मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

 विशेष लेख..

महाराष्ट्र शासनातर्फे हिंद- दि-चादर,श्री गुरु तेग बहादूर साहिब जी ३५० वा शहीदी समागमाचे आयोजन २८ फेब्रुवारी व १ मार्चला नवी मुंबई येथील ओवे मैदानसेक्टर २९ येथे होत आहे.

गुरु तेगबहादूर जी : धर्मस्वातंत्र्यसहिष्णुता आणि मानवतेचा अमर दीपस्तंभ

 प्रो. डॉ. दीपक मो. शिंदे - लेखककेंद्रीय जन जाती विद्यापीठविजयानगरम (विशाखापट्टणम ) येथे परीक्षा नियंत्रक आहेत पूर्वी ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडयेथे माध्यम शास्त्र संकुलात संचालक व  प्राध्यापक तसेच श्री – श्री गुरु गोबिंद सिंघ जी अध्यासन संकुल व संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.

भारतीय इतिहासात अशी काही महान व्यक्तिमत्त्वे उदयास आली आहेत कीज्यांचे जीवन समाजासाठी प्रेरणादाई व मार्गदर्शक ठरते अशा महान विभूतींचे  कार्य एखाद्या धर्माच्या चौकटीत न अडकता संपूर्ण मानवजातीसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरले आहे. शीख धर्माचे नववे गुरुश्री गुरु तेगबहादूर जीहे असेच एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सत्यन्यायकरुणाधर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी अर्पण केले. त्यांच्या बलिदानाला 350 वर्षे पूर्ण होत असतानात्यांचे सामाजिक सुधारक म्हणून असलेले कार्य आणि विचार आजही तितकेच सुसंगत आणि मार्गदर्शक आहेत. प्रत्यक्षात शीख धर्म असा एक धर्म आहे की या धर्माच्या धर्म गुरुनी दिलेल्या बलिदाना मुळे हिंदू धर्माचे रक्षण झाले आहे.  

गुरु तेगबहादूर जी : थोडक्यात जीवनपरिचय

१ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे जन्मलेले गुरु तेगबहादूर जी हे सहावे शीख गुरु श्री गुरु हरगोबिंद साहेब यांचे ते तेजस्वी पुत्र होते. बालपणापासूनच त्यांच्या जीवनावर अध्यात्मशौर्य आणि सेवाभावाचे संस्कार कोरले गेले. वेद-उपनिषदेइस्लामी तसेच भारतीय तत्त्वज्ञानाच्या सखोल चिंतनातून त्यांच्या विचारांना सर्वधर्मसमभाव आणि उदात्त मानवतावादाची दिव्य झळाळी प्राप्त झाली.  गुरु तेगबहादूर जी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हतेतर ते एक प्रभावी सामाजिक सुधारक होते. त्या काळात भारतीय समाज जातीय भेदभावधार्मिक अत्याचारअंधश्रद्धा आणि राजकीय दडपशाहीने ग्रासलेला होता. अशा परिस्थितीत त्यांनी समाजाला सत्यसमानता आणि नैतिकतेचा मार्ग दाखवला.

गुरु तेगबहादूर जी केवळ आध्यात्मिक गुरु नव्हतेतर मानवी स्वातंत्र्याचे सजग प्रहरी होते. त्यांनी सर्वधर्मसमभावसमता आणि आत्मसन्मान या मूल्यांचा पुरस्कार केला.

त्यांच्या धर्मांतरास उघड विरोधानंतर इ.स. १६७५ साली दिल्लीच्या चांदणी चौकात गुरु तेगबहादूर जी यांना अमानुष यातना देऊन त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. हे बलिदान कोणत्याही राजकीय सत्तेविरुद्ध नव्हतेतर विचारस्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले महान बलिदान होते.  गुरु तेगबहादूर जी मानवतेचे अमर नायक बनले. म्हणूनच त्यांना हिंद की चादर असे गौरवाने संबोधले जाते.

गुरुजींनी केवळ शीख धर्मियांसाठी नव्हेतर हिंदू धर्मीयांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान देण्याचा निर्णय घेतला. धर्मस्वातंत्र्यमानवी सन्मान आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले हे ऐतिहासिक बलिदान होते. त्यांच्या या बलिदानामुळे भारताच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासाला नवी दिशा मिळाली. त्यांचे पुत्र श्री  गुरु गोबिंदसिंग जी यांनी पुढे खालसा पंथाची स्थापना करून अन्यायाविरुद्ध संघटित लढ्याचा मार्ग दाखवला.

 मानवाधिकारांचे आद्य पुरस्कर्ते

आज आपण मानवाधिकारांची चर्चा करतोपण गुरु तेगबहादूर जी यांनी १७ व्या शतकातच मानवी हक्कांचा पुरस्कार केला. धर्म मानण्याचा अधिकारविचार करण्याचे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार हे मूलभूत मानवी हक्क आहेतहे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. त्यांचे बलिदान हे कोणत्याही एका धर्मासाठी नसून संपूर्ण मानवजातीच्या स्वातंत्र्यासाठी होते.

 जातीय भेदभावाविरुद्ध संघर्ष

त्या काळातील भारतीय समाज जातिभेदाच्या खोल दरीत अडकलेला होता. जन्मावर आधारित उच्च-नीचतेच्या कठोर रेषांनी माणसामाणसांत भिंती उभ्या केल्या होत्या. सामाजिक प्रतिष्ठाधार्मिक अधिकार आणि मानवी सन्मान हे काही मोजक्या वर्गांपुरते सीमित झाले होते. अस्पृश्यताभेदभाव आणि अन्याय हे समाजजीवनाचे अंग बनले होते. अशा विषम आणि अन्यायी सामाजिक रचनेत मानवी समानतेचा विचार मांडणे हे क्रांतिकारक धैर्याचे लक्षण होते.

याच अंधाऱ्या काळात गुरु तेगबहादूर जी यांनी शीख परंपरेतील एक ओंकार या तत्त्वाचा आशय समाजजीवनात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दृष्टीने ईश्वर एकच असूनत्याची निर्मिती असलेला प्रत्येक मानव समान आहे. जातधर्मवर्ण किंवा पंथ यांवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठतेला त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांच्या बाणीतून माणसाच्या अंतःकरणातील शुद्धताआचरणातील नैतिकता आणि सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित होते. सामाजिक समतेचा हा संदेश केवळ उपदेशापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष आचरणातून व्यक्त झाला. गुरु तेगबहादूर जी यांनी जातिभेदाच्या जखमांवर करुणेचा लेप लावला आणि समाजाला समतेच्या दिशेने नेण्याचा मार्ग दाखवला. म्हणूनच त्यांचे कार्य केवळ धार्मिक नव्हतेतर मूलगामी सामाजिक सुधारणा घडवणारे होते. त्यांच्या विचारांनी पुढील पिढ्यांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली.

अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला विरोध

गुरु तेगबहादूर जी यांच्या बाणीत आत्मचिंतनाला विशेष महत्त्व आहे. मनुष्याने प्रथम स्वतःच्या अंतःकरणाचा शोध घ्यावाइच्छांचे बंधन ओळखावे आणि विवेकाच्या प्रकाशात जीवन जगावेअसा त्यांचा आग्रह होता. वैराग्य म्हणजे संसारापासून पलायन नव्हेतर संसारात राहूनही आसक्तीवर विजय मिळवणेहे त्यांनी स्पष्ट केले. संयमसहनशीलता आणि धैर्य ही खरी साधना असूनसंकटांच्या काळातही मन स्थिर ठेवणारा मनुष्यच खरा भक्त आहेअसा त्यांचा संदेश आहे. त्यांच्या मते ईश्वरभक्ती ही केवळ शब्दांतवेशात किंवा विधींमध्ये व्यक्त होत नाहीती माणसाच्या आचरणातव्यवहारात आणि सेवाभावात प्रतिबिंबित झाली पाहिजे. म्हणूनच गुरु तेगबहादूर जी यांची बाणी ही आत्मशुद्धीची आणि मानवी मूल्यांची अमूल्य देणगी ठरते. त्यांनी अंधश्रद्धाढोंगीपणा आणि निरर्थक कर्मकांडांवर कठोर टीका केली. त्यांच्या बाणीत आत्मचिंतनवैराग्यसंयम आणि ईश्वरभक्तीवर भर दिला आहे.

ते म्हणतात तीर्थ फिरौअरु दान करौअवरु न पूजा जाई।

अंतर की मलु न उतरैज्यों धोवै घरु बाहि॥

 त्यांचे म्हणणे होते कीखरी भक्ती ही माणसाच्या आचरणात दिसली पाहिजेकेवळ बाह्य आडंबरात नव्हे.

काहे रे बन खोजन जाई।

सरब निवासि सदा अलिपतोतोही संगि समाई॥

गुरु तेगबहादूर जी यांनी सत्यकरुणादयासंयम आणि निर्भयता या नैतिक मूल्यांचा समाजात प्रसार केला. त्यांनी सांगितले कीसंकटाच्या काळातही जो मनुष्य विचलित होत नाहीतोच खरा ज्ञानी आहे. त्यांच्या बाणीतून मानसिक स्थैर्य आणि आत्मबळ यांचा संदेश मिळतो. आजचा समाजही विविध प्रकारच्या सामाजिकधार्मिक आणि वैचारिक संघर्षातून जात आहे. अशा वेळी गुरु तेगबहादूर जी यांचे विचार अधिकच महत्त्वाचे ठरतात. धार्मिक सहिष्णुताअभिव्यक्ती स्वातंत्र्यसामाजिक समता आणि मानवतेचा सन्मान हे मूल्य आजही तितकेच आवश्यक आहेत. गुरु तेगबहादूर जी हे केवळ शीख धर्माचे गुरु नव्हतेतर ते संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक होते. त्यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त आपण त्यांच्या सामाजिक सुधारणामानवतावादी विचार आणि निर्भय बलिदानाचे स्मरण करणे ही काळाची गरज आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण समाजात न्यायसमता आणि सहिष्णुता प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले पाहिजे. गुरु तेगबहादूर जी यांचे बलिदान हे इतिहासातील एक तेजस्वी दीपस्तंभ आहेजो आजही मानवतेचा मार्ग उजळवत आहे.

संदर्भ :1.            मॅक्लिओडडब्ल्यू. एच.सिख धर्मपेंग्विन बुक्स1997.

2.         सिंगखुशवंतअ हिस्ट्री ऑफ द सिख्सखंड १ (14691839)ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस2004.

3.         कोहलीसुरिंदर सिंगगुरु तेगबहादूर: जीवनप्रवास व बलिदाननॅशनल बुक शॉपदिल्ली1998.

4.         श्री गुरु ग्रंथ साहिबशिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीअमृतसर2011.

5.         •  श्री गुरु तेग बहादूर – डॉ. रणजितसिंह देशमुख

6.         •  धर्मस्वातंत्र्याचा दीपस्तंभ : गुरु तेग बहादूर – प्रा. भालचंद्र नेमाडे (संपादित/लेखसंग्रह

7.         •  Guru Tegh Bahadur: Prophet and Martyr – डॉ. हरबंस सिंह

8.         •  The Life of Guru Tegh Bahadur – मॅक्स आर्थर मॅकॉलीफ





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा