विभागीय आयुक्त कार्यालयात भगवान सर्वज्ञ
श्रीचक्रधर स्वामी अवतार दिन साजरा
अमरावती
दि.13 : विभागीय आयुक्त कार्यालय,
अमरावती
येथे महानुभाव पंथाचे प्रवर्तक, समाजसुधारक व
तत्त्वज्ञ भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांचा अवतार दिन श्रद्धापूर्वक साजरा
करण्यात आला. यावेळी श्रीचक्रधर स्वामी यांच्या जीवनकार्याची, समाजसुधारणेतील योगदानाची तसेच त्यांच्या
मानवतावादी विचारांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
त्यांच्या
विचारांचा महाराष्ट्राच्या लोकजीवनावर मोठा प्रभाव पडला असून, महानुभाव साहित्याच्या माध्यमातून त्यांचे
विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचले आहेत. ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य
चरित्रग्रंथ त्यांच्या कार्याचा महत्त्वपूर्ण वारसा मानला जातो. श्रीचक्रधर स्वामी
यांचे जीवन हे मानवता, समानता, ज्ञान,
बंधुभाव
आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे प्रेरणादायी कार्य असल्याचे यावेळी नमूद करण्यात
आले. त्यांच्या विचारांचे आचरण करून समाजात समता व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे
आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमास विभागीय आयुक्त कार्यालयातील स्वीय सहाय्यक
चंद्रशेखर धकिते, लघुलेखक संतोष
चव्हाण, नाझर आशिष अंबाडकर
यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा