राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे
सदस्य दिलीप हाथीबेड
यांच्या अध्यक्षतेखाली आढावा
बैठक
सफाई कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी
श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी
करा
- दिलीप हाथीबेड
अमरावती, दि. 22 : सफाई कामगारांना त्यांच्या हक्काची घरे मिळण्यासाठी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी आज दिले.
सफाई कर्मचारी
व त्यांचे कुटुंबाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक जीवनाबाबत अध्ययन तसेच पुनर्वसनासाठी
स्वयंरोजगार योजना याविषयी बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत
होते. विभागीय आयुक्त पीयूष सिंह, अमरावतीचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, यवतमाळचे
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मनपा आयुक्त संजय निपाणे, सहा. आयुक्त श्री. सुरंजे
यांचेसह नगरपालिकांचे मुख्याधिकारी व सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित
होते.
श्री.
हाथीबेड म्हणाले, सन 1986, 1987 व 1988 साली निघालेल्या शासन परिपत्रकात नमूद असल्यानुसार
सफाई कामगारांना त्यांच्या मालकीची हक्काची घरे मिळण्यासाठी तरतूद केलेली आहे.
परंतू नगरविकास प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते, याकडे त्यांनी चर्चेच्या
माध्यमातून विशेष लक्ष वेधले. 25 वर्षे सातत्याने
स्वच्छता कर्मचारी म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य
योजनेतून शासकीय जमीनीवर घरे बांधून देण्यात येतात. या योजने संदर्भात त्यांनी महापालिका,
नगरपालिका निहाय प्रगती जाणून घेतली. तसेच या योजनेच्या अमंलबजावणीसंदर्भात अडचणी समजावून
घेतल्या. स्वच्छता कर्मचारी समाजासाठी स्वच्छता सैनिक म्हणून काम करीत असतो. अशा स्वच्छता
सैनिकांसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी योजनांची प्रामाणिकपणे व प्रभावीपणे अमंलबजावणी
करावी. त्यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी योजनांचा लाभ देऊन घरकुल उपलब्ध करुन द्यावे,
असे निर्देश श्री. हाथीबेड यांनी यावेळी दिले.
लाड
पागे समितीची अमंलबजावणी देशभरात करण्यात यावी. सफाई काम हे वर्षभर चालणारे
अत्यावश्यक सेवा असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
सफाई कामात ठेकेदार प्रथा बंद झाली पाहिजे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब
आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा लाभ देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, असे निर्देशही
त्यांनी यावेळी दिले.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेतील महानगरपालिका तसेच नगरपालिकानिहाय माहिती त्यांनी
माहिती घेतली. लाडपागे समितीने स्वच्छता कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी
केलेल्या शिफारशींची अमंलबजावणी करण्यासाठी नगरविकास विभागाने स्वच्छता कामगारांना
त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पाल्यांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यात यावी,
अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांना ठेकेदारी पध्दतीने करावयाची
स्वच्छता कामे बंद करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचे श्री. हाथीबेड यांनी
सांगितले.
बैठकीनंतर त्यांनी
माध्यमांशी देखील संवाद साधला. रोजगाराची समस्या मोठी असल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या
मुलांनी केंद्र सरकार व राज्य शासन राबवित असलेल्या विविध योजनांचा व संधीचा फायदा
घ्यावा. स्व्च्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांना स्वच्छता किट
व गणवेश पुरविण्यात यावे. तसेच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र आरोग्य विमा योजना
सुध्दा कार्यान्वित करण्यात यावी, अशा सूचना श्री. हाथीबेड यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना
दिल्या.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा