख कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेनागपूर येथील सहा मान्यताप्राप्त रुग्णालयांसोबत केलेल्या करारांद्वारेगरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य देणेमुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत दुर्धर गंभीर आजारांमध्ये सुलभ व कमी खर्चाचे उपचार उपलब्ध करून देणे आहे.

 

सामंजस्य करारांची व्याप्ती

मातानवजात बालकबालक आणि किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य सेवा बळकट करणेटेलिमेडिसिनसह इतर माध्यमांतून उपचार सहज देणे,  शहरी आणि दुर्गम भागातील सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा वाढवणेएकात्मिक आपत्कालीन व्यवस्थापन सेवाद्वारे उत्तम आपत्कालीन प्रतिसादास पाठबळ देणे.  दोन वर्षांखालील मुलांमधील खुंटलेली वाढकमी वजन आणि कुपोषण रोखण्यास मदत करणेकिशोरवयीन कुपोषण आणि रक्तक्षय दूर करणेगडचिरोली सारख्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून 'टेक-होम रेशनसारख्या योजनांचे वितरण मजबूत करणेतलावांचे पुनरुज्जीवनजलकुंभ आणि नद्यांमधील गाळ काढणेभूजल पुनर्भरण सुधारणेमराठवाडा आणि विदर्भासह पाणीटंचाईग्रस्त भागांवर विशेष भर देऊन मृद व जलसंधारण योजनांची अंमलबजावणी करणेहवामान बदलांचा अभ्यास करून शेतीला प्रोत्साहन देणेवन-आधारित आणि ग्रामीण बिगर-शेती उपजीविकेला पाठबळ देणेआरोग्यशिक्षणपोषणपाणीस्वच्छता आणि उपजीविका या सर्वांना एकत्र आणणारा एकात्मिक ग्राम विकास साधणे.

 

असे आहेत करार

टाटा ट्रस्टच्या सोबत शासनाने एकूण १२ करार केलेले आहेत. यामध्ये ग्रामविकासजलसंधारणसार्वजनिक आरोग्यमहिला व बालविकासगडचिरोली जिल्हा प्रशासनमुख्यमंत्री सहाय्यता निधीनागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थाअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थामध्य भारत आयुर्विज्ञान संस्थाकेअर हॉस्पिटलस्वामी विवेकानंद मेडिकल मिशनमिदास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत सामंजस्य करारांचा समावेश आहे. तसेच नाम फाउंडेशनचा जलसंधारण विभागासोबत करार करण्यात आला आहे.

0000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा