इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षणासाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ करिता शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, मुंबई उपनगर, चौथा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, आर. सी. चेंबूरकर मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई – ४०००७१. यांनी केले आहे.
#शासकीयवसतिगृह

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा