राष्ट्रीय
नमुना पाहणी अंतर्गत 77 वी फेरी
Ø
नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य
करावे
अमरावती, दि. 25 : राष्ट्रीय
नमुना पाहणी अंतर्गत केंद्र व राज्य शासनाद्वारे संपूर्ण देशात विविध विषयावर
नियोजनात्मक माहिती व आकडेवारीचे संकलन करण्यात येत आहे. या पाहणीसाठी नागरिकांनी
योग्य माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन 2019 या वर्षांमध्ये (जानेवारी
2019 ते डिसेंबर 2019) या कालावधीत राष्ट्रीय नमुना पाहणी ची 77 वी फेरी अंतर्गत राज्य
शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभागातर्फे ग्रामीण व नागरी
भागातील कुटुंबाची जमीन, पशुधारणा व शेतकरी कुटुंबाच्या परिस्थिीतीचे मुल्याकंन,
तसेच कुटुंबाकडे त्यांनी केलेली गुंतवणूक, त्यांच्यावर असलेले कर्ज, स्थावर
मालमत्ता आदि दायित्वाबाबत तपशीलवार माहिती गोळा करण्यात येणार आहे. या पाहणीत
आढळणाऱ्या या निष्कर्षांचा उपयोग शेती व शेतकऱ्यांसाठी भविष्यात राष्ट्रीय तसेच
राज्य पातळीवर विविध धोरणे व कार्यक्रम आखण्यासाठी होणार आहे. करीता विभागातील
सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या अर्थ व सांख्यिकी
संचालनालय, राज्य शासनाच्या अधिकारी- कर्मचारी यांना सहकार्य करुन आवश्यक ती
माहिती देण्याचे आवाहन, सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय,
अमरावती यांनी केले आहे.
***
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा