विदर्भामध्ये मायनिंगच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनण्याची क्षमता असून, ‘विकसित भारत @2047’च्या संकल्पनेत विदर्भ महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, त्यासोबतच गडचिरोली येथे मायनींग क्षेत्रात नवीन इको सिस्टिम तयार होत असून क्लीन ग्रीन स्टील रिवोल्युशन देशात प्रथमच होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले केले आहे.
द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) च्या नागपूर लोकल चॅप्टरतर्फे हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे आयोजित दोन दिवसीय खाण अभियंत्यांचे ३६वे राष्ट्रीय अधिवेशन व ‘मायनिंग फॉर विकसित भारत @2047’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी खनीकर्म राज्यमंत्री ॲड. आशीष जयस्वाल उपस्थित होते.
विदर्भात सुमारे ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि जवळपास ५० एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) पोलाद निर्मिती क्षमता विकसित केली जात आहे. राष्ट्रीय स्तरावरील नव्या मिशनअंतर्गत प्रस्तावित पहिल्या आठ कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांपैकी चार प्रकल्प विदर्भात आले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
गडचिरोलीसोबतच चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये नव्या औद्योगिक परिसंस्थेचा विकास होऊ शकतो. ग्रीन स्टील, स्वच्छ तंत्रज्ञान आणि सुधारित लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटीमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण होतील, असे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
#DevendraFadnavis
#मायनिंग #विदर्भ #विकसितभारत2047
#गडचिरोली #GreenSteel #महाराष्ट्र
#औद्योगिकविकास #रोजगार
#आर्थिकविकास #चंद्रपूर #भंडारा
#नागपूर #गोंदिया #यवतमाळ



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा