अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात
३१ ऑक्टोबर रोजी पदवीप्रदान समारंभाचे आयोजन
अमरावती
दि. २३ : अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय
या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी
१०:३० वाजता अभियंता भवन (आयई हॉल), शेगाव नाका, अमरावती येथे 'पदवीप्रदान समारंभ २०२५'
आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रसिध्दी
प्रमुख डॉ. के. एस. वासणकर यांनी कळविले आहे.
या समारंभाला विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी
संस्थान (व्हिएनआयटी), नागपूर चे संचालक, प्रा. डॉ. प्रेम लाल पटेल हे प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थित राहणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती चे प्राचार्य,
डॉ. आशिष एम. महल्ले हे समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
सन १९६४ मध्ये स्थापन झालेले शासकीय अभियांत्रिकी
महाविद्यालय, अमरावती हे विदर्भातील तंत्रशिक्षण क्षेत्रातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक
संस्थान आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) सन २००६-०७ मध्ये स्वायत्त दर्जा प्रदान
केल्यानंतर महाविद्यालयातील बी.टेक.ची पहिली तुकडी सन २०१० मध्ये पदवीधर झाली. यंदाचा
समारंभ हा महाविद्यालयाच्या बी.टेक.च्या सोळाव्या तुकडीच्या पदवीदानाचा विशेष सोहळा
आहे.
या समारंभाच्या माध्यमातून अभियांत्रिकी
शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात
येणार आहे. सन २०२५ च्या परीक्षेत प्रत्येक अभियांत्रिकी शाखेतून सर्व विद्यार्थ्यांमध्ये
प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना तसेच पदवीधर महिला विद्यार्थिनींमध्ये
प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थिनीला सुवर्णपदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात
येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा करण्यासाठी
महाविद्यालयातर्फे आवश्यक तयारी करण्यात येत आहे. या समारंभाच्या शैक्षणिक व प्रशासकीय
आयोजनाचे समन्वय अधिष्ठाता (शैक्षणिक), डॉ. एम. एस. मोरे आणि परीक्षा नियंत्रक, डॉ.
के. एन. तायडे हे करीत आहेत.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा