विभागीय आयुक्तालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
अमरावती, दि.
19 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्तालयात विभागीय आयुक्त
डॉ. श्वेता सिंघल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले.
यावेळी
अपर आयुक्त सुरज वाघमारे, उपायुक्त रवींद्र हजारे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी
आदी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण
करून विनम्र अभिवादन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा