कृषी प्रदर्शनी व पशु मेळाव्याला पदूम मंत्री महादेव जानकर यांची उपस्थिती
शहिद मुन्ना शेलुकर यांच्या कुटुबींयांना आधार देण्यासाठी शासन तत्पर
-पदूम मंत्री महादेव जानकर
*शिबिरात 1 हजार 727 रक्तदात्यांचे रक्तदान
* 15 हजार रुग्णांची आरोग्य तपासणी
अमरावती, दि. 11 : अरूणाचल प्रदेश येथे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आलेल्या चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील शहिद मुन्ना पुनाजी शेलुकर यांच्या माता-पित्याला आधार देण्यासाठी स्वत:चा एक महिन्याचा पगार अडीच लाख रुपये देणार असल्याची घोषणा आज पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज केली. तसेच शहिद शेलुकर यांच्या माता-पित्याला घर व जमीन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
येथील सांयन्स कोअर मैदानावर आयोजित कृषी-पशु मेळावा आणि महाआरोग्य शिबीरात शहीद शेलुकर यांच्या माता पित्याची रक्ततुला करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार रवि राणा, त्यांच्या सौभाग्यवती नवनीत राणा, विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, मनपा आयुक्त संजय निपाणे, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. आसोले तसेच कृषी व पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री.
जानकर म्हणाले की, शेलुकर कुटूंबीयाने देशाच्या संरक्षणार्थ त्यांचा सुपुत्र दिला.
आमदार रवि राणा व त्यांच्या सुविद्य पत्नी नवनीत राणा यांनी त्यांच्या घरी जावून
त्यांच्या कुटुंबींयांचे सांत्वन केले. त्यांच्या शहिद पुत्रा प्रमाणेच सर्वांच्या
मनात देशप्रेम निर्माण होण्यासाठी आज शहिद शेलुकर यांच्या माता-पित्याची रक्ततुला
करण्यात येत आहे. ही अतिशय भावनात्मक बाब असून देशभक्तीची भावना सर्वांमध्ये
रुजविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहिद शेलुकर यांच्या
माता-पित्याला आधार देण्यासाठी आमदार रवि राणा यांनी त्यांचा सहा महिन्याचा पगार धनादेशच्या
स्वरुपात आज दिला. राजकारण बाजूला सारुन गोरगरीबांची सेवा कशी करावी हे राणा
दांपत्याकडून शिकावे, असे गौरवोद्गार सुध्दा त्यांनी यावेळी काढले. शेलुकर
कुटुबीयांच्या पाठीशी राज्य शासन नेहमी उभे राहणार असल्याचे आश्वासन श्री. जानकर
यांनी यावेळी दिले.
यावेळी
कार्यक्रमात चांदूर रेल्वे येथे शेतात मृत्यू पावलेल्या सतिश शरदराव मडावी यांच्या
मातेचा मान्यवरांच्या सन्मान करण्यात आला. तसेच जमावाने हल्ला करुन मृत्यू पावलेले
अचलपूरचे सहायक पोलीस उपनिरीक्षक शहिद शांतीलाल पटले यांच्या पत्नीचा मान्यवरांच्या
हस्ते सन्मान करण्यात आला. आज आयोजित महाआरोग्य शिबिरात एकूण 1 हजार 727 रक्तदात्यांनी
रक्तदान केले. तसेच सुमारे 15 हजार रुग्णांनी शिबिरात आरोग्य तपासणी केली. यावेळी
आयोजित कृषी प्रदर्शनी व पशू मेळाव्याची पदूम मंत्री महादेव जानकर यांनी पाहणी
केली.
आदिवासी भागातील महिलांचे सक्षमीकरण
करण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी नाविन्यपूर्ण
योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाव्दारे मेळघाटात दूध उत्पादक संस्था स्थापन
करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले आहे. सौ. बुधिया बब्बू अजमेरीया (मेळघाट महिला
दूध उत्पादन सहकारी संस्था, चिचखेड), श्रीमती कमला अनिल भास्कर (मोरगड), श्रीमती
सुमन जांबू, श्रीमती पार्वती मोहरे, ललीता गाठे, सोनल बेलकर यांना प्रातिनिधिक
स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण कार्यक्रमात करण्यात आले.
कृषी
प्रदर्शनी, पशु मेळावा आणि महाआरोग्य शिबीराला जिल्ह्यातील नागरिक मोठया संख्येने
उपस्थित होते.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा