बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेतावर प्रशिक्षण

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत

शेतकऱ्यांना शेतावर प्रशिक्षण

अमरावती दि. 24:- कृषी उपविभागांतर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम उपविभागांतर्गत अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, चिखलदरा, धारणी  या पाच तालुक्यातून प्रत्येकी 12 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणातंर्गत फळबाग, भाजीपाला, फुले लागवड, आंबा, पेरु सधन लागवड, फळबाग व्यवस्थापन, काटेकोर शेती व्यवस्थापन, कांदाचाळ, संरक्षित शेती, एकात्मिक कीड, रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन, काढणी पश्चात व्यवस्थापन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, काजू प्रक्रिया, बेदाणा प्रक्रिया, सीताफळ, आवळा, डाळींब प्रक्रिया इत्यादी शितसाखळी, रायपनिंग इ., बाजारपेठ, निर्यात, कृषिपर्यटक इत्यादी बाबत मार्गदर्शन करण्यात येईल,    

या प्रशिक्षणासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी राहूल एस. सातपुते यांनी  केले आहे.

000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात युवकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन

 

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात

युवकांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन

अमरावती दि. 23:- कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालय, केंद्रिय प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कम्युनिटी डेव्हलमेट थ्रु पॉलीटेक्निक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत स्वंययुवकांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी तांत्रिक कौशल्यावर आधारित रेफ्रिजरेशन ॲण्ड  एअर कंडिशनर दुरूस्तीचे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण नि:शुल्क असून ग्रामीण व शहरी अल्प शिक्षीत युवक व युवतींसाठी असून प्रशिक्षणासाठी वयाची अट नाही. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना कोवीड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सक्तीचे राहील.

प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी अर्ज सादर करावे. अर्ज कार्यालयामध्ये उपलब्ध असून मुलाखत पध्दतीने प्रशिक्षीणार्थ्याची निवड करण्यात येईल. अधिक माहीतीसाठी शासकीय तंत्रनिकेतन परीसर, गाडगे नगर येथील कार्यालयात संपर्क साधावा, असे संस्थेचे प्राचार्य डॉ. व्हि. आर मानकर व योजनेचे समन्वयक प्रा. एस. जे. गायकवाड यांनी कळविले आहे.

0000000

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2021 योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा/श्रेणी सुधार योजनेअंतर्गत गुणपत्रिका बदलवून देण्याच्या कालावधीला 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत

रब्बी हंगाम 2021 योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

 

अमरावती, दि. 17 : विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम वर्ष 2021-22 हंगामापासून तीन वर्षाकरीता राबविण्याबाबत येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बॅकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत रब्बी हंगाम 2021 मधील रब्बी ज्वारीकरीता 30 नोव्हेंबर असून गहू बागायत, हरभरा व रब्बी कांदा पिके याकरिता 15 डिसेंबर 2021 आहे. या खरीप हंगामात गहु बागायत, हरभरा, रब्बी कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

 नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नाविण्यपुर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबधित राखणे, कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यात सातत्य राखणे हा योजनेचा उद्देश आहे.

या योजने अंतर्गत सन 2021-22 साठी जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेल्या पिक कर्ज दराप्रमाणे रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये योजना पूढील विमा कंपनीकडून संबंधित जिल्हा समुहामध्ये राबविण्यात येईल. वाशिम, बुलडाणा जिल्ह्याकरीता रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. वेस्टेर्न एक्सप्रेस हायवे, 5 वा मजला, चिंतामणी अव्हेन्यू, विरानी औद्योगिक वसाहती जवळ, गोरेगाव (इ)मुंबई -400063 दुरध्वनी क्र.022-68623005, ई-मेल rgcl.pmfby@relinceda.com टोल फ्री क्र. 18001024088.

यवतमाळ, अमरावती जिल्ह्याकरीता इफ्फो टोकिओ जनरल इन्शुरन्स कं. लि. 10 वा मजला, सुनीत कॅपीटल सोसायटी, सेनापती बापट रस्ता, शिवाजी नगर पुणे – 411016 , ई-मेल supprtagri@iffcotokio.co.in टोल फ्री क्र. 18001035490, अकोला जिल्हाकरीता एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं. लि. डी-103 तीसरा मजला ईर्स्टन बिझनेस डिस्ट्रिक एल. एस. बी. मार्ग भांडूप (पश्चिम) मुंबई -400078, दुरध्वनी क्र.912266383600 ई – मेल pmfby.maharashtra@hdfcergo.com , टोल फ्री क्र.18002660700 हा आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारचे व्यतिरिक्त कुळांने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. योजने अंतर्गत रब्बी हंगाम सन 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षाकरीता जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत जोखमीची व्याप्ती वाढविण्यात आली असून त्यामध्ये पूढील बाबींचा समावेश करण्यात आला आहे. पिक पेरणीपासून काढणीपर्यतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, व रोग इत्यादी बाबीमुळे पिकांच्या उत्पन्नास येणारी घट,  हवामान घटकांच्या व  पिकांच्या हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान. या योजनेअंतर्गत पिक कापणी प्रयोगाद्वारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचूक व दिलेल्या काल मर्यादेमध्ये प्राप्त करण्याकरिता उपग्रहाद्वारे प्राप्त प्रतिमाच्या साहाय्याने पिक कापणी प्रयोग आयोजित करणे तसे पिकांच्या उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करणेबाबत केंद्र शासनाने सूचित केले आहे.

या वर्षीच्या रब्बी हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधिच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे विभागीय कृषी सहसंचालक यांनी कळविले आहे.

 

000000

 

वृत्त क्र. 147                                                               दिनांक: 17 नोव्हेंबर 2021

 

                           श्रेणी सुधार योजनेअंतर्गत

        गुणपत्रिका बदलवून देण्याच्या कालावधीला 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

 

अमरावती, दि. 17 :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी श्रेणी सुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांनी विकल्प सादर करुन सुधारित गुणपत्रिकेची मागणी केल्यास सुधारित गुणपत्रिका बदलून देण्याचा कालावधी एक महिन्याऐवजी सहा महिन्यापर्यत वाढविण्यात आलेला होता. परंतू फेब्रवारी, मार्च 2020 व नोव्हेंबर ,डिसेबर 2020 परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेल्या व विकल्प सादर करु न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 15 डिसेंबर 2021 पर्यत मुदत वाढ देण्यात येत आहे.

तसेच फेब्रवारी, मार्च 2020 व नोव्हेंबर डिसेंबर 2020 परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत प्रविष्ठ झालेले विद्यार्थ्यी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी व विभागीय मंडळाशी संपर्क साधून याबाबत कार्यवाही करावी.असे विभागीय मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.

00000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेची आवेदनपत्रे 9 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी

 

    महाराष्ट्र शासन

विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वृत्त क्र. 147                                                             दिनांक: 22 नोव्हेंबर 2021

 विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेची आवेदनपत्रे

9 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावी

अमरावती दि. 22:- वर्ष 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेस नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच श्रेणीनुसार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावे. विद्यार्थ्यांनी  नियमित शुल्कासह दि. 18 नोव्हेंबर 2021 ते 9 डिसेंबर 2021 आणि विलंब शुल्कासह 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर www.mahahsscbord.in  या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावे. माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे स्विकारण्यासाठी Saral Database मध्ये विद्यार्थ्यांची अदयावत नोंद करावी. सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शाळांनी मंडळाने निश्चित केलेले शुल्क बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. असे

राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

                                                           000000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्ण करावी - पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

 

             

जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्प व पाणी

पुरवठा योजनेची कामे पुर्ण करावी       





                                                                                                   पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

               अमरावती, दि. 15 : येत्या जून 2022 पर्यंत सिंचन प्रकल्पाची कामे व पाणी पूरवठा योजनेअंतर्गत सर्व कामे नियोजनबद्धरित्या व गतीने पूर्ण करावी. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जास्तीत पाणी वापर योजनांचा समावेश करावा. प्रत्येक घरी नळ जोडणी करुन सर्वाना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशा दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

               आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी आरक्षणबाबत योजनांच्या आढावा घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख, मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता       सु.पा.आडे, उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अ.अं.सावंत, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

            पालकमंत्री म्हणाल्या, पाणी वापर संस्था सक्षम होणे गरजेचे आहे. पाणी वाटपाचे नियोजन योग्य पद्धतीने करता येण्यासाठी  अपर वर्धा प्रकल्पाअंतर्गत येणारे सिंचनाचे पूर्ण क्षेत्रफळ पाणी वापर संस्थाना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया आवश्यक ती कार्यवाही करून पूर्ण करावी. असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या गहू, कापूस, हरभरा इत्यादी पिकांकरिता मागणीनुसार पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. रब्बी हंगामाचे सिंचन सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निम्न पेढी प्रकल्प अंतर्गत प्राप्त निधी मधून कालवे, बंधारे निर्मितीची नियोजित  सर्व कामे  गतीने पूर्ण करण्यात यावी असे सांगितले.

 

0000000

 

पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

  पालकमंत्र्यांची व्यापारी बांधवांशी चर्चा

सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न

                                                                          पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

        अमरावती, दि. 15 : अमरावती शहरात शांतता निर्माण झाली असून, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 2 ते 4 वाजेदरम्यान खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न पोलीस व प्रशासनाकडून सातत्याने होत असून, लवकरच सर्व व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला.

            शहरातील स्थितीच्या अनुषंगाने चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंटस् अँड इंडस्ट्रीज संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, संघटनेचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, अतुल कळमकर, गौरीशंकर हेडा, मगनभाई बांठिया, राजेंद्र भन्साली, अनिल खरपे, बकुल कक्कड, ओमप्रकाश चांडक, संतोष बल्दुआ, संजय चोपडा, मोरंदमल बुधवाणी, आशुतोष वाडेकर, शरणपालसिंह अरोरा, सुरेंद्र पोपली, संजय कुकरेजा, पप्पू गगलाणी, मनोज खंडेलवाल, गोविंद सोमाणी, महेश पिंजाणी, सुरेश केवलरामाणी, अर्जुन चांदवाणी, रंजन महाजन, अशोक राठी आदी उपस्थित होते.

              यावेळी पालकमंत्र्यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानुसार सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी संचारबंदीत क्रमाक्रमाने  शिथीलता आणण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

             पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली की व्यापार क्षेत्रासह सर्वच घटकांचे नुकसान होते. गत दोन दिवसांत सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शांतता निर्माण झाली. जनजीवन पूर्वपदावर येऊन सर्व व्यवहार, सोयीसुविधा पूर्ववत सुरू व्हाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. संचारबंदीत दोन तासांची शिथीलता आणण्यात आली आहे. त्यानंतरही इतर सेवाही पूर्ववत करण्यात येत आहेत. व्यापारी बांधव, विविध क्षेत्रांतील नागरिक यांच्या माहितीसाठी प्रशासनाकडून होणा-या निर्णयांची माहिती पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे प्रसारित केली जाईल.

000000




बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 



बिरसा मुंडा यांच्या

जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

         अमरावती, दि. 15 : आद्यक्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर पेठे, नायब तहसिलदार धुळे, अतुल बुटे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून आदरांजली वाहीली. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी, आदी उपस्थित होते.

0000


शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी वसतिगृहामध्ये प्रवेश देणे सुरु

 

समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी

वसतिगृहामध्ये प्रवेश देणे सुरु

विद्यार्थ्यांनी 26 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि. 12  : अमरावती विभागातील समाज कल्याण विभागाच्या मागासवर्गीय विद्याथ्यांकरीता विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या पुढील शैक्षणिक सत्रा करीता वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपल्या जिल्ह्यातील संबंधित मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहातुन अर्ज प्राप्त करावे.

सन २०१९-२० व सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रातील या दोनही शैक्षणिक वर्षाचे प्रवेश विद्यार्थ्यांना एकत्रीतरित्या या वर्षा समाज कल्याण विभागामार्फत वसतीगृहाकरीता देण्यात येणार आहेत.

अमरावती जिल्हयातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता १० वी व ११ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक/व्यावसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांना या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशाकरीता अमरावती विभागीय स्तरावरील निंभोरा येथील 1००० मुलांची क्षमता असलेल्या वसतिगृहात युनिट क्र. १,२ व ३ गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह तसेच संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह व मुलींसाठी गुणवंत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, कॅम्प, अमरावती गुणवंत मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह (जेल रोड अमरावती) तसेच विभागीय स्तरावरील २५० मुलींचे युनिट क्र. ४ व मागासवर्गीय मुलीचे शासकीय वसतिगृह (नविन) किशोर नगर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर मला/मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता ८ वी पासून ते पुढील अभ्यासक्रमांकरिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल तेथुन दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज प्राप्त करून इच्छुक विद्यार्थ्यांनी ११ वी व १२ वी तसेच प्रथम व द्वितीय वर्षा करिता आपले अर्ज २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित गृहप्रमुख/गृहपाल यांच्याकडे सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी केले आहे.

0000000

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 8  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 18 नोव्हेंबर 2021 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

000000

 

 

 

नोव्हेंबर अखेर पर्यंत कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा - विभागीय आयुक्त पीयूष सिंह

 




नोव्हेंबर अखेर पर्यंत कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट
  पूर्ण करा

                                                             -  विभागीय आयुक्त पीयूष सिंह योग्य नियोजन व अंमलबजावणी करण्याच्या आरोग्य विभागाला सूचना

अमरावती दि.8: कोविडची संभाव्य तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. ही लाट थोपवून लावण्यासाठी 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे गरजेचे आहे. लसीकरण मोहीमा, शिबीरे व जनजागृती करुन लसीकरणाची गती वाढवावी. धारणी, चिखलदरा भागात नागरिकांच्या लसीकरणासाठी  योग्य नियोजन गरजेचे आहे. स्थलांतरीत मजूर, खासगी औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी या मोहीमेत आरोग्य विभाग, जिल्हा व ग्रामीण प्रशासनासह सामाजीक संस्थांनी सहभागी होऊन नोव्हेंबर अखेरपर्यंत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.

विभागिय आयुक्त कार्यालयातील सभागृहात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर, महानगरपालिका आयुक्त प्रशांत रोडे, आरोग्य विभाग अकोलाचे उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम , उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजेकर आदी उपस्थित होते.

श्री. सिंह म्हणाले, लसीकरणाची गती वाढविणे गरजेचे आहे. कोणत्या विशिष्ठ भागात लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये भिती किंवा संभ्रम असल्यास त्यांच्यात  विविध माध्यमांचा उपयोग करुन  जनजागृती करावी. विशेष करुन अशा भागात आरोग्य विभागाने लसीकरण शिबीरांचे आयोजन करावे. लसीकरण केंद्रावर रोजचे  उद्दिष्ठ पूर्ण करावे, असे सांगितले.

 मिशन बिगीन अंतर्गत मॉल, सिनेमागृह सुरु झाले आहेत. तेथे प्रवेश करण्यासाठी लसीकरण बंधनकारक करावे. लसीकरणास प्रोत्साहन मिळावे यासाठी, ज्या गावातील अठरा वर्षावरील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल अशा गावांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिली. शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे दोनीही डोज घेऊन लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. ज्या नागरिकांनी ठरावीक वेळेत लसीकरणाचा दुसरा डोज घेतला नाही त्या नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे सांगितले. लसींचा  पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहीती यावेळी संबंधितांनी दिली. 

 

00000