आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंतीनिमित्त
विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन
अमरावती, दि. ७ : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. अपर आयुक्त (महसूल) अनिल खंडागळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
राजे उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे झाला. त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारून रामोशी समाजाच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवली. महाराष्ट्राच्या भूमितही ब्रिटिश सत्तेच्या विस्ताराला प्रारंभीच विरोध करणाऱ्या अनेक धाडसी व्यक्तींपैकी एक महत्वाचे आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे राजे उमाजी नाईक. ७ सप्टेंबर हा त्यांचा जयंतीदिन. त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याचा संकल्प यावेळी केला.
याप्रसंगी अपर आयुक्त (न्याय शाखा) सुभाष बोरकर, अपर आयुक्त (विकास योजना) शालिनी कडू, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या शौर्यपूर्ण कार्याला आदरांजली वाहिली.
#umajinaik #umajinaikjayanti
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा