मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

इयत्ता 10 वीच्या परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध


इयत्ता 10 वीच्या परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध
Ø  www.mahahsscboard.in संकेतस्थळ

अमरावती, दि.17 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचेशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांचे मुख्यांध्यापक शिक्षक, विद्यार्थी व पालक आदींना सूचित करण्यात येत की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षा मार्च 2019 साठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र (Hall Ticket) विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
सर्व माध्यमिक शाळांना मार्च 2019 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे (Hall Ticket) ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in अथवा www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बुधवार दि. 30 जानेवारी, 2019 पासून School Login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
ऑनलाईन प्रवेशपत्रे उपलब्ध करुन घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की, मार्च 2019 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व शाळांनी इ.10 वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावयाची आहेत. प्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. सदर प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यावयाच्या आहेत.
प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवावयाची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारुन स्वाक्षरी करावयाची आहे.
तरी मार्च 2019 मध्ये माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक सर्व माध्यमिक शाळा यांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन त्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी, असे पुणे, राज्य मंडळाचे सचिव, डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा