मंगळवार, ८ सप्टेंबर, २०२६

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी दि. १ सप्टेंबर २०२६ ते दि. १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावा.


ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रांचा एक संच सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई शहर, नवीन प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – ४०००७१, येथे जमा करावा.

महाविद्यालय स्तरावर या योजनांसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा, तसेच महाविद्यालयांनी याबाबत पात्र विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा